जव्हार प्रतिनिधी
सद्गुरू श्री अनिरुद्ध उपासना केंद्र,जव्हार येथे रक्तदान शिबीर,
सद्गुरू श्री अनिरुद्ध उपासना केंद्र,जव्हार यांच्यातर्फे पतंगशाह कुटीर रुग्णालय, जव्हार येथील रक्तकेंद्र येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या उपक्रमात एकूण ६५ रक्तदाते सहभागी झाले.अपघातग्रस्त, शस्त्रक्रियेसाठी वाट पाहणारे रुग्ण,गरोदर माता तसेच विविध आजारांनी त्रस्त असंख्य रुग्ण यांच्यासाठी रक्तदान हेच जीवनाचे आधारस्तंभ ठरते.त्यामुळे प्रत्येक आरोग्यदायी व्यक्तीने नियमितपणे रक्तदान करणेही काळाची गरज आहे,असे यावेळी तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले.या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी पतंगशाह कुटीर रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक,वैद्यकीय अधिकारी, रक्तकेंद्र सक्षम अधिकारी, संपूर्ण वैद्यकीय कर्मचारी वर्ग यांनी दिलेले सहकार्य उल्लेखनीय आहे.सद्गुरू श्री अनिरुद्ध उपासना केंद्र, जव्हार यांच्यावतीने सर्व रक्तदात्यांचे तसेच रुग्णालय प्रशासनाचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.सद्गुरू श्री अनिरुद्ध उपासना केंद्र हे गेल्या अनेक वर्षांपासून समाजोपयोगी कार्यात सक्रीय असून,भविष्यातही अशा उपक्रमांची मालिका राबवण्यात येईल,असा विश्वास उपासना केंद्राच्या वतीने व्यक्त करण्यात आला.

