Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, ” वास्तव,” अस्वस्थ बळीराजा हा खरीप हंगामासाठी सज्ज, राज्यात मान्सूनचे आगमन वेळेवर झाले असून खरीप हंगामाची कामे सुरू झाली आहेत.निसर्गाच्या लहरीपणामुळे कायम भितीच्या सावटाखाली वावरणाऱ्या शेतकऱ्यांची आता लगबग सुरू झाली आहे.राज्याच्या काही भागात मशागत व पेरणीची कामे वेगाने करण्यात येत आहे.कोकण,प.महाराष्ट्र,उ.महाराष्ट्र,विदर्भ व मराठवाडा या पाचही विभागात जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावली.त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतमजूर मिळवणे,बी-बियाणे व खते-खरेदी करणे,अशी शेतीची प्राथमिक कामे हातावेगळी करण्यात आली.मात्र कोकण व काही अंशी विदर्भ हा भाग वगळता अन्य विभागात पावसाचे प्रमाण अद्याप अत्यल्प राहीले.त्यामुळे या विभागातील शेतकरी चिंतेत सापडले आहेत. गेल्या काही वर्षांपासून राज्यात पावसाचे प्रमाण उतरणीवर लागले आहे.अवकाळी व परतीच्या पावसाचा…

Read More

दीपक मोहिते, शिवसेनेचा ५९ वा वर्धापनदिन ; अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत होतोय साजरा… शिवसेनेला ( उबाठा ) आज ५९ वर्षे पूर्ण होत आहेत.या प्रदीर्घ वाटचालीत या पक्षाने खूप काही सोसले.अनेक वादळे अंगावर घेतली.त्यातून तावून सुलाखून निघालेल्या या पक्षाने राज्याच्या राजकारणात स्वतःचा असा दबदबा निर्माण केला होता.पक्षाचे संस्थापक स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या छत्रछायाखाली इवलाश्या रोपट्याचा अल्पावधीत वटवृक्ष झाला.या वटवृक्षाच्या सावलीत हळूहळू भाजपचे झाडही वाढत गेले.कालांतराने भाजपच्या या झाडांच्या पारंब्यांनी सेनेचा गळा आवळण्यास सुरुवात केली.अवघ्या तीन वर्षात या वटवृक्षाचे सुकलेल्या झाडात रूपांतर झाले.सत्तेसाठी हपापलेल्या भाजपने २०१९ साली दिलेला शब्द न पाळल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी युती मोडीत काढली व राज्यात महाविकास आघाडीचा नावीन्यपूर्ण प्रयोग अमलात…

Read More

जव्हार प्रतिनिधी, थकीत अनुदान द्या – आ. विलास तरे, “बोईसर – तारापूर एमआयडीसीमधील वस्त्रोद्योगांचा झोन बदलून संबंधित उद्योगांना थकीत असलेले भांडवली व विजेचे अनुदान तात्काळ द्यावे,” अशी ठाम मागणी आ.विलास तरे यांनी महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली. यावेळी आ.तरे यांनी संबंधित विभागाची विद्यमान स्थिती स्पष्ट करताना सांगितले की, ” बोईसर – तारापूर औद्योगिक वसाहतीत सुरू असलेल्या अनेक वस्त्रोद्योगांना शासनाच्या अनुदान योजनेचा योग्य लाभ मिळत नाही. कारण,या भागाचा वस्त्रोद्योग झोन ” मुंबई क्षेत्र,” म्हणून वर्गीकृत करण्यात आला आहे, ज्यामुळे मिळणारे अनुदान अत्यल्प असून त्याचे वेळेवर वितरणही होत नाही.” या झोनिंगमुळे उद्योगांना आर्थिक फटका बसत असून, अनेक उद्योजकांमध्ये…

Read More

नदीम शेख, दांडी गावातील नुकसानग्रस्त कुटुंबांना शिवसेनेकडून मदत, गेल्या दोन दिवसांत पालघरमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे दांडी गावातील २९ घरांची प्रचंड पडझड झाली.अचानक आलेल्या या वादळामुळे कित्येक घरांचे पत्रे उडाले तर अनेक घरातील साहित्याचे अतोनात नुकसान झाले होते. सदर बाब दांडी गावातील ग्रामस्थांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांच्याकडे मांडल्यानंतर व मदतीची अपेक्षा व्यक्त केल्यानंतर त्यांनी लगेच नुकसान झालेल्या या एकूण २९ घरातील कुटुंबांना दिलासा मिळावा,यासाठी गावात पत्र्यांचे वाटप केले. राजकीय पक्षात कार्यकर्ते खूप असतात जे निवडणुकीच्या वेळी स्वतःच्या पक्षाला मतदान मिळावे,अशी अपेक्षा व्यक्त करतात.परंतु नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेला घरांना केवळ तोंडी दिलासा देण्याऐवजी प्रत्यक्ष जाऊन मदत मिळाल्यामुळे गावातील ग्रामस्थांनी शिवसेना…

Read More

दीपक मोहिते, कृषी विभागाचा नाकर्तेपणा, सरकारचे आजवरचे कांदेविषयक धोरण शेतकऱ्यांसाठी ठरले मारक, राज्य व केंद्र सरकारच्या कृषी उत्पन्नाच्या दिशाहीन धोरणाचा राज्यातील कांदे,सोयाबीन,दूध व अन्य उत्पन्न घेणारे शेतकरी आज अडचणीत आले आहेत.” नेमेची येतो पावसाळा,” या उक्तीनुसार कांदे उत्पादक शेतकरी दरवर्षी संकटात सापडत असतात.यंदाही तेच झाले आहे.त्याचा फटका महायुती सरकारला गेल्यावर्षी पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत बसला. कांदा,हे कृषी उत्पन्न,हे जीवनावश्यक वस्तूच्या यादीतील कृषी उत्पन्न,१९९९ साली जीवनावश्यक वस्तूच्या यादीत समाविष्ट करण्यात आला आहे.त्यानंतर २००४ मध्ये तो यादीतून वगळण्यात आला.त्यानंतरच्या काळात विविध कृषी उत्पन्नावर अनेकदा निरनिराळी बंधने लादली गेली.आजवर या उत्पन्नावर अनेक निर्बंध जी लादण्यात आली,त्यामध्ये परराष्ट्र व्यापार कायद्याचा देखील समावेश आहे.केंद्र सरकारने…

Read More

दीपक मोहिते, आदिवासी समाजासाठी उदंड झाल्या योजना,पण समाज आजही अंधारात चाचपडतोय, राज्यनिर्मितीच्या ६५ वर्षात आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आजवर शेकडो योजना कार्यान्वित करण्यात आल्या. पण आदिवासीच्या जीवनात किती बदल घडून आले.तसेच हा समाज विकासाच्या मुख्य प्रवाहात आला का ? हे दोन्ही विषय संशोधनाचे आहेत.आदिवासी समाजासाठी विविध योजना जाहीर होत असतात,तसेच अर्थसंकल्पात तरतूदीही करण्यात येत असते.पण प्रत्यक्षात हा निधी कुठे वापरला जातो,हे आजवर कधीच उजागर होऊ शकले नाही.तसेच या समाजात किती परिवर्तन झाले,याचा थांगपत्ता नाही. आता पुन्हा नव्याने देशातील आदिवासी समाजाच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान अंतर्गत ” धरती आबा लोकसहभाग…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” बडगुजर यांनी नितेश राणे यांचा पोपट केला, बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता समवेत पार्टी करणारे सुधाकर बडगुजर हे आज कॅबिनेटमंत्री नितेश राणे यांच्या नाकावर टिच्चून भाजपवासी झाले.त्यांच्या या प्रवेशानंतर प्रतिक्रिया देताना नितेश राणे यांची अवस्था पाहून अक्षरशः कींव करावीशी वाटली.म्हणून राजकारणात वावरताना खूप सांभाळून बोलावे लागते,वागावे लागते.नितेश राणे हे सतत वादाच्या भोवऱ्यात सापडत असतात.ते जी काही भूमिका घेतात,त्यांच्या प्रत्येक भूमिकेला स्वपक्षातूनच विरोध होत असतो.आजच्या घटनेने त्यांचे सर्वत्र हसं झाले.गिरीश महाजन यांनी नाशिक महानगरपालिका जिंकण्यासाठी बडगुजर यांचे कार्ड वापरण्याचे ठरवले व प्रवेशाचा हा कार्यक्रम पार पडला.यावेळी महाजन यांनी नाशिक महानगरपालिका निवडणुकीत ” अबकी बार शंभर पार,” अशी घोषणा…

Read More

जव्हार प्रतिनिधी, ग्रामस्थाच्या श्रमदानातून विहिरीची यशस्वी दुरुस्ती, पावसाळा सुरू झाला की अनेक ग्रामीण भागांतील पिण्याच्या शुद्ध पाण्याचा प्रश्न अधिकच तीव्र होत असतो. या पार्श्वभूमीवर जव्हार तालुक्यातील पिंपळशेत/कोतीमाळ गावात नागरिकांनी स्वखर्चातून आणि श्रमदानातून एक प्रेरणादायी उपक्रम राबवत नादुरुस्त विहिरीची दुरुस्ती करण्यात आली.या उपक्रमामुळे गावात शुद्ध आणि सुरक्षित पाण्याचा स्रोत पुन्हा कार्यान्वित झाला आहे. गावातील जुनी विहीर गेल्या अनेक वर्षांपासून नादुरुस्त अवस्थेत पडून होती. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत दूषित पाण्याचा वापर करावा लागत असे. परिणामी आजारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत होती.याचा थेट फटका महिला,लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना बसत होता. या समस्येची दखल घेत सामाजिक कार्यकर्ता कु. कमलेश पागी यांनी पुढाकार घेऊन गावातील…

Read More

वसंत भोईर,वाडा खेकड्यांसाठी ( मुठे ) खवय्यांची सर्वत्र भटकंती सुरू, पावसाच्या दमदार आगमना नंतरही खेकड्यांचे ( मुठे ) बाजारात अद्याप आगमन झालेले नाही.खेकड्यांची चव घेण्यासाठी आतुर असलेल्या खवय्यांवर खेकड्यांच्या शोधात बाजारपेठांत, गांव-पाड्यात तसेच रात्रीच्या वेळी पळींदा व बॅटरी घेऊन रानमाळावर भटकंती करण्याची वेळ आली आहे. पावसाच्या आगमनानंतर जमिनीत ओलावा निर्माण झाला की खोलवर बिळांमध्ये असलेले मुठे बाहेर पडतात. अत्यंत चपळ असलेल्या या मुठ्यांना पकडून ते शिजवून जेवणातील एक चांगला गुणकारी व चवदार खाद्य पदार्थ भाजी म्हणून बनवून खाण्यात येतो.जून महिन्याच्या दुस-या आठवड्यात पाऊस अधूनमधून सुरु झाला आहे. जंगल भागात व माळरानावर गवताचे प्रमाण अधिक झाले आहे.खेकड्यांचे खाद्य असलेले गवत अगदी…

Read More

दीपक मोहिते, आयुक्त सुस्त ; करदाते नागरिक बेहाल, वसई व नालासोपाऱ्यामध्ये कोणताही पक्ष निवडून आला तरी नागरिकांचे हाल मात्र संपायचे नांव घेत नाही.गेली अनेक वर्षे ही दोन्ही शहरे दरवर्षी जलमय होत असतात. नियोजनशून्य बांधकामे,नाल्यात होणारी अनधिकृत बांधकामे, पावसाळी पाणी वाहून नेणारे नाले अरुंद होणे व नालेसफाईच्या नावाखाली मनपा अधिकारी, लोकप्रतिनिधी व ठेकेदारांकडून होणारी लूट आदी कारणामुळे या दोन्ही शहरातील नागरिकांना दरवर्षी अस्मानी संकटाला तोंड द्यावे लागते. यंदाही लोकप्रतिनिधीनी नालेसफाईच्या कामाची पाहणी करताना शेकडो सेल्फी काढले व ते सोशल मिडियावर पोस्ट केले.पण गेल्या दोन दिवसात झालेल्या मुसळधार पावसाने या लोकप्रतिधीनी व आयुक्ताचे चांगलेच वस्त्रहरण केले.नालासोपारा शहरातील अनेक नागरिकांची घरे व…

Read More