नदीम शेख,
दांडी गावातील नुकसानग्रस्त कुटुंबांना शिवसेनेकडून मदत,
गेल्या दोन दिवसांत पालघरमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे दांडी गावातील २९ घरांची प्रचंड पडझड झाली.अचानक आलेल्या या वादळामुळे कित्येक घरांचे पत्रे उडाले तर अनेक घरातील साहित्याचे अतोनात नुकसान झाले होते.
सदर बाब दांडी गावातील ग्रामस्थांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांच्याकडे मांडल्यानंतर व मदतीची अपेक्षा व्यक्त केल्यानंतर त्यांनी लगेच नुकसान झालेल्या या एकूण २९ घरातील कुटुंबांना दिलासा मिळावा,यासाठी गावात पत्र्यांचे वाटप केले.
राजकीय पक्षात कार्यकर्ते खूप असतात जे निवडणुकीच्या वेळी स्वतःच्या पक्षाला मतदान मिळावे,अशी अपेक्षा व्यक्त करतात.परंतु नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेला घरांना केवळ तोंडी दिलासा देण्याऐवजी प्रत्यक्ष जाऊन मदत मिळाल्यामुळे गावातील ग्रामस्थांनी शिवसेना जिल्हाप्रमुख कुंदन संखे व शिवसेनेचे आभार मानले.
याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंदन संखे, शिवसेनेच्या जिल्हा संघटिका वैदेही वाढाण,शिवसेनेचे दांडी गावातील कार्यकर्ते कुंदन दवणे,संजय आक्रे,दांडी सोसायटीचे चेअरमन नंदकुमार तामोरे,व्हा.चेअरमन राजेंद्र पागधरे,सुरेश मेस्त्री,संजय तामोरे,देवेंद्र केणी,अवधूत तामोरे यासह दांडी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

