Author: दीपक मोहिते

मनिष धानू,डहाणू बुलेट ट्रेन ; लांबीचा बॉक्स गर्डर यशस्वीरित्या बसवण्यात आला. नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एन.एच.एस.आर.सी.एल) ने मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गाच्या महाराष्ट्र विभागातील डहाणू तालुक्यातील साखरे गावात ४० मी.लांबीचा पहिला पूर्ण लांबीचा प्री-स्ट्रेस्ड काँक्रीट (पीएससी) बॉक्स गर्डर यशस्वीरित्या नुकताच बसवण्यात आला आहे. महाराष्ट्रातील मार्ग १५६ कि.मी.लांब असून त्यामध्ये खालील टप्प्याचा समावेश आहे. • वांद्रे – कुर्ला कॉम्प्लेक्स ( मुंबई उपनगर ) येथे एक भुयारी स्थानक, • मुंबईतील वांद्रे – कुर्ला कॉम्प्लेक्स आणि ठाण्याच्या शिळफाटा दरम्यान २१ कि.मी.लांबीचा बोगदा • शिळफाटा ते झरळी गाव ( महाराष्ट्र-गुजरात सीमा,) पर्यंत १३५कि.मी.उंचावरील मार्गिकेचा समावेश आहे अ.१२५ कि.मी.लांबीचा व्हायाडक्टचा समावेश आहे • १०३ कि.मी.लांबीचा…

Read More

वसंत भोईर,वाडा संरक्षक भिंतीच्या बांधकामात केला दगडांचा वापर ; भिंत पाडण्याचे मुख्याधिकाऱ्यांचे आदेश वाडा नगरपंचायत हद्दीत कवटेपाडा रस्त्यालगत नगरपंचायतीतर्फे सुरू असलेल्या सिमेंट काँक्रीटच्या संरक्षक भिंतीच्या बांधकामात ठेकेदाराने सर्रास दगडांचा ( डबर ) वापर करत निकृष्ट दर्जाचे बांधकाम केले आहे. याविरोधात तक्रारी झाल्यानंतर नगरपंचायत प्रशासनाने हे संरक्षक भिंतीचे बांधकाम पाडण्याचे आदेश ठेकेदाराला बजावले आहेत. त्यामुळे विकासकामांतील भ्रष्टाचारावर शिक्कामोर्तब झाले आहे. वाडा नगरपंचायत हद्दीतील कवटेपाडा मधील बांबेरे यांच्या घरालगत संरक्षक भिंत बांधणे, हे सुमारे ९० लाख रु. अंदाजपत्रकीय तरतूद असलेले काम माही कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराला देण्यात आले होते.या ठेकेदाराने संरक्षक भिंतीचे बांधकाम करताना राजरोसपणे दगडांचा ( डबर ) वापर केल्याचे वृत्त दैनिक…

Read More

दीपक मोहिते, बविआशी ” साथसंगत नको रे बाबा,” काँग्रेसजनांची प्रखर भूमिका, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली वसई विरार जिल्हा काँग्रेस पदाधिकाऱ्यांची एक बैठक टिळक भवनात नुकतीच पार पडली.या बैठकीला प्रमुख पदाधिकारी व इच्छुक उमेदवारांनी हजेरी लावली होती.वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलवण्यात आल्याचे सांगण्यात आले. यापूर्वी प्रदेशाध्यक्षपदी असलेले नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विधानसभा निवडणुकीत पालघर जिल्ह्यात काँग्रेसला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते.राज्यातही पक्षाची प्रचंड वाताहत झाली.त्यामुळे नाना पटोले याना पक्षश्रेष्टींनी डच्चू दिला व त्यांच्या जागी हर्षवर्धन सपकाळ यांची वर्णी लावली.पण गेल्या सहा महिन्यांच्या काळात सपकाळ हे स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करू…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” धुपप्रतिबंधक बंधारा नसल्यामुळे भुईगाव समुद्रकिनाऱ्यावरील वनसंपदा धोक्यात, ५ जून रोजी राज्यात सर्वत्र जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होता.जनजागृती,चर्चासत्रे, भित्तीपत्रके तसेच अनेक उपक्रम या दिनी राबवण्यात आले.त्यानंतर मात्र सर्वत्र सध्या शुकशुकाट पाहायला मिळत आहे. पालघर जिल्ह्यात दररोज पर्यावरण विषयक असलेल्या कायद्याची पावलोपावली पायमल्ली होत असते.वृक्षतोड,वाळूचोरी,जंगल परिसरात होणारी मातीचोरी व अनधिकृत दगडखाणी इ.गैरप्रकारामुळे पालघर जिल्हा अत्यंत संवेदनशील असा बनला आहे.गेल्या आठ दिवसापासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस,वादळी वारे व प्रचंड उसळणाऱ्या समुद्राच्या लाटांमुळे किनाऱ्याची प्रचंड धूप होत आहे.गेल्या आठवडाभरात भुईगाव या निसर्गरम्य समुद्रकिनारी आदळलेल्या लाटांमुळे झाडांची मोठ्याप्रमाणात पडझड झाली.या समुद्रकिनारी धुपप्रतिबंधक बंधारा बांधण्यात यावा,अशी मागणी गेल्या तीन…

Read More

वसंत भोईर, वाडा शेतीचे शिवारे भरली तुडूंब ; भातपेरणीची कामे पडली लांबणीवर, तालुक्यात गेल्या १३ जून पासून मान्सून सक्रिय झाला असून गेल्या पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे.सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांच्या शेतीच्या कामांत मोठा अडथळा निर्माण झाला आहे.शेतीची कामे योग्य वेळेत होत नसल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. वाडा तालुक्यात पाच दिवसांपासून सतत पाऊस सुरु असून शेतं,ओहोळ,नदी, नाले,दुथडी भरून वाहत आहेत तसेच शेतीची शिवारे देखील तुडूंब भरली आहेत. पेरणी कशी आणि कुठे करायची असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.सततच्या कोसळणाऱ्या पावसाने भातपेरणीची कामे लांबणीवर पडली आहेत.तर काही शेतकऱ्यांनी भात बियाणांची पेरणी केल्यामुळे आता ती कुजून वाया…

Read More

सचिन परब,वसई वसई – नवघर पूर्वेस औद्योगिक वसाहतीत भीषण स्फोट, नवघर पूर्वेस औद्योगिक वसाहतीत एका औद्योगिक गाळ्यात स्फोट झाला.सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी गाळ्याचे मोठे नुकसान झाले आहे.या घटनेमध्ये एकजण जखमी झाला आहे.येथे काम करणाऱ्या पाच जणांना वाचवण्यात आले आहे. वस‌ई पुर्वेस औद्योगिक वसाहत आहे.या वसाहतीत शेकडो लहानमोठे कारखाने आहेत.काल मनीष इंडस्ट्री नं.१ मधील पहिल्या मजल्यावरील गाळा नंबर ११४ मध्ये सकाळी ८:३० च्या सुमारास अचानक एक भीषण स्फ़ोट झाला.प्रथमदर्शनी वातानुकूलित यंत्रणेत हा स्फोट झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.या स्फोटाची तीव्रता इतकी प्रचंड होती की गाळाचे ग्रील,सज्जे उडून शेजारच्या दुस-या इमारतीवर जाऊन धडकले.या दुर्घटनेत ११३ नंबर तसेच…

Read More

वसंत भोईर,वाडा वाड्यातील तीन ब्रिटिशकालीन पुल धोकादायक अवस्थेत, भिवंडी- वाडा- मनोर महामार्गावर तानसा नदीवरील डाकीवली फाटा,वैतरणा नदीवरील गांधरे,पिंजाळ नदीवरील पाली असे ब्रिटिशकालीन तीन पूल आहेत.यापैकी पाली येथील पुलाची थोडीफार डागडूजी करण्यात आली आहे.परंतु डाकिवली फाटा आणि गांधरे येथील पुलांची दुरुस्ती झाली नसल्यामुळे या दोन्ही पुलांवर मोठे खड्डे पडले आहेत.जड वाहनांचे सतत हादरे बसत असल्यामुळे पुलांची परिस्थिती धोकादायक झाली असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. वैतरणा आणि तानसा या दोन नद्यांवर असलेले हे दोन्ही पूल ब्रिटिशकालीन असून त्यांची दुरुस्ती झाली न झाल्यामुळे या पुलांची दुरावस्था झाली आहे. या पुलावरून दररोज हजारोंच्या संख्येने अवजड वाहनांची वाहतूक होत असते.त्यामुळे प्रशासनाकडून या दोन्ही पुलांची पाहणी…

Read More

सुरेश काटे,तलासरी रसायनाची वाहतूक करणारा ट्रेलर टँकर उलटला,तीन तास वाहतूक विस्कळीत, मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर काजळी गावाच्या हद्दीत, मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गांवर धोकादायक वळणावर ट्रेलर टँकर उलटून अपघात झाला. अपघातानंतर ट्रेलर टँकर मधून हायड्रोक्लोरिक ऍसिडची मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाली.त्यामुळे परिसरातील नागरिक आणि चालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले.दरम्यान मुसळधार पाऊस सुरू असल्याने गळती झालेले रसायन परिसरातील शेतीत गेल्यामुळे झाडे जळली असून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर काजळी येथे काल दुपारी साडेतीनच्या सुमारास झालेल्या अपघातातील ट्रेलर टँकरमधून हायड्रोक्लोरिक ॲसिडची गळती सुरु झाली. ट्रेलर टँकर मधून निघणार्‍या धुरामुळे परिसरातील नागरिक आणि वाहन चालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले…

Read More

वसंत भोईर,वाडा सततच्या पावसाने नेहरोली येथे रस्ता खचला, वाडा -भिवंडी महामार्गावरील नेहरोलीस्थित पेट्रोल पंपाजवळ रस्ता खचल्यामुळे या रस्त्यावर प्रचंड वाहतूककोंडी होत आहे. या मार्गांवरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना आपला जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे या एकेरी महामार्गाची तत्काळ दुरुस्ती करून वाहन चालकांना दिलासा द्यावा,अशी मागणी वाहनचालक करीत आहेत. गेल्या पाच दिवसांपासून वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत असल्यामुळे या मार्गावर प्रचंड खड्डे पडून दुरावस्था झाली आहे. हा मार्ग नेहरोली येथे खचला असुन, रस्त्याची दुरावस्था लक्षात घेता प्रशासनाची पोलखोल झाली आहे.पावसाची जर संततधार अशीच सुरू राहिली तर हा महामार्ग वाहतुकीसाठी बंद होईल,अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.शिवाय मुंबई- अहमदाबाद…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल, ” सुज्ञ नागरिक म्हणून गांभीर्याने विचार करा, वसई विरार शहर महानगरपालिकेच्या तिसरी सार्वत्रिक निवडणुक तोंडावर आली आहे.या विभागाचे सुज्ञ नागरिक पण डोळ्यावर कातडे ओढून बसलेल्या मतदारांनी निदान या निवडणुकीत तरी साखरझोपेतून जागे झाले पाहिजे,अन्यथा तुमच्या आमच्या पोराबाळांचे भवितव्य अंधारात सापडणार आहे.आपल्या भागातील अनेक नामचिन बिल्डर्स व महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी या निसर्गरम्य व हरित वसईचे अक्षरशः लचके तोडले.या विनाशाला हे दोघे जेवढे जबाबदार आहेत, तेवढेच मतदार म्हणून आपणही जबाबदार आहोत. या लेखात आठ ते दहा एक्सक्लूसिव्ह फोटो तसेच सोबत प्रश्न विचारण्यात आले आहेत.या प्रश्नांची तुमच्याकडून उत्तरे मिळावीत, अशी अपेक्षा नाही.पण हे फोटो व छायाचित्रे तुम्ही नजरेखालून घालावीत,अशी मात्र…

Read More