वसंत भोईर, वाडा
शेतीचे शिवारे भरली तुडूंब ; भातपेरणीची कामे पडली लांबणीवर,
तालुक्यात गेल्या १३ जून पासून मान्सून सक्रिय झाला असून गेल्या पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे.सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांच्या शेतीच्या कामांत मोठा अडथळा निर्माण झाला आहे.शेतीची कामे योग्य वेळेत होत नसल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
वाडा तालुक्यात पाच दिवसांपासून सतत पाऊस सुरु असून शेतं,ओहोळ,नदी, नाले,दुथडी भरून वाहत आहेत तसेच शेतीची शिवारे देखील तुडूंब भरली आहेत. पेरणी कशी आणि कुठे करायची असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.सततच्या कोसळणाऱ्या पावसाने भातपेरणीची कामे लांबणीवर पडली आहेत.तर काही शेतकऱ्यांनी भात बियाणांची पेरणी केल्यामुळे आता ती कुजून वाया जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.
पालघर जिल्ह्यात वाडा तालुक्याची ओळख भाताचे कोठार अशी आहे.येथील वाडा कोलम हा देशभरात प्रसिद्ध आहे.अनेक संकटांवर मात करून येथील शेतकरी हा आपली शेती करीत असतो. परंतू सततच्या मुसळधार पाऊसामुळे शेते तुडूंब भरली आहेत.शेती हंगामातील पहील्याच भातबियाणे पेरणी प्रक्रियेत शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे. .

