दीपक मोहिते,
” हल्लाबोल, ”
सुज्ञ नागरिक म्हणून गांभीर्याने विचार करा,
वसई विरार शहर महानगरपालिकेच्या तिसरी सार्वत्रिक निवडणुक तोंडावर आली आहे.या विभागाचे सुज्ञ नागरिक पण डोळ्यावर कातडे ओढून बसलेल्या मतदारांनी निदान या निवडणुकीत तरी साखरझोपेतून जागे झाले पाहिजे,अन्यथा तुमच्या आमच्या पोराबाळांचे भवितव्य अंधारात सापडणार आहे.आपल्या भागातील अनेक नामचिन बिल्डर्स व महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी या निसर्गरम्य व हरित वसईचे अक्षरशः लचके तोडले.या विनाशाला हे दोघे जेवढे जबाबदार आहेत, तेवढेच मतदार म्हणून आपणही जबाबदार आहोत. या लेखात आठ ते दहा एक्सक्लूसिव्ह फोटो तसेच सोबत प्रश्न विचारण्यात आले आहेत.या प्रश्नांची तुमच्याकडून उत्तरे मिळावीत, अशी अपेक्षा नाही.पण हे फोटो व छायाचित्रे तुम्ही नजरेखालून घालावीत,अशी मात्र नक्कीच अपेक्षा आहे.
१ – प्यायला पुरेसे पाणी नाही,

२ – चालायला धड रस्ते नाहीत,

३ – वीजयंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांचे बळी,

४ – निसर्गरम्य वसईला धारावी बनवण्याचे पाप कोणाचे ?

५ – १४ लाख लोकसंख्येच्या या उपप्रदेशाला डम्पिंग ग्राऊंड नाही,

६ ) नालेसफाईची बोगस कामे, करदात्यांच्या पैश्याची होत असलेली लूट,
या पाच प्रश्नाहून अधिक प्रश्न व समस्या ” आजही जैसे थे, ” आहेत.या निवडणुकीत तूम्हा – आम्हाला प्रेक्षकाची भूमिका घेऊन चालणारे नाही. गांभीर्याने विचार करा कारण या परिस्थितीला आपण सारे जबाबदार आहोत.

