सुरेश काटे,तलासरी
रसायनाची वाहतूक करणारा ट्रेलर टँकर उलटला,तीन तास वाहतूक विस्कळीत,
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर काजळी गावाच्या हद्दीत, मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गांवर धोकादायक वळणावर ट्रेलर टँकर उलटून अपघात झाला.
अपघातानंतर ट्रेलर टँकर मधून हायड्रोक्लोरिक ऍसिडची मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाली.त्यामुळे परिसरातील नागरिक आणि चालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले.दरम्यान मुसळधार पाऊस सुरू असल्याने गळती झालेले रसायन परिसरातील शेतीत गेल्यामुळे झाडे जळली असून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर काजळी येथे काल दुपारी साडेतीनच्या सुमारास झालेल्या अपघातातील ट्रेलर टँकरमधून हायड्रोक्लोरिक ॲसिडची गळती सुरु झाली.
ट्रेलर टँकर मधून निघणार्या धुरामुळे परिसरातील नागरिक आणि वाहन चालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते.अपघातग्रस्त टँकर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर आडवा पडल्यामुळे महामार्गावर सुमारे तीन ते चार तास वाहतूक कोंडी झाली होती.टँकर ट्रेलरचा
चालक समीर पठाण रा. भिवंडी हा गंभीर जखमी झाला आहे.
दरम्यान पोलीस प्रशासन घटनेतील दाखल झाल्यानंतर गुजरात सरीगाम येथील अग्निशमन दलाच्या चार गाड्यानी टँकर गळती नियंत्रणात आणली.अपघातग्रस्त टँकर हटवण्यासाठी उपाययोजना केल्या.
दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या चार वाहनांनी तीन क्रेनच्या साहाय्याने अडीच ते तीन तासानंतर कंटेनर बाजूला केला.त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

