वसंत भोईर,वाडा
वाड्यातील तीन ब्रिटिशकालीन पुल धोकादायक अवस्थेत,
भिवंडी- वाडा- मनोर महामार्गावर तानसा नदीवरील डाकीवली फाटा,वैतरणा नदीवरील गांधरे,पिंजाळ नदीवरील पाली असे ब्रिटिशकालीन तीन पूल आहेत.यापैकी पाली येथील पुलाची थोडीफार डागडूजी करण्यात आली आहे.परंतु डाकिवली फाटा आणि गांधरे येथील पुलांची दुरुस्ती झाली नसल्यामुळे या दोन्ही पुलांवर मोठे खड्डे पडले आहेत.जड वाहनांचे सतत हादरे बसत असल्यामुळे पुलांची परिस्थिती धोकादायक झाली असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
वैतरणा आणि तानसा या दोन नद्यांवर असलेले हे दोन्ही पूल ब्रिटिशकालीन असून त्यांची दुरुस्ती झाली न झाल्यामुळे या पुलांची दुरावस्था झाली आहे. या पुलावरून दररोज हजारोंच्या संख्येने अवजड वाहनांची वाहतूक होत असते.त्यामुळे प्रशासनाकडून या दोन्ही पुलांची पाहणी करून तत्काळ त्यांची दुरुस्ती करावी.अन्यथा एखादी दुर्घटना घडू शकते, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
या दोन्ही पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून तत्काळ दुरुस्तीचे काम हाती घ्यावे अन्यथा काही दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार प्रशासन असेल.
या मार्गावरून अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे या पुलांवर खड्डे पडले होते. त्यापैकी पिंजाळ नदीवरील पुलाची दुरुस्ती आधीच झाली आहे.तानसा नदीवरील डाकिवली फाटा पुलाची दुरूस्ती झाली,तर वैतरणा नदीवरील गांधरे पुलाची दुरूस्ती बाकी आहे.या पुलांवरून होणा-या अवजड वाहतूकी संदर्भात सावॅजनिक बांधकाम विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र असेल अशाच वाहनांना
पुलावरून परवानगी दिली जाईल,याची कल्पना देणार आहे.तसेच या पुलांसंदर्भात योग्य ती खबरदारी घेण्याच्या सुचना ठेकेदार कंपनीला देण्यात आल्या आहेत.
– पोपट चव्हाण, उपअभियंता सावॅजनिक बांधकाम विभाग,पालघर,

