मनिष धानू,डहाणू
बुलेट ट्रेन ; लांबीचा बॉक्स गर्डर यशस्वीरित्या बसवण्यात आला.
नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एन.एच.एस.आर.सी.एल) ने मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गाच्या महाराष्ट्र विभागातील डहाणू तालुक्यातील साखरे गावात ४० मी.लांबीचा पहिला पूर्ण लांबीचा प्री-स्ट्रेस्ड काँक्रीट (पीएससी) बॉक्स गर्डर यशस्वीरित्या नुकताच बसवण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील मार्ग १५६ कि.मी.लांब असून त्यामध्ये खालील टप्प्याचा समावेश आहे.
• वांद्रे – कुर्ला कॉम्प्लेक्स ( मुंबई उपनगर ) येथे एक भुयारी स्थानक,
• मुंबईतील वांद्रे – कुर्ला कॉम्प्लेक्स आणि ठाण्याच्या शिळफाटा दरम्यान २१ कि.मी.लांबीचा बोगदा
• शिळफाटा ते झरळी गाव ( महाराष्ट्र-गुजरात सीमा,) पर्यंत १३५कि.मी.उंचावरील मार्गिकेचा समावेश आहे
अ.१२५ कि.मी.लांबीचा व्हायाडक्टचा समावेश आहे
• १०३ कि.मी.लांबीचा व्हायाडक्ट,ज्यामध्ये २ हजार ५७५ एफएसएलएम गर्डर्सचा समावेश आहे.
• १७ कि.मी.लांबीचा भाग सेग्मेंटल गर्डर्सने तयार करण्यात आला आहे
• २.३ कि.मी.लांबीचे स्टील पुल,राष्ट्रीय महामार्ग, डी.एफ.सी.सी.भारतीय रेल्वे आणि उल्हास नदीवर बांधण्यात येत आहेत.
• ठाणे,विरार आणि बोईसर येथील बुलेट ट्रेनच्या ३ स्थानकांमध्ये एकूण १.३ कि.मी.लांबीचा भाग
ब. एकूण ११ कि.मी.लांबीचा भाग समाविष्ठ आहे.
• ६ कि.मी.लांबीचे ७ डोंगरी बोगदे,
• ५ कि.मी.लांबीची विशेष मातीच्या संरचना,
प्रत्येक ४० मी.लांबीचा पीएसकी बॉक्स गर्डर सुमारे ९७० मेट्रिक टन वजनाचा असतो,ज्यामुळे तो भारताच्या बांधकाम क्षेत्रातील सर्वात जड गर्डर ठरतो.हे गर्डर्स कोणतेही बांधकाम सांधे न ठेवता, एकसंध स्वरूपात तयार करण्यात येतात.प्रत्येक गर्डरसाठी ३९० घ.मीटर काँक्रीट आणि ४२ मेट्रिक टन स्टील वापरले जाते.
फुल-स्पॅन गर्डर्सना बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी प्राधान्य दिले जाते.कारण ते सेग्मेंटल गर्डर्सपेक्षा सुमारे १० पट जलगतीने बांधकाम पूर्ण करण्यास मदत करतात.
पूर्ण लांबीचे प्री-कास्ट बॉक्स गर्डर्स विशेष स्वदेशी अवजड यंत्रसामग्रीद्वारे बसवण्यात येत आहेत.ज्यामध्ये स्ट्रॅडल कॅरिअर्स,ब्रिज लॉन्चिंग गॅन्ट्रीज,गर्डर ट्रान्सपोर्टर्स आणि लॉन्चिंग गॅन्ट्रीज यांचा समावेश आहे.अखंड पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी हे गर्डर्स आधीच तयार करून समर्पित कास्टिंग यार्डमध्ये नियोजनबद्ध पद्धतीने साठवण्यात येत आहेत.
शिळफाटा ते गुजरात-महाराष्ट्र सीमेपर्यंतच्या मार्गिकेवर एकूण, १३ कास्टिंग यार्ड्स नियोजित करण्यात आले आहेत,त्यापैकी सध्या ५ यार्ड्स कार्यान्वित करण्यात आले आहेत.
ही सिद्ध तंत्रज्ञान प्रणाली एप्रिल २०२१ पासून बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी वापरात आहे, गुजरातमध्ये एकूण ३०७ कि.मी.लांबीचा व्हायाडक्ट पूर्ण करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये विरार आणि बोईसर स्थानकांवरील पहिल्या स्लॅबच्या कास्टिंगचा समावेश आहे.

