- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- २५ जून १९७५ ; आणीबाणीच्या कटू आठवणीना उजाळा,
- ठाकूर यांचा संताप ; हार्दिक राऊत यांच्या पथ्यावर पडणार ?
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
Author: दीपक मोहिते
राजन अधिकारी,बोईसर, पालघर जिल्ह्यात उद्योगवाढीसाठी २२०० कोटीची गुंतवणूक, पालघर जिल्ह्यात औद्योगिक विकासाला चालना देण्याकामी राज्य उद्योग व पालघर जिल्हा उद्योग केंद्र यांच्या संयुक्त प्रयत्नातून तारापूर येथे गुंतवणूक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा प्रशासनाच्या या स्तुत्य अशा प्रयत्नाचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे.जिल्हाधिकारी डॉ,इंदु राणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या गुंतवणूक परिषदेत विविध उद्योगासमवेत जवळपास २२०० कोटी रु.चे सामंजस्य करार करण्यात आले. पालघर जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत १५८ कंपन्या सहभागी झाल्या होत्या.या प्रस्तावित गुंतवणुकीतून जिल्ह्यात अंदाजे सहा हजार प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराची निर्मिती होणार असल्याचा दावा जिल्हा उद्योग केंद्रातर्फे करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी गुंतवणूक परिषदेत…
उत्तर भारतीय विकास सेनेची मनसे विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव, मनसेने गेल्या आठवड्यात राज्यात सर्वत्र मराठी भाषेचा वापर झाला पाहिजे,असा फतवा जाहीर केल्यानंतर मनसे सैनिक प्रचंड आक्रमक झाले.त्यांनी निरनिराळ्या बँकेत जाऊन अधिकाऱ्यांना दमबाजी केली.त्यामुळे बँक अधिकाऱ्यांच्या संघटनानीही सरकारला इशारा दिला. या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणी कायदा हातात घेतल्यास कठोर कारवाई करण्यात येईल,असे जाहीर केल्यानंतर मनसे आपले आंदोलन मागे घेतले. दरम्यान उत्तर भारतीय विकास सेनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन मनसेची मान्यता रद्द करावी, अशी मागणी केल्यामुळे मनसेच्या संतापात भर पडली आहे. मनसेच्या गुढीपाडव्याच्या दिवशी मेळाव्यात राज ठाकरे यांनी आदेश दिल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून वेगवेगळ्या ठिकाणी मराठीचा वापर व्हावा,अशी मागणी करण्यात…
दीपक मोहिते, विद्वेषाचे राजकारण, फुले चित्रपट : सरकार गप्प का ? छावा चित्रपटानंतर आता फुले चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे.” फुले, ” हा चित्रपट महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या समाजसुधारणेच्या संघर्षमय वाटचालीवर आधारित आहे.यामध्ये ” स्कॅम १९९२,” वेब सीरिज फेम प्रतिक गांधी महात्मा फुलेंच्या आणि अभिनेत्री पत्रलेखा ही सावित्रीबाई फुलेंच्या भूमिकेत आहे.राष्ट्रीय पुरस्कार विजेते अनंत महादेवन दिग्दर्शित ” फुले,” या चित्रपटावर ब्राह्मण महासंघाचे नेते आनंद दवे यांनी आक्षेप घेतला होता.या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये एक ब्राम्हण मुलगा सावित्रीबाईच्या अंगावर शेण फेकताना दाखवलं आहे.हा प्रकार दाखवण्यास आमचा विरोध नाही. मात्र फुले यांच्या शाळेला मदत करणारे ब्राम्हणच होते,हे या ट्रेलरमध्ये…
सचिन परब,वसई, गॅस सिलेंडर दरवाढीच्या विरोधात शिवसेनेचे ( उबाठा ) वसई येथे आंदोलन… केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत रु.५० ने दरवाढ केली आहे.त्यामुळे आधीच महागाईने होरपळलेल्या सर्वसामान्य जनतेच्या त्रासात भर पडली आहे. सर्वसामान्य जनतेवर कराचे ओझे वाढवणाऱ्या मोदी सरकारच्या या निर्णयाविरोधात पालघर जिल्हा शिवसेनेच्या वतीने शुक्र.११ एप्रिल २०२५ रोजी सायं.५.०० वाजता,नवघर बस स्टँड,वसई रेल्वे स्टेशन ( प. ), येथे निदर्शने करण्यात येणार आहेत. तरी या आंदोलनात आपण सर्व शिवसैनिक,महिला आघाडी,युवा सेना,तसेच संलग्न संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन करण्यात आले आहे.
वसंत भोईर,वाडा वाडा येथे विद्यार्थ्यांना दिले सायबर सुरक्षेचे धडे, वाडा पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक दत्त्तात्रेय किंद्रे,यांनी आज आय.टी.जिनियस कॉम्प्युटर एज्युकेशन,वाडा विद्यार्थ्यांसाठी ” सायबर सुरक्षा,” विषयावर मार्गदर्शन शिबीर आयोजित केले होते. यावेळी सायबर क्राईम सोबतच मुलं,मुली,आचरण, गुन्हे,शिक्षा,सोशल मीडियाचा वापर,यशस्वी जीवन, भविष्यातील करिअरच्या वेगवेगळ्या संधी इ.संलग्न विषयांवर पोलीस निरीक्षक दत्तात्रेय किंद्रे आणि गोपनीय विभागाचे चेतन सोनावणे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांना केवळ संगणक प्रशिक्षण मर्यादित न ठेवता त्यांचा सर्वांगीण विकास,हा उपक्रमामागील हेतू आहे,असे प्रतिपादन संस्थेचे संचालक कल्पेश ठाणगे यांनी केले. सदर कार्यक्रम वाडा पोलीस ठाण्याच्या सभागृहात घेण्यात आला.विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमासाठी संस्थेतर्फे आभार मानण्यात आले.
नाशिक प्रतिनिधी, वडनेर भैरव येथे भैरवनाथ यात्रा उत्साहात सुरू, नाशिक जिल्ह्याच्या चांदवड तालुक्यातील हिंदू मुस्लिम ऐक्याची प्रतीक असलेली वडनेर भैरव येथील भैरवनाथ यात्रा महाराष्ट्रातील नावाजलेली यात्रा आहे. भैरवनाथ महाराज जोगेश्वरी माता यांचा विवाह दरवर्षी प्रमाणे वडनेर भैरव येथे अतिशय थाटामाटात पार पाडला जातो. या यात्रेतील पहिला दिवस हा पालखी सोहळ्याचा असतो, त्याला छबीना असे म्हणतात. यावेळी हिंदू मुस्लिम एकत्र पूजेला बसतात. या पालखी सोहळ्याला भैरवनाथाचे प्रतिनिधी म्हणून भालेराव पाटील पूजेला बसतात.भालेराव पाटलांच्या वतीने प्रगतिशील शेतकरी सुदर्शन बापू भालेराव तर जोगेश्वरी देवी कडून मुसलमान पटेल पूजेला बसतात.यावेळी पटेल परिवाराकडून शकील गुलाब पटेल यांनी प्रतिनिधित्व केले. यावेळी रथ यात्राचे सर्व मानकरी,ग्रामस्थ यात्रा…
संजय लांडगे,वाडा पालघर जिल्ह्याला मिळणार कामगार विमा योजनेचे पहिले रुग्णालय, पालघर जिल्ह्यातील नागरिक आणि कामगारवर्गासाठी आज एक निर्णय घेण्यात आला.पालघर जिल्हा व तालुक्यातील मौजे कुंभवली, येथील सर्वे क्र. १७७५/५७ या जागेवर १५० खाटांचे कामगार विमा योजनेचे रुग्णालय उभारण्यात येणार आहे.या महत्त्वपूर्ण रुग्णालय प्रकल्पासाठी लागणारी जमीन १ रु.नाममात्र शुल्कावर उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली आहे. काल मंत्रालयात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या बैठकीत प्रस्तावित कामगार विमा योजनेच्या रुग्णालयासाठी कुंभवली ( सर्वे क्र. १७७५/५७ ) येथील जमीन १ रु.नाममात्र दरात हस्तांतरित करण्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली.यावेळी उपस्थित सर्व संबंधित विभागांनी रुग्णालयासाठी आवश्यक ती…
नाशिक प्रतिनिधी नाशिक येथे भव्य रोजगार मेळावा संपन्न, नाशिक पोलीस आयुक्तालय नाशिक शहर व युवाशक्ती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथे भव्य रोजगार आयोजित करण्यात आला होता.या रोजगार मेळाव्यामध्ये नाशिक,जळगाव,मुंबई,गोवा रत्नागिरी व पुणे,या विभागातील एकूण २२ कंपन्यांतील १ हजार ३२५ रिक्त पदांसाठी मुलाखती घेण्यात आल्या. या मेळाव्यात सहभागी झालेल्या कंपन्यांमध्ये आयटी,ऑटोमोबाईल, फार्मा,कॅपिटल गुड्स,बँकिंग तसेच इतर क्षेत्रातील नोकरीच्या संधी उपलब्ध होत्या.नुकतेच उत्तीर्ण झालेल्या तसेच अनुभवी उमेदवारांसाठी या रोजगार मेळाव्यात नोकरीच्या भरपूर संधी होत्या. मेळाव्यामध्ये सहभागी झालेल्या कंपन्यांनी अप्रेंटिस, ट्रेनी,फिक्स टर्म तसेच कंपनीच्या पे रोलवरील पदांसाठी मुलाखती घेण्यात आल्या. मेळाव्यामध्ये एकूण ५१३ युवक-युवती सहभागी झाले होते.त्यापैकी ४३१ उमेदवारांना वेगवेगळ्या कंपन्याकडून नियुक्तीपत्रे देण्यात…
दीपक मोहिते, पर्यावरणाची ऐसी तैसी, मुंबई कोस्टल रोडसाठी ९ हजार खारफुटींची कत्तल होणार, वर्सोवा ते भाईंदरपर्यंत कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या उद्देशाने मुंबईच्या महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम लवकरच सुरु होणार आहे.त्यासाठी सुमारे ९ हजार खारफुटीची कत्तल करण्यात येणार आहे.एवढ्या मोठ्याप्रमाणात कत्तल होणार असल्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होणार आहे.सदर बाब चिंता निर्माण करणारी आहे.पण महायुती सरकार विकासाच्या नावाखाली सुरु असलेला धुमाकूळ थांबवायला तयार नाही. राज्यशासनाच्या अधिकृत दस्ताऐवजानुसार,या प्रकल्पामुळे सुमारे ९ हजार खारफुटीची झाडे तोडण्यात येणार आहेत व अतिरिक्त ५१ हजार झाडे प्रभावित होणार आहेत.मोठ्या प्रमाणात वृक्षतोडीमुळे शहराच्या शाश्वत शहरी नियोजन व पर्यावरण,या दोन संवेदनशील विषयावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.मुंबई महानगर प्रदेश…
अनंत भोईर,पालघर पालघर येथे शिंदे गटात बॅनर वॉर जोरात, राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक हे लोकदरबार व सुरु असलेल्या विकासकामांची पाहणी करण्यासाठी काल पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यांच्या स्वागतासाठी शिवसेनेच्या स्थानिक नेत्याने तुफान बॅनरबाजी केली होती. जिल्ह्यातील आपल्या पक्षाचे वर्चस्व तसेच युतीमधील घटक पक्षाशी असणाऱ्या स्पर्धेत शिवसेना बॅनरबाजीमध्ये सरस ठरली आहे.पण या बॅनरबाजीमुळे शिंदे गटातील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आले आहेत. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक हे सूर्या पाणीपुरवठा योजनेची पाहणी करण्यासाठी आले होते.त्यांनी धामणी धरण व पालघर एसटी विभागीय कार्यालय व आगर या ठिकाणी भेट देऊन नंतर परिवहन मंडळाला दिलेल्या जागेची पाहणी केली.त्यांच्या स्वागतासाठी शिवसेनेच्या लहान मोठ्या नेत्यांनी खानीवडे टोल नाका…
