वसंत भोईर,वाडा
वाडा येथे विद्यार्थ्यांना दिले सायबर सुरक्षेचे धडे,
वाडा पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक दत्त्तात्रेय किंद्रे,यांनी आज आय.टी.जिनियस कॉम्प्युटर एज्युकेशन,वाडा विद्यार्थ्यांसाठी ” सायबर सुरक्षा,” विषयावर मार्गदर्शन शिबीर आयोजित केले होते.
यावेळी सायबर क्राईम सोबतच मुलं,मुली,आचरण, गुन्हे,शिक्षा,सोशल मीडियाचा वापर,यशस्वी जीवन, भविष्यातील करिअरच्या वेगवेगळ्या संधी इ.संलग्न विषयांवर पोलीस निरीक्षक दत्तात्रेय किंद्रे आणि गोपनीय विभागाचे चेतन सोनावणे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
विद्यार्थ्यांना केवळ संगणक प्रशिक्षण मर्यादित न ठेवता त्यांचा सर्वांगीण विकास,हा उपक्रमामागील हेतू आहे,असे प्रतिपादन संस्थेचे संचालक कल्पेश ठाणगे यांनी केले.
सदर कार्यक्रम वाडा पोलीस ठाण्याच्या सभागृहात घेण्यात आला.विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमासाठी संस्थेतर्फे आभार मानण्यात आले.

