नाशिक प्रतिनिधी
नाशिक येथे भव्य रोजगार मेळावा संपन्न,
नाशिक पोलीस आयुक्तालय नाशिक शहर व युवाशक्ती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथे भव्य रोजगार आयोजित करण्यात आला होता.या रोजगार मेळाव्यामध्ये नाशिक,जळगाव,मुंबई,गोवा रत्नागिरी व पुणे,या विभागातील एकूण २२ कंपन्यांतील १ हजार ३२५ रिक्त पदांसाठी मुलाखती घेण्यात आल्या.
या मेळाव्यात सहभागी झालेल्या कंपन्यांमध्ये आयटी,ऑटोमोबाईल, फार्मा,कॅपिटल गुड्स,बँकिंग तसेच इतर क्षेत्रातील नोकरीच्या संधी उपलब्ध होत्या.नुकतेच उत्तीर्ण झालेल्या तसेच अनुभवी उमेदवारांसाठी या रोजगार मेळाव्यात नोकरीच्या भरपूर संधी होत्या.
मेळाव्यामध्ये सहभागी झालेल्या कंपन्यांनी अप्रेंटिस, ट्रेनी,फिक्स टर्म तसेच कंपनीच्या पे रोलवरील पदांसाठी मुलाखती घेण्यात आल्या.
मेळाव्यामध्ये एकूण ५१३ युवक-युवती सहभागी झाले होते.त्यापैकी ४३१ उमेदवारांना वेगवेगळ्या कंपन्याकडून नियुक्तीपत्रे देण्यात आली.
सर्व रिक्त पदांसाठी मासिक रुपये १५ ते ३५ हजार रु. दरम्यान मासिक वेतनाच्या ऑफर्स देण्यात आल्या आहेत.
६३ पोलीसांच्या मुलांनीही नोंदणी केली होती.त्यापैकी
५१ मुलांना नियुक्तीपत्रे देण्यात आली.

