सचिन परब,वसई,
गॅस सिलेंडर दरवाढीच्या विरोधात शिवसेनेचे ( उबाठा ) वसई येथे आंदोलन…
केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत रु.५० ने दरवाढ केली आहे.त्यामुळे आधीच महागाईने होरपळलेल्या सर्वसामान्य जनतेच्या त्रासात भर पडली आहे.
सर्वसामान्य जनतेवर कराचे ओझे वाढवणाऱ्या मोदी सरकारच्या या निर्णयाविरोधात पालघर जिल्हा शिवसेनेच्या वतीने शुक्र.११ एप्रिल २०२५ रोजी सायं.५.०० वाजता,नवघर बस स्टँड,वसई रेल्वे स्टेशन ( प. ), येथे निदर्शने करण्यात येणार आहेत.
तरी या आंदोलनात आपण सर्व शिवसैनिक,महिला आघाडी,युवा सेना,तसेच संलग्न संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन करण्यात आले आहे.

