नाशिक प्रतिनिधी,
वडनेर भैरव येथे भैरवनाथ यात्रा उत्साहात सुरू,
नाशिक जिल्ह्याच्या चांदवड तालुक्यातील हिंदू मुस्लिम ऐक्याची प्रतीक असलेली वडनेर भैरव येथील भैरवनाथ यात्रा महाराष्ट्रातील नावाजलेली यात्रा आहे. भैरवनाथ महाराज जोगेश्वरी माता यांचा विवाह दरवर्षी प्रमाणे वडनेर भैरव येथे अतिशय थाटामाटात पार पाडला जातो.
या यात्रेतील पहिला दिवस हा पालखी सोहळ्याचा असतो,
त्याला छबीना असे म्हणतात.
यावेळी हिंदू मुस्लिम एकत्र पूजेला बसतात.
या पालखी सोहळ्याला भैरवनाथाचे प्रतिनिधी म्हणून भालेराव पाटील पूजेला बसतात.भालेराव पाटलांच्या वतीने प्रगतिशील शेतकरी सुदर्शन बापू भालेराव तर जोगेश्वरी देवी कडून मुसलमान पटेल पूजेला बसतात.यावेळी पटेल परिवाराकडून शकील गुलाब पटेल यांनी प्रतिनिधित्व केले.
यावेळी रथ यात्राचे सर्व मानकरी,ग्रामस्थ यात्रा कमिटीचे सर्व पदाधिकारी भैरवनाथ ट्रस्टचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
भैरवनाथ मंदिरापासून पालखीला मानकरी यांनी सुरुवात केली.यावेळी नेहमीच्या पालखी मार्गाने पालखी मारुती मंदिराजवळ येते. देवांचा साखरपुडा संपन्न झाला की फटाक्यांची आतिश बाजी,ढोल ताशांच्या गजरात ही मिरवणूक पुन्हा मंदिराजवळ आली,त्यानंतर पुजाऱ्यांनी पूजा अर्चा केली.

