- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
Author: दीपक मोहिते
संजय लांडगे,वाडा महिलांसाठी मोफत शिवणकला केंद्र, वाडा तालुक्यातील वावेघर येथील स्वामी समर्थ मंदिर येथे ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांना मोफत शिवण कला शिकता यावी,या उद्धेशाने काल स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्टतर्फे शिवणकला केंद्राचे उद्घाटन स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष कमलाकर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित महिलांना मोफत सॅनिटरी पॅडचे वाटपचे करण्यात आले. सदर शिवणकला केंद्राच्या उदघाटन प्रसंगी स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष कमलाकर पाटील, समाजिक कार्यकर्ते श्याम ठाकरे,गोवर्धन पटेल, सानिका गगे शिवणकला शिक्षिका आदी उपस्थित होते.
दीपक मोहिते, ” फ्रंटलाईन,” केंद्र सरकारचा जातनिहाय जनगणना करण्याचा स्वागतार्ह निर्णय, केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल पत्रकार परिषद घेऊन सरकारने जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे,अशी माहिती दिली.केंद्रसरकारच्या या निर्णयाचे देशभरातून स्वागत करण्यात येत आहे.गेल्या अनेक वर्षांपासून ही मागणी प्रलंबित होती.स्वातंत्र्योत्तर काळात होत असलेली ही पहिलीच जातनिहाय जनगणना आहे.यापूर्वी १९३१ मध्ये अशी जातनिहाय जनगणना झाली होती. आपल्या देशात ब्रिटिशांच्या काळात सर्वप्रथम १८७२ मध्ये जनगणना सुरू झाली.सन १९३१ पर्यंत ज्या ज्या वेळी इंग्रजांनी भारताची जनगणना केली.त्यामध्ये जातीसंदर्भातील माहितीची नोंदणी करण्यात आली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९५१ मध्ये जेव्हा भारताने पहिली जनगणना केली तेव्हा केवळ अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या…
दीपक मोहिते, ” कामगार दिन विशेष,” “१ मे जागतिक कामगार दिन ; कामगार जगला पाहिजे,” हा दिवस जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, यंदाही तो उत्साह कायम असला तरी सध्याच्या परिस्थितीत कामगारवर्ग भितीच्या सावटाखाली आहे. केंद्र व राज्यसरकार हे दोघेही भांडवलधारी व्यवस्थेकडे झुकू लागले आहेत.कामगार व शेतकरी हे एकेकाळी श्रमिक वर्गाचे प्रतिनिधित्व करत असत.पण आता काळ बदलत चालला आहे. उद्योग जगताचा डोलारा ज्या कामगार सामर्थ्यावर उभा असायचा, तसा तो उभा असल्याचे पाहायला मिळत नाही. आपली अंगमेहनत व बुद्धिक्षमता विकून महिन्याकाठी वेतन घेणाऱ्या घटकाचा कामगारवर्गात समावेश होतो.भांडवलदारांच्या उद्योगात राबून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणाऱ्या मजुरांचा ” कामगार,” अशी व्याख्या करण्यात आली होती.स्वातंत्र्यपूर्व…
दीपक मोहिते, ” राज्य निर्मिती विशेष, “महाराष्ट्र देशा,कणखर देशा,” आज राज्याचा ६६ वा वर्धापन दिन, त्यानिमित्ताने राज्यात दिवसभर शासकीय व बिगरशासकीय कार्यक्रमाची अक्षरशः रेलचेल असणार. १ मे १९६० रोजी आपल्या राज्याची निर्मिती झाली,त्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली,हजारो लोकांचे संसार,या आंदोलनात होरपळले,याची कल्पना सध्याच्या पिढीला नाही.महाराष्ट्रद्वेष्ट्या मूठभर काँग्रेस नेत्यांनी या आंदोलनाच्या दरम्यान किती अत्याचार केले,त्याची गोळाबेरीज करणेही शक्य नाही.आज राज्य देशात प्रगतीशील राज्य असले तरी,हल्लीचे राज्यकर्ते लचके तोडू लागले आहेत.देशाच्या एकूण महसुलापैकी आपले महाराष्ट्र राज्य ३३ % कर देते.मुंबई ही गेल्या काही वर्षांपासून देशाची आर्थिक राजधानी असून तिचे हे आर्थिक वैभव आता गटांगळ्या खाऊ लागले आहे.राज्याचे आर्थिक व औद्योगिकदृष्ट्या खच्चीकरण…
दीपक मोहिते, सुरेश कलमाडी यांना १५ वर्षानंतर क्लीनचीट ; कार्यकर्त्यांकडून जल्लोष ज्या कलमाडी विरोधात रान उठवण्यात आले, त्या कलमाडी यांना इडी व सीबीआय या दोन्ही तपास यंत्रणानी आता निर्दोष ठरवले आहे.२०१० सालच्या राष्ट्रकुल ( कॉमनवेल्थ ) स्पर्धां आयोजनातील कथित घोटाळ्याच्या प्रकरणात काँग्रेसचे माजी मंत्री सुरेश कलमाडी यांना अखेर क्लीनचीट मिळाली आहे. आर्थिक गैरव्यवहार आणि मनीलॉन्ड्रिंगच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडी ) कोर्टात क्लोजर रिपोर्ट सादर केल्यानंतर दिल्ली न्यायालयाने तो स्विकारला.या निर्णयानंतर पुण्यात कलमाडी समर्थक कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. २०१० मध्ये दिल्लीमध्ये कॉमनवेल्थ गेम्सचं आयोजन करण्यात आलं होतं.यावेळी विविध कंत्राटांचे वाटप करताना मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” राज व उद्धव यांची टाळी वाजेल,असे वाटत नाही… पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे आपल्या देशासमोर असलेले अनेक विषय विस्मरणात गेले.महागाई,बेरोजगारी, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे निर्यात धोरण व त्याचे होणारे संभाव्य परिणाम,इ.महत्वाच्या प्रश्नाचा त्यामध्ये समावेश आहे.या सर्व प्रश्नासोबत आणखी एक महत्वाचा राजकीय प्रश्नाचा त्यामध्ये समावेश आहे.तो म्हणजे राज व उद्धव ठाकरे यांचे एकत्र येणे,होय.ही चर्चा देखील आता मागे पडली आहे.हे दोघे भाऊ सध्या परदेश दौऱ्यावर आहेत.मे च्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात हे दोघेही मुंबईत परतणार आहेत.त्यानंतर हे दोघे भाऊ एकमेकांना टाळी देतात का ? याकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. राज यांनी पक्ष सोडताना ” माझा…
वसंत भोईर,वाडा गडांतरानंतरही टायर रिसायकलिंग कंपन्या जोमात तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात टायर रिसायकलिंगच्या कंपन्या सुरू असून या कंपन्यांच्या प्रदूषणामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. यासंदर्भात पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारात तक्रारी झाल्यानंतर अनेक टायर कंपन्यांवर गडांतर आले.तरीपण नव्याने असंख्य कंपन्यांचे उभारणीचे काम जोमाने सुरू आहे.यात प्रामुख्याने वडवली,दिनकर पाडा,तोरणे,सपना,वरले, कोणे,पालसई आदी गावांमध्ये नव्याने कंपन्या उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. त्यामुळे स्थानिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. या कंपन्यांमध्ये वारंवार अपघात होऊन अनेक कामगार जायबंदी झाले तर अनेकजण मृत्युमुखी पडल्याची अनेक उदाहरणे आहेत.प्रचंड होणाऱ्या प्रदूषणाने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.टायर कंपनीच्या प्रदूषणाने हैराण झालेल्या नागरिकांनी पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश…
दीपक मोहिते, शिवसेनेच्या( एकनाथ शिंदे गट ) नूतन कार्यालयाचे उद्घाटन, वसई -विरार शहर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे ( एकनाथ शिंदे गट) जिल्हाध्यक्ष निलेश तेंडोलकर यांनी पक्षबांधणी करण्यास सुरुवात केली आहे.या निवडणुकीत त्यांचा पक्षाने तीस ते चाळीस जागा लढवण्याची तयारी चालवली आहे. जिल्हाध्यक्ष निलेश तेंडोलकर हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात.एकसंघ सेनेत फूट पडली,तेंव्हा निलेश तेंडूलकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ दिली.अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना त्यांनी जिल्हा शिवसेनेची धुरा आपल्या खांद्यावर घेतली व यशस्वीपणे पार पाडली. आज त्यांच्या हस्ते निर्मळ नालासोपारा येथे पक्षाच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. सदर उद्घाटन प्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिवाकर सिंग…
वसंत भोईर,वाडा आंबा पीक पुरे,आता शेतकरी ड्रॅगन फ्रुट नाही तर स्ट्रॉबेरी लागवडीकडे वळत आहेत. हवामानात वारंवार होणाऱ्या बदलाचा परिणाम आंबा पिकावर होत असल्यामुळे आंबा पिकांचे उत्पादन घटत चालले आहे.त्याचा फटका बागायतदारांना बसत आहे. त्यामुळे काही प्रयोगशील शेतकऱ्यांनी नवीन फळांच्या लागवडीकडे आपले लक्ष वळवले आहे.स्ट्रॉबेरी,ड्रॅगन फ्रूट व मोसंबीची लागवड शेतकरी करू लागले आहेत. वाडा तालुक्यात पंधरा हजार पाचशे एकर क्षेत्रावर भात लागवड तर अठराशे हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड करण्यात येत असते. तालुक्यात सर्वाधिक लागवड आंबा पिकाची असून सुमारे सतराशे हेक्टर क्षेत्रावर ही लागवड करण्यात येते.काजू – ५० हे.नारळ – १५ हे.चिकू – ३५ हे.अशी वर्गवारी आहे.ही पिके तालुक्यातील बागायतदाराना बऱ्यापैकी आर्थिक…
दीपक मोहिते, ” बॉटमलाईन,” पहलगाम दहशतवादी हल्ला ; संवेदनशील प्रश्नाचा इव्हेन्ट होता कामा नये… काश्मीरच्या पहलगाम येथे घडलेल्या घटनेला आज आठ दिवस होत आले.पण आपल्या वृत्तवाहिन्यानी गेले आठ दिवस त्या घटनेचे पुराण २४ × ७ या न्यायाने दिवसरात्र चालवले.” पाकिस्तान घाबरला,त्यांचा लष्करप्रमुख बंकरमध्ये लपला,पंतप्रधान शहाबाज शरीफ यांचे कुटुंब परदेशात रवाना,पाक सैन्यात राजीनामा सत्र सुरू,सुमारे ४ हजार पाक सैनिकांनी युद्धाच्या भितीने राजीनामे दिले,पाकचे धाबे दणाणले,अशा आशयाच्या बातम्या दिवसभर चालवल्या.तर दुसरीकडे पाक सैन्याने अनेक भारतीय चौकीवर तुफान गोळीबार सुरू केला असून त्यास भारतीय सैन्यानेही जोरदार प्रत्युत्तर दिल्याच्या बातम्याही त्यांनी आपल्याला ऐकवल्या.या वृत्तवाहिन्यांनी पाकिस्तानने युद्धाचा धसका घेतल्याच्या बातम्यांचा अक्षरशः भडिमार केला.हा देखील एकप्रकारचा…
