संजय लांडगे,वाडा
महिलांसाठी मोफत शिवणकला केंद्र,
वाडा तालुक्यातील वावेघर येथील स्वामी समर्थ मंदिर येथे ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांना मोफत शिवण कला शिकता यावी,या उद्धेशाने काल स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्टतर्फे शिवणकला केंद्राचे उद्घाटन स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष कमलाकर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी उपस्थित महिलांना मोफत सॅनिटरी पॅडचे वाटपचे करण्यात आले.
सदर शिवणकला केंद्राच्या उदघाटन प्रसंगी
स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष कमलाकर पाटील, समाजिक कार्यकर्ते श्याम ठाकरे,गोवर्धन पटेल, सानिका गगे शिवणकला शिक्षिका आदी उपस्थित होते.

