दीपक मोहिते,
शिवसेनेच्या( एकनाथ शिंदे गट ) नूतन कार्यालयाचे उद्घाटन,
वसई -विरार शहर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे ( एकनाथ शिंदे गट) जिल्हाध्यक्ष निलेश तेंडोलकर यांनी पक्षबांधणी करण्यास सुरुवात केली आहे.या निवडणुकीत त्यांचा पक्षाने तीस ते चाळीस जागा लढवण्याची तयारी चालवली आहे.
जिल्हाध्यक्ष निलेश तेंडोलकर हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात.एकसंघ सेनेत फूट पडली,तेंव्हा निलेश तेंडूलकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ दिली.अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना त्यांनी जिल्हा शिवसेनेची धुरा आपल्या खांद्यावर घेतली व यशस्वीपणे पार पाडली.
आज त्यांच्या हस्ते निर्मळ नालासोपारा येथे पक्षाच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
सदर उद्घाटन प्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिवाकर सिंग तसेच ऍड.अनिल चव्हाण व वसई विधानसभा प्रमुख सॅमसंग व्हॉज तसेच संतोष जाधव जगताप,शिवसेना वसई उपशहर प्रमुख अभय गोडकर व स्थानिक निर्मळ विभागातील पदाधिकारी आणि इतर शिवसैनिक उपस्थित होते.

