वसंत भोईर,वाडा
आंबा पीक पुरे,आता शेतकरी ड्रॅगन फ्रुट नाही तर स्ट्रॉबेरी लागवडीकडे वळत आहेत.
हवामानात वारंवार होणाऱ्या बदलाचा परिणाम आंबा पिकावर होत असल्यामुळे आंबा पिकांचे उत्पादन घटत चालले आहे.त्याचा फटका बागायतदारांना बसत आहे. त्यामुळे काही प्रयोगशील शेतकऱ्यांनी नवीन फळांच्या लागवडीकडे आपले लक्ष वळवले आहे.स्ट्रॉबेरी,ड्रॅगन फ्रूट व मोसंबीची लागवड शेतकरी करू लागले आहेत.
वाडा तालुक्यात पंधरा हजार पाचशे एकर क्षेत्रावर भात लागवड तर अठराशे हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड करण्यात येत असते. तालुक्यात सर्वाधिक लागवड आंबा पिकाची असून सुमारे सतराशे हेक्टर क्षेत्रावर ही लागवड करण्यात येते.काजू – ५० हे.नारळ – १५ हे.चिकू – ३५ हे.अशी वर्गवारी आहे.ही पिके तालुक्यातील बागायतदाराना बऱ्यापैकी आर्थिक उत्पन्न मिळवून देतात.असे असले तरी हवामानात सतत होत असलेल्या बदलामुळे या पिकांची उत्पादन क्षमता धोक्यात आली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी लागवडीचे नवनवीन प्रयोग करण्यास सुरुवात केली आहे.
निसर्गाच्या लहरीपणाला कंटाळून काही शेतकऱ्यांनी कातळावर बैंगन फुड्स लागवड केली आहे.कातळ जमिनीवर पाण्याचे दुर्भिक्ष असले तरी बैंगन फूड लागवड यशस्वी होत आहे.
शासनाकडून फळबाग लागवडीसाठी अनुदान देण्यात येत आहे.त्याचा फायदा अनेक शेतकऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षापासून फळबाग लागवड क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.
पारंपारिक पद्धतीने शेती करण्याऐवजी शेतीमध्ये नवनवीन प्रयोग शेतकरी करू लागले आहेत.कमी श्रम व कमी खर्चात चांगले उत्पन्न मिळवण्यासाठी शेतकरी लागवडीसाठी पर्याय शोधत आहेत.मिश्र लागवड शेतकऱ्यांना दुहेरी उत्पन्न देणारी असूल्यामुळे शेतकऱ्यांचा अशा शेतीकडे कल वाढत आहे.
तालुक्यातील शेतकरीही फळलागवडीमध्ये नवनवीन प्रयोग करू लागले आहेत.ते यशस्वी ठरल्यामुळे अन्य शेतकरीही या लागवडीकडे वळू लागले आहेत.
– संजय घरत,कृषी अधिकारी

