- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- ” या चिमण्यानो, परत फिरा रे, “
- पालघर हॉस्पिटल मारहाण प्रकरण ; २१ आरोपीना पोलीस कोठडी,
- १७ खासदार करणार भाजपात प्रवेश,
- जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला धक्का ; सकल मराठा समाजाची फारकत,
- हुथी हे इराण – अमेरिका – इस्त्रायल युद्धात थेट सहभागी नाहीत, पण सतत दबाव टाकत असतात,
- आज पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता,
- यशस्वी जीवनाचे रहस्य,
- ब्रिक्स परिषदेचा भारताला मोठा फायदा होणार, वाढवण बंदरासाठी जगभरातून गुंतवणूकदार येणार, वसई व पालघर मधील तरुणांना ब्रिक्समध्ये स्टार्टअपची संधी मिळणार,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, ग्रामीण शिक्षणाच्या आयचा घो, काल अधिवेशनात राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील रिक्त जागांचा मुद्दा चांगलाच गाजला.काँग्रेसचे आ. विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारचे शिक्षण विभागाकडे लक्ष नसल्याचा थेट आरोप केला.अपुरा शिक्षकवर्ग,विद्यार्थ्यांच्या पटसंख्येमध्ये सतत होणारी घसरण व शाळा बंद पडण्याचे वाढते प्रमाण,लक्षात घेता राज्य सरकारचे ग्रामीण भागातील शिक्षणाकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा जो आरोप सातत्याने सरकार होत असतो,तो वस्तुस्थितीला धरून आहे. राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने राज्यातील ६०० जि.प.शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.गेल्या ६ डिसें.पासून या निर्णयाची अंमलबजावणी देखील सुरू झाली आहे.महत्प्रयासाने गेल्या वर्षी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला खरा,पण मराठी माध्यमाच्या शाळांना बळ देण्याऐवजी राज्य सरकार त्या बंद करण्यासंदर्भात…
दीपक मोहिते, ” शहाणपण,” भाजपने स्वबळाचा हट्ट अखेर सोडला… भाजप व शिवसेना ( शिंदे गट ) महायुतीमधील या दोन्ही पक्षानी स्थानिक स्वराज्य समित्यांच्या आगामी निवडणुका युतीच्या माध्यमातून लढवण्याचा निर्णय घेतला आहे.गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही पक्षात उफाळलेल्या अंतर्गत मतभेदाचे पडसाद या निवडणुकीत उमटतील,असे संकेत मिळाल्यानंतर या दोन्ही पक्षांना सुचलेले हे शहाणपण आहे.दुसरीकडे महाविकास आघाडी देखील या निवडणुका एकत्रितपणे लढवणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर शिंदे व भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण हे काल मुंबईत एकमेकांना भेटले व त्यांनी याविषयी प्रदीर्घ चर्चा केली. त्यांच्या या निर्णयामुळे या निवडणुकांमध्ये विरोधकांना जो मतविभागणीचा फायदा होणार होता,आता तो होण्याची शक्यता नाही. गेल्या काही महिन्यांपासून शिंदे गट…
दीपक मोहिते, निवडणुकीचे वेध, दीपक मोहीते, ” हल्लाबोल,” सवत फार काळ संसार करू शकत नाही… लोकसभा व विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर पालघर जिल्ह्यात भाजपने ” मिशन लोटस,” ( फोडाफोडीचे राजकारण ) दररोज कोण ना,कोण तरी आपल्या मूळ पक्षाला सोडचिट्ठी देऊन भाजपच्या तंबूत स्थलांतरीत होऊ लागला आहे.पण,घाऊक पद्धतीने भाजपची वाट धरणाऱ्या या गयारामांचे राजकीय भवितव्य हमखास धोक्यात येण्याची शक्यता आहे. वर्षानुवर्षे पक्षासाठी खस्ता खालेल्या प्रामाणिक कार्यकर्त्याना हा सारा प्रकार म्हणजे जेवणाच्या ताटातील कडीपत्तासारखा वाटतो आणि ते साहजिकच आहे.गेली साडेचार दशके पक्षाच्या उभारणीसाठी ज्यांनी अपार मेहनत घेतली,वेळप्रसंगी अनेक गुन्हे व न्यायालयीन खटले अंगावर घेतले.त्यांना जर जेवणाच्या ताटातील कडीपत्याप्रमाणे बाहेर टाकले जात…
संपादकीय लेख, उर्जानिर्मिती ; गेल्या आठ दशकात सरकारचे दिशाहीन धोरण, दीपक मोहिते, गेल्या आठ दशकात अनेक सरकारे आली आणि गेली,काँग्रेस,संपुआ व आता रालोआच्या काळात वित्त व मोदी सरकारच्या काळात नामकरण झालेले निती आयोग,असे एकूण १८ आयोग खर्ची पडले.पण ग्रामीण भागातील विजेचा प्रश्न मात्र सुटू शकला नाही.आजही ग्रामीण भागातील भूमिपुत्र,शेतकरी वीज व शेतीसिंचनाच्या पाण्यावाचून तडफडत आहे.आजवर एकाही सरकारला हे दोन्ही प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागावेत,असे वाटले नाही आणि आजही या महत्वाच्या प्रश्नाकडे लक्ष दिले जात नाही. रयतेची आशा व अपेक्षाना पायदळी तुडवणाऱ्या सरकारला आपण आपले हक्काचे सरकार असे म्हणू शकतो का ? ग्रामीण भागातील विजेचा प्रश्न दिवसेंदिवस अधिक जटील बनत चालला आहे.शहरी…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” भाजपची ” बी,” टीम,वसई तालुक्याच्या उंबरठ्यावर… ऑल इंडिया मुस्लिम इत्तेहादू मुसलमीन,या पक्षाचे पालघर जिल्ह्यात झालेले आगमन व त्यांच्या काल झालेल्या जाहीर सभेला तरुणांची झालेली लक्षणीय गर्दी,ही भल्याभल्या राजकीय नेत्यांची झोप उडवणारी अशीच होती.त्यांचे प्रदेशाध्यक्ष व छ.संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाझ जलील यांनी केलेले पहिले भाषण तरुणांमध्ये उत्साह वाढवणारे असेच होते.त्यांच्या या आगमनाचे भाजपने महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत आपली ” बी,” उतरवल्याची चर्चा सर्वत्र होत होती.तशी ती ” बी,” टीम असेल तर वसई तालुक्याची राजकीय समीकरणे बदलण्याची ती चिन्हे आहेत,असे समजायला हरकत नाही. वसई तालुक्याच्या शहरी व ग्रामीण भागात मुस्लिम व दलित समाजाची लोकसंख्या लक्षणीय असून हा समाज पूर्वी…
दीपक मोहिते, निवडणुकीचे वेध, वसई विरारमध्ये आम्ही मोठे भाऊ ; ठाकुरानी फासे फेकले… वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आतापासूनच शह – काटशहाच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे.बहुजन विकास आघाडीने पराभवाच्या भितीमुळे महाविकास आघाडीशी सोयरीक करण्याचे प्रयत्न चालवले आहेत.पण,ते कितपत यशस्वी ठरतील,हे आजच्या घडीला सांगणे कठीण आहे.पण,बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा असलेले हितेंद्र ठाकूर यांनी ” वसई विरारमध्ये आम्ही मोठे भाऊ,तर जिल्ह्यात लहान भावाच्या भूमिकेत असू,” असे जाहीर केल्यामुळे ही सोयरीक किती काळ टिकेल,हे सांगणे जरा कठीणच आहे.लग्नाच्या बोहोल्यावर चढण्यापूर्वीच मांडव तुटून पडण्याची शक्यता अधिक आहे. दुसरीकडे वसई विरार महानगरपालिकेच्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडी व महाविकास आघाडी हे दोघेही एकमेकांच्या कुबड्या…
दीपक मोहिते, ” फ्रंटलाईन,” भाग क्र.१, वर्चस्वाची लढाई कुठवर ? अवघे जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर… आंतरराष्ट्रीय स्तरावर गेल्या पाच वर्षात घडत असलेल्या अनेक घटनांमुळे जग हे आता तिसऱ्या महायुद्धाच्या दिशेने वाटचाल तर करू लागले नाही ना ? असा प्रश्न साहजिकच तुम्हा – आम्हा सर्वांच्या मनात उभा राहतो.रशिया – युक्रेन व इस्त्रायल – पॅलेस्टाईन दरम्यान सुरू असलेले युद्ध,हे संपूर्ण जगाची वाटचाल,ही त्याच दिशेने सुरू झाल्याचे पावलोपावली जाणवत आहे.दुसरीकडे अमेरिका देखील अधूनमधून इराणच्या इस्लामिक सरकार व अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारवर हल्ले चढवत असते.ही सर्व परिस्थिती जगाला युद्धाच्या खाईत ढकलणारी अशीच आहे.वरील चार देशात सुरू असलेल्या युद्धामुळे आजवर प्रचंड प्रमाणात नरसंहार झाला व आजही…
पालघर विशेष प्रतिनिधी, शिंदे गटाचेही भाजपापाठोपाठ फाडाफोडीचे राजकारण सुरु, भाजप पाठोपाठ शिवसेना शिंदे गटानेही बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्याना आपल्या गळाला लावण्यास सुरुवात केली आहे.दोनच दिवसापूर्वी वसई,नालासोपारा व नायगाव परिसरातील बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्याना भाजपने प्रवेश दिल्यानंतर काल शिंदे गटानेही ” हम भी कुछ कम नही,” हे दाखवून देण्यास सुरुवात केली आहे. काल नालासोपारा शहरातील आचोळे विभागातील बहुजन विकास आघाडीच्या एका माजी नगरसेविकासह तीन माजी नगरसेवकांची मुले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षात प्रवेश करते झाले. आचोळे,हा भाग बहुजन विकास आघाडीचा गड म्हणून ओळखला जात असे,पण गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत त्यांची चांगलीच पीछेहाट झाली.या प्रभागात फारशी विकासकामे न झाल्यामुळे हा…
दीपक मोहिते, ” बॉटमलाईन,” पापाचा घडा भरतो,तेंव्हा नियतीची कुऱ्हाड कोसळतेच…. दोन दिवसांपूर्वी वसई विरार शहर महानगरपालिकेच्या एका वादग्रस्त व भ्रष्ट असलेल्या प्रभारी सहा.आयुक्ताला पोलिसांनी गजाआड केले.हा अधिकारी गेल्या काही वर्षांपासून आपल्या भ्रष्ट कारभारामुळे वादग्रस्त ठरला होता.वास्तविक त्याच्यावर यापूर्वीच कारवाई व्हायला हवी होती.पण,त्याला सत्ताधारी पक्षातील एका बड्या नेत्याचे संरक्षण असल्यामुळे आयुक्त व अतिरिक्त आयुक्त त्याच्यावर कारवाई करण्यास धजावत नव्हते.या नेत्यामुळेच त्याला अनेक मलईदार प्रभाग समित्या लाभल्या.या अधिकाऱ्याला पोलिसांनी आपला हिसका दाखवला तर त्याच्या पाठीशी असलेल्या राजकीय नेत्याचा काळाकुट्ट चेहरा समोर येऊ शकेल. या भ्रष्ट अधिकाऱ्यामुळे १७ निष्पाप नागरिकांचा नाहक बळी गेला.एकेकाळी नवघर – माणिकपूर नगरपरिषदेत लिपिक पदावर काम करणाऱ्या नालायक माणसाला…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” … मग हे सरकार,” गतिमान,” कसे ? गेल्या दोन दिवसांपासून फडणवीस सरकारच्या वर्षपूर्तीचे सोहळे राज्यात वाजत गाजत साजरे होत आहेत.त्यासाठी राज्यात सर्वत्र मोठमोठ्या जाहिराती झळकत आहेत.त्यांचे सरकार किती गतिमान आहे,याविषयी महायुतीचे नेते सध्या गोडवे गात आहेत.अनेक नेत्यानी आपल्या सरकारला दहापैकी दहा गुण देखील देऊन टाकले.परंतु फडणवीस सरकारच्या राज्यात सर्वसामान्य लोकांच्या दैनंदिन जीवनात भेडसावणारे किती प्रश्न मार्गी लावले,शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या का ? महागाई कमी झाली का ? वर्षभरात किती रोजगारनिर्मिती झाली ? राज्यातील गुन्हेगारी कमी झाली का ? भ्रष्टचारावर नियंत्रण आले का ? या सर्व प्रश्नाची उत्तरे केवळ नकारार्थीच मिळतात.मग हे सरकार गतिमान कसे,असा प्रश्न आमच्यासारख्या सर्वसामान्य…
