- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- ठाकूर यांचा संताप ; हार्दिक राऊत यांच्या पथ्यावर पडणार ?
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
Author: दीपक मोहिते
शशिकांत ठाकूर,कासा घोळ टोल नाक्याजवळ लाखों रु.चा खैराचा माल जप्त, मुंबई-अहमदाबाद महामार्गावर घोळ टोलनाक्याजवळ काल मोठी कारवाई करत आठ लाख रु.चा अवैध वाहतूक करणारा खैर जप्त करण्यात आले.सदर कारवाई वनविभागाच्या गस्त पथकाने केली आहे.यामध्ये मालासह अवैध वाहतूक करणारा ट्रक जप्त करण्यात आला आहे. सदर ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणावर खैर सापडला असून या प्रकरणात ट्रकचालक सरफुद्दीन शेख याला ताब्यात घेण्यात आले आहे.मात्र,या तस्करीमागचा मुख्य सूत्रधार अद्याप फरार असल्याचे समजते.यामागे मोठी टोळी असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सदर कारवाई कासा वन परीक्षेत्रातील वनक्षेत्रपाल एन.ए.हिरे यांच्या नेतृत्वाखाली वनपाल जे.के.चौधरी एम.ए. कांबळे आणि वनरक्षक आर. एस.हाडळ,वाय.पी.मोळे, यांच्या पथकाने केली.
वसंत भोईर,वाडा वाड्यात भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस साजरा, जगातील सर्वांत मोठ्या, सुसंस्कृत आणि विकासाचे दृष्टिकोन असलेल्या भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस आज सकाळी वाडा येथील जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात श्रीरामांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी तालुका सरचिटणीस रोहन पाटील यांच्या हस्ते कार्यालयावर पक्षध्वज फडकवण्यात आला. भाजपा पक्षाने देशाला अनेक विधायक गोष्टी देऊन जगात भारतीयांची मान अभिमानाने उंचावण्याचे काम केले आहे.देशाच्या उभारणीत मोठे योगदान दिले आहे.राष्ट्र प्रथम,सेवाभाव सर्वोच्च, देव ,देश,आणि हिंदुधर्म संरक्षित व सुरक्षित करण्याचे काम भाजपने केले आहे.कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणजे भाजप अशी त्याची जनमानसात आज ओळख आहे. याप्रसंगी जेष्ठ नेत्या शुभांगी…
वसंत भोईर,वाडा अद्रक लावणाऱ्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी, तालुक्यात काही शेतकरी अद्रकची लागवड करतात. गतवर्षी बारा,पंधरा हजारांचा पल्लागाठत अद्रकने अनेक शेतकऱ्यांना मालामाल केले होते.परिणामी,यंदा काही शेतकऱ्यांनी अद्रकची लागवड केली.परंतु सडीचे प्रमाण वाढल्याने अद्रकची माती झाली.भावही पडला,त्यामुळे विकतचे बेणे आणून अद्रक लावणाऱ्यांना मागील वर्षीच्या तुलनेत कमी नफा झाला. अद्रक म्हणजे आल्याची लागवड करण्यासाठी उष्ण व दमट हवामान असलेली जागा लागते.आल्याची लागवड मार्च -एप्रिल मध्ये केली जाते.हे पीक घेण्याचा कालावधी साधारणपणे आठ ते दहा महिने असतो.दोन ओळींमध्ये अद्रक लागवड केली जाते. तालुक्यात नदीकाठचे काही शेतकरी अद्रकची लागवड करत आहेत.ही लागवड साधारणतः पहिला पाऊस पडल्यानंतर शेतकरी करतात. कृषी विभागाचे मार्गदर्शन व अनुभवाच्या जोरावर अद्रक…
जव्हार प्रतिनिधी, सहा.जिल्हाधिकारी करिश्मा नायर यांचा शुभेच्छा समारंभ उत्साहात साजरा, प्रकल्प अधिकारी तथा सहा. जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या करिश्मा नायर ( भा.प्र.से ) यांची पदोन्नती होऊन त्यांची नाशिक महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.त्यांच्या सन्मानार्थ शुभेच्छा समारंभाचे आयोजन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, जव्हार येथे करण्यात आले होते. या समारंभाचे अध्यक्षस्थान विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचे आ.हरिश्चंद्र भोये यांनी भूषवले.आ.भोये यांनी करिश्मा नायर यांनी आदिवासी भागात केलेल्या उल्लेखनीय कार्याची प्रशंसा केली. “ त्या एक संवेदनशील आणि कर्तव्यदक्ष अधिकारी असून,त्यांच्या कार्याचा ठसा हा जव्हारकरांच्या मनात सदैव राहील,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले. करिश्मा नायर यांच्या कार्यकाळात प्रकल्पातील शासकीय आश्रमशाळांमध्ये भौतिक सुविधांचा विकास,…
जव्हार प्रतिनिधी, जव्हार-गरदवाडी येथे विहिरीचे लोकार्पण, ग्रामपंचायत कासटवाडीचे सरपंच कल्पेश विनायक राऊत यांच्या अथक प्रयत्नातून आणि ग्रामविकासाच्या दृष्टीने केलेल्या योजनाबद्ध कामामुळे मौजे गरदवाडी येथील आंब्याच्या पाडा परिसरात नवीन विहिरीचे लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला. या लोकार्पण सोहळ्याला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. गरदवाडीतील कातकरी वस्तीतील पाण्याची टंचाई लक्षात घेता विहीर हा गावासाठी एक महत्त्वाचा आणि अत्यावश्यक प्रकल्प होता.ग्रामपंचायतच्या १५ वा वित्त आयोगाचा निधी तसेच शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून या विहिरीचे काम पूर्ण करण्यात आले.या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी होणाऱ्या त्रासातून मुक्तता मिळणार आहे.गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सरपंच कल्पेश राऊत यांनी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना, आदिवासी विकास विभाग, पीएम जनमन,आदी-आदर्श,…
जव्हार प्रतिनिधी, विद्यार्थी केंद्रित गुणवत्ता वाढीसाठी जव्हार शिक्षण विभागाने सुरू केला उपक्रम, पंचायत समिती जव्हार जिल्हा पालघर प्राथमिक शिक्षण विभाग आयोजित अध्ययन साहित्य नवनिर्मिती योजना -कार्यशाळा, प्रदर्शन २०२४- २५ मोठ्या उत्साहात पार पडला.यावेळी पंचायत समिती जव्हारच्या गटशिक्षणाधिकारी विजया टाळकुटे व मनीषा डांगे, विस्तार अधिकारी ( शिक्षण विभाग ) केंद्रप्रमुख,शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी विजया टाळकुटे यांनी केले.यावेळी कार्यक्रमाचे प्रस्ताविक मनीषा डांगे यांनी केले.त्यानंतर गटशिक्षणाधिकाऱ्यानी विद्यार्थी व शिक्षक यांना अध्ययन साहित्य नवनिर्मिती योजना कार्यशाळा, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची अध्ययनशीलता वाढवणे, शैक्षणिक गुणवत्ता उंचावणे, अध्ययन प्रक्रिया आनंददायी सुलभ करणे,अध्ययनातले अडथळे दूर करणे,अशा उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात येत…
शुभम सावंत,विरार उत्कर्ष महाविद्यालयात करिअर मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न, विरारच्या विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट संचालित कै. पांडुरंग रघुनाथ पाटील उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालयात नुकताच बारावीनंतर विवा महाविद्यालयात शिकवण्यात येणाऱ्या विषयावर ” करिअरचे पर्याय,” या विषयावर सेमिनार घेण्यात आला.यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून विवा लॉ कॉलेजचे प्राचार्य ठाकूर जेठानी,विवा कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंटचे प्राचार्य वैभव पाटील,बँकिंग आणि इन्शुरन्स विषय विभागप्रमुख डॉ.रोशनी नागर,विवा पदवी महाविद्यालयाच्या प्रा.सॅन्ड्रा आल्मेडा,डेटा सायन्सच्या विषय विभाग प्रमुख प्रा.श्वेता यंदे यांचे उत्तम मार्गदर्शन लाभले.उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या मुग्धा लेले,उपप्राचार्य रमेश पाटील,उपप्राचार्या हेमा पाटील यांनी करिअर सेमिनार या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला कल्पना राऊत मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.या करिअर सेमिनारचा लाभ…
दीपक मोहिते, राजकीय वाव व्यवसायिक स्वार्थापोटी अनेक कुटुंबे दुभंगली, हल्लीच्या काळात रक्ताच्या नात्यापेक्षा सत्तेचा हव्यास व स्वार्थ मोठा ठरला आहे.राजकारणात शिरलेल्या घराणेशाही प्रवृत्तीमुळे आज अनेक कुटुंबे दुभंगली गेली आहेत.भाजप हा काँग्रेस पक्षातील घराणेशाहीवर आजवर टीकेची झोड उठवत होता,पण आज त्या पक्षालाही घराणेशाहीचा शाप लागला आहे.मात्र याच घराणेशाहीमुळे राजकीय क्षेत्रात वावरणारी अनेक कुटुंबे उध्वस्त झाली.त्यामध्ये गांधी,ठाकरे,मुंडे ही तर व्यवसायिक क्षेत्रातील अंबानी,हिरानंदानी,केसरी पाटील टूर्स,सिंघानिया व हावरे कुटुंबाचा त्यामध्ये समावेश आहे.सत्ता व अधिकार यांचे समान वाटप होत असेस्तोवर ही कुटुंबे एकत्रित होती.पण कालांतराने गृहकलहाची वात पेटली व कुटुंबे दुभंगली.सत्ता व स्वार्थ,अशा दोन कारणामुळे हे सारं घडतंय.आपल्या कुटुंब व्यवस्थेत आता मी व माझे कुटुंब…
दीपक मोहिते, ” ये रे माझ्या मागल्या,” …आणि आमच्या मराठी अस्मितेचा कडेलोट झाला, मनसेचे नेते राज ठाकरे यांनी पुन्हा कोलांटी उडी मारल्यामुळे मनसे सैनिक सध्या संभ्रमावस्थेत सापडले आहेत.गुढीपाडव्याच्या दिवशी शिवतीर्थावर झालेल्या मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात मनसे सैनिकांना आदेश दिला होता की ” बँकेचे व्यवहार मराठी भाषेत होतो की नाही तपासा,आणि नसेल होत तर त्यांच्या अधिकाऱ्यांना योग्य ती समज द्या.” त्यांच्या या आदेशानुसार मनसे सैनिकांनी बँकेत ” खळखट्याक,” सुरू केले. सलग दोन दिवस हा खेळ सुरू होता.दरम्यान मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी डोळे वटारत ” कोण कायदा हातात घेत असेल तर कठोर कारवाई करू,” असा इशारा दिल्यानंतर राज ठाकरे…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” भाग क्र.१ ” ट्रम्प,ट्रम्प,” असे कोकलणाऱ्या पंतप्रधान मोदी यांना ट्रम्प यांनी चांगलाच धोबीपछाड दिला.. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाची झोप उडवली आहे.त्यांच्या एका निर्णयाने अमेरिकेशी व्यापार करणारे सारे देश भितीच्या सावटाखाली आले आहेत.ट्रम्प यांनी २६ % आयात शुल्क लावण्याचा निर्णय घेतल्यामुळे अनेक देशाची आर्थिक घडी विस्कळीत होण्याची भिती सर्वत्र व्यक्त होत आहे.त्यांच्या या निर्णयामुळे अमेरिकेच्या बाजारात भारतीय वस्तू प्रचंड महाग होतील व त्याचा थेट फायदा त्यांच्या देशातील उत्पादकांना होणार आहे.यातून ट्रम्प सरकारला प्रचंड असा महसूल मिळणार आहे.या सर्व घडामोडीमुळे भारतीय व्यापारी व शेतकरी उध्वस्त होणार आहेत.मोदी सरकारच्या कृषीविषयक दिशाहीन धोरणामुळे कृषी क्षेत्र गेल्या दहा वर्षांपासून…
