जव्हार प्रतिनिधी,
विद्यार्थी केंद्रित गुणवत्ता वाढीसाठी जव्हार शिक्षण विभागाने सुरू केला उपक्रम,
पंचायत समिती जव्हार जिल्हा पालघर प्राथमिक शिक्षण विभाग आयोजित अध्ययन साहित्य नवनिर्मिती योजना -कार्यशाळा, प्रदर्शन २०२४- २५ मोठ्या उत्साहात पार पडला.यावेळी पंचायत समिती जव्हारच्या गटशिक्षणाधिकारी विजया टाळकुटे व मनीषा डांगे, विस्तार अधिकारी ( शिक्षण विभाग ) केंद्रप्रमुख,शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी विजया टाळकुटे यांनी केले.यावेळी कार्यक्रमाचे प्रस्ताविक मनीषा डांगे यांनी केले.त्यानंतर गटशिक्षणाधिकाऱ्यानी विद्यार्थी व शिक्षक यांना अध्ययन साहित्य नवनिर्मिती योजना कार्यशाळा, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची अध्ययनशीलता वाढवणे, शैक्षणिक गुणवत्ता उंचावणे, अध्ययन प्रक्रिया आनंददायी सुलभ करणे,अध्ययनातले अडथळे दूर करणे,अशा उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे,असे सांगितले.सदर उपक्रम शाळास्तरावर यापुढेही ही सुरू राहणार आहे.या उपक्रमात तालुक्यातील ३० जिल्हा परिषद शाळेमधील ३०० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते.या उपक्रमात विविध विषयांवर अध्ययन साहित्य विद्यार्थ्यांनी तयार केले.यापूर्वी शिक्षक केंद्रित शैक्षणिक साहित्य तयार होत होते,मात्र या उपक्रमाचे वैशिष्ट्य असे की विद्यार्थी केंद्रित अध्ययन साहित्याची निर्मिती करण्यात आली.तयार केलेल्या उपकरणे व माॅडेलचे प्रदर्शन भरवण्यात आले होते.अध्ययन साहित्याचा डेमो विद्यार्थी आणि शिक्षक यांनी दिला. कार्यक्रमाच्या शेवटी सहभागी विद्यार्थ्यांना त्यांनी बनवलेले अध्ययन साहित्य सुपूर्त करण्यात आले.तसेच विद्यार्थी व शिक्षकांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती.आभार केंद्रप्रमुख चंदनसिंग जगताप यांनी मानले.या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये अध्ययनशीलता, विचार, जिज्ञासा आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढ होण्यास मदत होणार आहे.

