वाडा प्रतिनिधी,
ग्रीन सोल फाउंडेशनच्या ब्रँड अँम्बेसेंडरपदी मोहन पाटील,
वाडा तालुक्यातील चिंचघर येथील रहीवासी व पेशाने शिक्षक असलेले मोहन पाटील (गुरुजी) यांची मुंबई येथील एका कार्यक्रमात ग्रीन सोल फाउंडेशनच्या ब्रँड अँम्बेसिडरपदी निवड करण्यात आली.यावेळी फाउंडेशनतर्फे पाटील यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
ग्रीन सोल फाउंडेशनच्या ब्रँड अँम्बेसिडरपदी झालेली निवड ही त्यांची प्रतिभा,मेहनत आणि समर्पणाचे हे एक उत्तम फळ आहे.मोहन पाटील हे गेली ३० वर्ष आदिवासी भागात प्राथमिक शिक्षक म्हणून काम करत आहेत. ग्रामीण भागातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी ते अहोरात्र झटत असतात. गेल्या काही वर्षांपासून ग्रीन सोल फाउंडेशनमध्ये कोऑडिनेटर म्हणून काम करत असताना पालघर व ठाणे जिल्ह्यातील हजारो गरीब व गरजू विद्यार्थ्यांना पाटील यांच्या माध्यमातून दप्तर,चप्पल, चटई यासारखे शैक्षणिक साहित्य वाटप केले गेले आहे. ग्रीन सोल ही वंचित घटकांसाठी काम करणारी संस्था आहे.या संस्थेच्या उपक्रमांतून गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत शालेय साहित्य आणि चप्पल यासारख्या जीवनावश्यक गोष्टींचे मोफत वितरण केले जाते.या कार्यात मोहन पाटील यांचे योगदान मोलाचे ठरले असून त्यांच्या अथक मेहनतीला आणि निस्वार्थ सेवेला संस्थेने उच्च सन्मान देत त्यांना ब्रँड अँम्बेसेडर म्हणून सन्मानित केले आहे. समर्पित भावनेने सेवा करणा-या पाटील यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

