तलासरी प्रतिनिधी,
गांगणगावात रंगली आंतरशालेय वारली चित्रकला स्पर्धा,
ज्ञानमाता सदन सोसायटी संचालित अकरा प्राथमिक शाळा,चार हायस्कूल आणि दोन ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरशालेय वारली चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.जगभरात नावारूपाला आलेली वारली चित्रकला जतन आणि संवर्धन करण्याच्या उदात्त हेतूने दरवर्षी वारली चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.
यंदा सेवा विद्यामंदिर गांगणगाव येथे ही स्पर्धा पार पडली.आंतरशालेय वारली चित्रकला स्पर्धेत प्राथमिक गटात २२,माध्यमिक गटात ८ तर ज्युनिअर कॉलेज गटात ४ स्पर्धक असे एकूण ३० स्पर्धक सहभागी सहभागी झाले होते. निसर्ग व पर्यावरण रक्षण,
ज्ञानमाता -शिक्षण योगदान / शताब्दी वर्ष,
मानवाचे अस्तित्व व वैज्ञानिक प्रगती,वारली सण-उत्सव व चालीरीती आदी विषयांवर मुलांनी मुक्त कला प्रदर्शन केले.या स्पर्धेचे परीक्षण प्रसिद्ध वारली चित्रकार संपत ठाणकर व रीना उंबरसाडा,दिनेश घरत यांनी केले.
सर्व विजेत्यांना शाळेचे मुख्याध्यापक तसेच परीक्षक यांच्या हस्ते
सन्मानचिन्ह,प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले.याप्रसंगी मार्गदर्शक शिक्षक उपस्थित होते.

