वसंत भोईर,वाडा
शिक्षकांनी केवळ ज्ञानदान नव्हे तर मूल्यसंस्काराची जबाबदारी पार पाडली पाहीजे,
सरकारी शाळेतील शिक्षक हे विद्यार्थ्याप्रति प्रामाणिक, निस्पृह व समर्पित असतात. त्यांनी केवळ ज्ञानदान नव्हे तर मूल्यसंस्कारांची जबाबदारी पार पाडली पाहीजे.,असे प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ वारे गुरूजी यांनी चिंचघर येथील नॅशनल एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात शिक्षकांना मार्गदर्शन करतांना गुरूतत्व २०२५ या कार्यक्रमात केले.
          गुरूतत्व २०२५ या कार्यक्रमात पुढे बोलतांना वारे गुरजीं म्हणाले,विद्यार्थ्यांच्या समृद्ध भविष्यासाठी शिक्षकांनी भेदभाव न करता केवळ त्यांच्या उज्ज्वलतेसाठी काम करावे.हेच गुरूतत्वचे खरे मर्म आहे.शाळेतील बहुभाषिक विद्यार्थी,दुर्गम भाग आणि अपु-या भौतिक सुविधा या बाबी आव्हान नसून त्याला संधी मानून काम केले पाहीजे. प्रतिकूल परिस्थितीला नावे न ठेवता,आहे ती परिस्थिती स्विकारून शिक्षकांनी ती बदलली पाहीजे आणि ती बदलण्याचे काम केवळ शिक्षकच करू शकतात.
          परिषदेत भारतीय शिक्षण प्रणालीची पुर्नरकल्पना मांडण्यात आली. डिजिटल शिक्षणाचे आव्हान स्विकारुन मूल्याधारीत शिक्षणावर भर देत जागतिक स्तरावरील शाळा शक्य आहेत.यावर सखोल विचार मांडण्यात आले.
         परिषदेचे संचालन अर्चना चौधरी यांनी केले तर आयोजक,मान्यवर आणि उपस्थितांचे आभार राजन गरूड यांनी मानले.

 
									 
					

