वसंत भोईर,वाडा
अद्रक लावणाऱ्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी,
तालुक्यात काही शेतकरी अद्रकची लागवड करतात. गतवर्षी बारा,पंधरा हजारांचा पल्लागाठत अद्रकने अनेक शेतकऱ्यांना मालामाल केले होते.परिणामी,यंदा काही शेतकऱ्यांनी अद्रकची लागवड केली.परंतु सडीचे प्रमाण वाढल्याने अद्रकची माती झाली.भावही पडला,त्यामुळे विकतचे बेणे आणून अद्रक लावणाऱ्यांना मागील वर्षीच्या तुलनेत कमी नफा झाला.
अद्रक म्हणजे आल्याची लागवड करण्यासाठी उष्ण व दमट हवामान असलेली जागा लागते.आल्याची लागवड मार्च -एप्रिल मध्ये केली जाते.हे पीक घेण्याचा कालावधी साधारणपणे आठ ते दहा महिने असतो.दोन ओळींमध्ये अद्रक लागवड केली जाते. तालुक्यात नदीकाठचे काही शेतकरी अद्रकची लागवड करत आहेत.ही लागवड साधारणतः पहिला पाऊस पडल्यानंतर शेतकरी करतात. कृषी विभागाचे मार्गदर्शन व अनुभवाच्या जोरावर अद्रक लागवडीतून नफा कमवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
सध्या कर्नाटक राज्यातून अद्रकची आवक मोठ्या प्रमाणात बाजारात होत आहे. वाशी मार्केटमधून इतर ठिकाणी अद्रकचा पुरवठा केला जातो.
एक वर्ष अद्रकची लागवड केल्यानंतर अनेकजण बेणे जपून ठेवतात.त्यामुळे पुढील हंगामात बियाणांच्या खर्चाची बचत होते.अनेक शेतकरी बेणे राखून ठेवतात. अनेक शेतकरी नवे वेणे वापरतात.
आल्याची लागवड पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत केली जाते.ही लागवड ओळींमध्ये ३० से.मी. अंतरावर आणि ओळीत वीस ते पंचवीस से.मी.अंतरावर केली जाते.पीक लागवडीसाठी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते.
तालुक्यात खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो.त्यामुळे अद्रकच्या खोडाला सड लागते.यात पीक नष्ट होते.गेल्या हंगामाच्या तुलनेत या हंगामात सडीचे प्रमाण ४०% दिसून आले.
अद्रक लागवड ते काढणीपर्यंत चा एकरी एकूण खर्च दोन लाखांच्या वर जातो.संपलेल्या हंगामात शेतकऱ्यांना एकरी बराच खर्च आला; परंतु नफा मात्र ५० हजार रु.इतकाच च मिळाला.
अद्रकाची शेती कमी पावसाच्या क्षेत्रात फायदेशीर ठरू शकते.दरवर्षी बेणेच्या किमती कमी जास्त होत असतात.त्यानुसार पीक लागवडीचा खर्च कमी अधिक होत असतो.
– किशोर पाटील, शेतकरी

