शशिकांत ठाकूर,कासा
घोळ टोल नाक्याजवळ लाखों रु.चा खैराचा माल जप्त,
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर घोळ टोलनाक्याजवळ काल मोठी कारवाई करत आठ लाख रु.चा अवैध वाहतूक करणारा खैर जप्त करण्यात आले.सदर कारवाई वनविभागाच्या गस्त पथकाने केली आहे.यामध्ये मालासह अवैध वाहतूक करणारा ट्रक जप्त करण्यात आला आहे.
सदर ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणावर खैर सापडला असून या प्रकरणात ट्रकचालक सरफुद्दीन शेख याला ताब्यात घेण्यात आले आहे.मात्र,या तस्करीमागचा मुख्य सूत्रधार अद्याप फरार असल्याचे समजते.यामागे मोठी टोळी असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सदर कारवाई कासा वन परीक्षेत्रातील वनक्षेत्रपाल एन.ए.हिरे यांच्या नेतृत्वाखाली वनपाल जे.के.चौधरी एम.ए. कांबळे आणि वनरक्षक आर. एस.हाडळ,वाय.पी.मोळे,
यांच्या पथकाने केली.

