जव्हार प्रतिनिधी,
जव्हार-गरदवाडी येथे विहिरीचे लोकार्पण,
ग्रामपंचायत कासटवाडीचे सरपंच कल्पेश विनायक राऊत यांच्या अथक प्रयत्नातून आणि ग्रामविकासाच्या दृष्टीने केलेल्या योजनाबद्ध कामामुळे मौजे गरदवाडी येथील आंब्याच्या पाडा परिसरात नवीन विहिरीचे लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला. या लोकार्पण सोहळ्याला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
गरदवाडीतील कातकरी वस्तीतील पाण्याची टंचाई लक्षात घेता विहीर हा गावासाठी एक महत्त्वाचा आणि अत्यावश्यक प्रकल्प होता.ग्रामपंचायतच्या १५ वा वित्त आयोगाचा निधी तसेच शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून या विहिरीचे काम पूर्ण करण्यात आले.या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी होणाऱ्या त्रासातून मुक्तता मिळणार आहे.गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सरपंच कल्पेश राऊत यांनी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना, आदिवासी विकास विभाग, पीएम जनमन,आदी-आदर्श, जिल्हा नियोजन,डोंगरी योजना अशा विविध योजना ग्रामपंचायतीत आणल्या.या योजनांच्या माध्यमातून पायाभूत सुविधांची उभारणी वेगाने सुरु आहे.कातकरी वस्तीमध्ये नवीन विहीर, अंगणवाडी,बहुउद्देशीय हॉल अशा कामांचा समावेश असून, ही कामे लवकरच पूर्ण होणार आहेत.या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी सरपंच कल्पेश राऊत,उपसरपंच त्रिंबक रावते,ग्रामपंचायत सदस्य शंकर इल्हात,सुचिता होळकर तसेच गावातील अनेक मान्यवर,ग्रामस्थ आणि महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.सर्वांनी सरपंच राऊत यांच्या कार्याची प्रशंसा करत आगामी काळातही अशीच विकासकामे होत राहतील अशी अपेक्षा व्यक्त केली.

