शुभम सावंत,विरार
उत्कर्ष महाविद्यालयात करिअर मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न,
विरारच्या विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट संचालित कै. पांडुरंग रघुनाथ पाटील उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालयात नुकताच बारावीनंतर विवा महाविद्यालयात शिकवण्यात येणाऱ्या विषयावर ” करिअरचे पर्याय,” या विषयावर सेमिनार घेण्यात आला.यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून विवा लॉ कॉलेजचे प्राचार्य ठाकूर जेठानी,विवा कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंटचे प्राचार्य वैभव पाटील,बँकिंग आणि इन्शुरन्स विषय विभागप्रमुख डॉ.रोशनी नागर,विवा पदवी महाविद्यालयाच्या प्रा.सॅन्ड्रा आल्मेडा,डेटा सायन्सच्या विषय विभाग प्रमुख प्रा.श्वेता यंदे यांचे उत्तम मार्गदर्शन लाभले.उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या मुग्धा लेले,उपप्राचार्य रमेश पाटील,उपप्राचार्या हेमा पाटील यांनी करिअर सेमिनार या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला कल्पना राऊत मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.या करिअर सेमिनारचा लाभ उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालयाच्या अनेक विद्यार्थ्यांनी घेतला.सदर कार्यक्रमाचे आयोजन प्रा.ओल्गा डिमेलो यानी केले.याकामी प्रा.योगेश चौधरी व प्रा.श्रद्धा पाटील यांचे विशेष सहकार्य मिळाले.

