वसंत भोईर,वाडा
वाड्यात भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस साजरा,
जगातील सर्वांत मोठ्या, सुसंस्कृत आणि विकासाचे दृष्टिकोन असलेल्या भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस आज सकाळी वाडा येथील जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात श्रीरामांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी तालुका सरचिटणीस रोहन पाटील यांच्या हस्ते कार्यालयावर पक्षध्वज फडकवण्यात आला.
भाजपा पक्षाने देशाला अनेक विधायक गोष्टी देऊन जगात भारतीयांची मान अभिमानाने उंचावण्याचे काम केले आहे.देशाच्या उभारणीत मोठे योगदान दिले आहे.राष्ट्र प्रथम,सेवाभाव सर्वोच्च, देव ,देश,आणि हिंदुधर्म संरक्षित व सुरक्षित करण्याचे काम भाजपने केले आहे.कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणजे भाजप अशी त्याची जनमानसात आज ओळख आहे.
याप्रसंगी जेष्ठ नेत्या शुभांगी उत्तेकर,ॲड.संतोष डेंगाणे, मिलिंद वाडेकर,युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस कुणाल साळवी,तालुका सरचिटणीस रोहन पाटील,महीला आघाडी जिल्हा सरचिटणीस अर्चना भोईर,महीला आघाडी तालुकाध्यक्षा अंकिता दुबेले, नगरसेविका अंजनी पाटील,नयना इंगळे,ज्योती भानुशाली,हर्षल खांबेकर,मोनिष पाटील, कांतीलाल गोरे,कल्पेश पाटील आदी मान्यवरांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

