- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- ” होय, मी व्हेंटिलेटरवर असलेल्या महानगरपालिकेचा सन्माननिय नागरिक आहे, “…
- यंदाचा पाऊस भातशेतीला दिलासा देणारा….
- मी ज्या नालासोपारा मतदारसंघातून येतो…
- ठाणे जिल्हा मध्य.सह.बँक निवडणूक ; सहकार पॅनलचे निर्विवाद वर्चस्व,
- राजकारण्यांनी पत्रकारांची किंमत केली आहे,
- ” सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही, “
- २५ जून १९७५ ; आणीबाणीच्या कटू आठवणीना उजाळा,
- ठाकूर यांचा संताप ; हार्दिक राऊत यांच्या पथ्यावर पडणार ?
Author: दीपक मोहिते
सुरेश काटे,तलासरी तलासरीत बालविवाह नाही, पण अल्पवयीन मातांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ, कायद्याने बालविवाहावर बंदी असल्यामुळे हल्ली बाल विवाह होत नाहीत.तलासरी सारख्या आदिवासी भागात बाल विवाह होत नसले तरी अल्पवयात प्रेमसंबंधामुळे माता होण्याचे प्रमाण वाढले आहे. प्रेमसंबंधाने विवाह न करता अल्पवयातच तरुण – तरुणी एकत्र राहत असल्यामुळे अल्पवयीन माताचे प्रमाण तलासरी भागात मोठया प्रमाणात वाढले आहे.अशी स्थिती असतानाही आरोग्य विभागाच्या दप्तरी मात्र केवळ ४० अल्पवयीन मातांची नोंद आहे.यामध्ये उधवा प्राथमिक आरोग्य केंद्र ०३,वसा प्राथमिक आरोग्य केंद्र ०६, सूत्रकार प्राथमिक आरोग्य केंद्र ११,आमगाव प्राथमिक आरोग्य केंद्र २०,अशी आकडे वारी असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी दिली. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती आणि…
दीपक मोहिते, एकनाथ शिंदे व अजित पवार गटाच्या आमदारांवर सध्या स्वाभिमान गुंडाळून ठेवण्याची पाळी आली आहे, महायुती सरकारमध्ये शिवसेना ( शिंदे गट ) व राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट ) या दोघांना भाजपकडून मिळणारी वागणूक लक्षात घेता या दोन्ही गटाच्या आमदारांना आपला स्वाभिमान गुंडाळून ठेवावा लागत आहे.तशीच परिस्थिती निर्माण झाली तर अजित पवार हे पुन्हा शरद पवाराकडे वळू शकतात.पण एकनाथ शिंदे काय किंवा त्यांच्या आमदारांना पुन्हा उद्धव गटात एंट्री मिळणे कदापि शक्य नाही.कारण ” गद्दारांना क्षमा नाही,” या बाळासाहेबाच्या धोरणानुसार उद्धव ठाकरे यांनी वागायचे ठरवल्यामुळे शिंदे गटाच्या आमदाराना उबाठाची दारे आता बंद झाली आहेत. गेल्या वर्षी मोदी सरकारने सत्तेत…
वसंत भोईर,वाडा घराचे अनधिकृत बांधकाम बंद केल्याच्या रागातून उपसरपंचास धमकी, तालुक्यातील सोनाळे ग्रामपंचायत हद्दीतील घराचे अनधिकृत बांधकाम नोटीस देऊन बंद केल्याच्या रागातून सोनाळे ग्रामपंचायतीचे उपसरपंच सचिन तिखंडे यांना मोबाईलवरून धमकी देण्यात आली आहे.याप्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना काल दुपारच्या सुमारास घडली होती. अमोल गोरे व कल्पेश कोर अशी धमकी देणाऱ्या आरोपींची नावे आहेत.मिळालेल्या माहितीनुसार,यातील आरोपीनी सोनाळे ग्रामपंचायत हद्दीत अजय कुमार चोखणी यांच्या घरांचे बांधकाम काम सुरू केले होते.सदरचे काम अनधिकृत असल्यामुळे ग्रामपंचायतीने ते नोटीस देऊन बंद केले होते.याचा राग मनात धरून आरोपींनी उपसरपंच सचिन यांना दूरध्वनीवरून ” तु,आमचे साईटवरचे काम का बंद केले ? तुमचा त्या…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” खरं तर,केंद्र सरकारने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या घरी ” सिंदूर,” पाठवण्याची गरज आहे, भारत – पाक युद्धात कोण जिंकले आणि कोण हरले, याविषयी जगभरात सध्या वेगवेगळ्या स्तरावर चर्चा सुरू आहेत.आपल्या सैन्याने मुसंडी मारली असताना अवघ्या ७२ तासात दोन्ही देशात शस्त्रसंधी झाल्यामुळे,तसेच ही शस्त्रसंधी आम्ही घडवून आणली,असा दावा अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केल्यामुळे देशात संशयाचे वादळ घोंगावू लागले.अजूनही ते शमलेले नाही.अधून मधून हे वादळ पुन्हा पुन्हा घोंगावत असते.पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेक महिलांचे ” सिंदूर,” नाहीसे झाले.त्यामुळे केंद्र सरकारने दोन देशातील या युद्धाला ” ऑपरेशन सिंदूर,” असे गोंडस नांव दिले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा निर्णय सुरुवातीच्या…
दीपक मोहिते, मुंब्रा रेल्वे दुर्घटना ; तमाम रेल्वे प्रवासी संघटनानी एकत्र आले पाहिजे, मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या दुर्घटनेत ६ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.या दुर्घटनेनंतर मुंबईच्या जीवघेणा रेल्वेप्रवासाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.आपले मायबाप सरकार नेहमीप्रमाणे मृतांच्या वारसाना नुकसानभरपाई देऊन मोकळे झाले आहे.पण पुढे काय ? तर ” ये रे माझ्या मागल्या, ” हे असे गेल्या काही वर्षांपासून सतत सुरू आहे.लोक किड्यामुंग्यासारखे मरत असताना,सरकार मात्र मेट्रो, मोनोरेल व टनेल बांधण्यात व्यस्त आहे.अशा दुर्घटना घडल्या की अवघ्या पाच मिनिटात सरकार आर्थिक मदत देऊन मोकळी होत असते.पण सरकार गाड्या वाढवणे,प्रवाश्यांना आधुनिक सुविधा देणे,इ.कामाकडे कधीच लक्ष देत नाही.मुंबईचा रेल्वे प्रवास हा दिवसेंदिवस धोकादायक होत…
जव्हार,प्रतिनिधी जव्हार येथे गुणवंतांचा सत्कार मोठ्या उत्साहात संपन्न. जव्हार येथे युवा आदिवासी क-ठाकूर समाज सांस्कृतिक, सामाजिक,क्रीडा व संस्कृती संवर्धन मंडळ यांच्यातर्फे समाजातील यशस्वी, प्रेरणादायी व कार्यरत व्यक्तिमत्त्वांचा सत्कार करण्यात आला.याच कार्यक्रमात युवकांसाठी विशेष मार्गदर्शन सत्रही घेण्यात आले. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जानू यशू माळी होते.प्रमुख मार्गदर्शक म्हणून युवराज मोरघा यांनी उपस्थित राहून युवकांना आधुनिक काळातील शिक्षणाचे महत्त्व, कौशल्यविकास आणि नेतृत्वगुण याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.त्यांनी स्वकष्टावर विश्वास ठेवत संधी निर्माण करण्याचा संदेश दिला.कार्यक्रमात विशेष आकर्षण ठरले ते कोब्रा कमांडो रामदास भोगाडे यांचे भाषण,त्यांनी प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर पडत सैन्यात कसे यशस्वी स्थान मिळवले,याविषयी थक्क करणारा प्रवास मांडला. त्यांच्या अनुभवांनी युवकांमध्ये देशभक्ती,शिस्त आणि चिकाटीचा…
दिपक मोहिते, अन्न सुरक्षा कायद्याचा फेरआढावा घेण्याची गरज आहे. अन्न सुरक्षा कायद्याला येत्या ५ जुलैला एक तप ( १२ वर्षे ) पूर्ण होत आहे.या कायद्याची अंमलबजावणी सध्या काटेकोरपणे सुरू आहे. देशातील गरिबीचे प्रमाण घटत नसताना,देशवासीय भुके राहता कामा नयेत,यासाठी केंद्र सरकार अन्नधान्य अनुदानावर प्रचंड पैसा खर्च करत आहे.गेल्या बारा वर्षाच्या या वाटचालीत ही योजना किती फायदेशीर ठरली, याचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न आहे. केंद्र सरकारच्या अनेक कल्याणकारी योजनांमध्ये अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी योजना म्हणजे देशातील अन्नधान्य सुरक्षा योजना होय.राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा २०१३ अंतर्गत आणि सार्वजनिक वितरण व्यवस्था, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेसारख्या योजनांनी लाखो नागरिकांसाठी अन्न उपलब्धता निश्चित करण्यात…
अविनाश तारकर,रोहा कोलाड येथे कोकण आर्ट व्हिलेज प्रकल्पाला सुरुवात, पितांबरी उद्योग समूहाचे प्रमुख डॉ.रविंद्र प्रभू देसाई यांच्या उपस्थितीत आज ग्लोबल कोकण आर्ट विलेज या प्रकल्पाची सुरुवात झाली. मुंबई – कोकण महामार्ग कोलाड येथे ग्लोबल कोकण चळवळीचे कायमस्वरूपी केंद्र आजपासून सुरू झाले.स्व. रमेश घोणे यांच्या अजरामर वकलाकृतींचे म्युझियम त्याचबरोबर कोकणातील संपूर्ण खाद्यसंस्कृती जगासमोर आणणारे हॉटेल ” आजीची आठवण,” आणि कोकणातील उत्पादनांचे कोकण खजिना दालन या ठिकाणी आजपासून सुरू झाले.पहिल्याच दिवशी या उपक्रमाला कोकण प्रेमींचा उदंड प्रतिसाद मिळाला. स्व.रमेश घोणे यांनी आयुष्यभर अथक प्रयत्न करून निर्माण केलेले काष्ठ शिल्प म्युझियम याचे भव्य प्रमाणात सादरीकरण या प्रकल्पाच्या निमित्ताने होत आहे.कोकणातील पारंपारिक खाद्यपदार्थ,मऊ भात,मोदक…
वसंत भोईर,वाडा बैलजोडीला लाखाचा भाव, पावसाळ्याच्या तोंडावर अनेक शेतकरी नवीन बैल जोडी खरेदी करतात.वाडा तालुक्यात जनावरांचा बाजार भरत नसल्यामुळे शेतकऱ्यांना शेजारी असलेल्या जिल्ह्यातील बाजारातून बैलजोडी खरेदी करावी लागते. यंदा मे महिन्याच्या अखेरीस समाधानकारक पाउस झाल्यानंतर खरिपाच्या तोंडावर जनावरांचा बाजार सुरू झाला आहे.शेतकरी सध्या या बाजारात शेतकरी जनावरांची खरेदी करू लागले आहेत.या बाजारात खुल्या पद्धतीने गावा-गावात जनावरांची खरेदी विक्री होत आहे. तालुक्यातील काही शेतकऱ्यांना बैलगाडा शर्यतीचे वेड आहे,त्यासाठी बैलांची मोठ्याप्रमाणात खरेदी होत असते.शर्यतीसाठी मिळणाऱ्या बैलांची किंमत ४ ते ५ लाख रु.पर्यंत असते.शर्यतीसाठी अनेक जण बैलासाठी वारेमाप खर्च करत असतात. शेती मशागतीसाठी यांत्रिकीचा वापर वाढला असला,तरी अंतर मशागतीसाठी बैलजोडी शिवाय शेतकऱ्यांना अन्य…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” दोघे एकमेकांना कधी मिठी मारणार ? राज्यात सर्वत्र संभ्रमावस्था… सेनेचे मुखपत्र असलेले ” सामना,” दैनिकात उद्धव व राज,या दोघांची बातमी आज छायाचित्रासह प्रसिद्ध झाल्यामुळे एकत्र येण्याच्या प्रक्रियेवर शिक्कामोर्तब झाल्याचे संकेत मिळाले आहेत.प्रकरणी हे दोघे एकमेकांना कधी टाळी देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हे दोघे जर आजच्या घडीला एकत्र आले तरी त्यांची ही गळाभेट किती काळ टिकेल ? याविषयी साशंकताच अधिक आहे.” आमच्या देवाला बडव्यांनी घेरले आहे,यापासून सुरू झालेल्या गृहकलहाचा प्रवास बाळासाहेबांना ” चिकन सुप आणून देण्या,” पर्यंत येऊन ठेपला आहे.पण कालांतराने भाजपच्या झंझावातापुढे या दोघांचा सुपडा साफ झाला. त्यामुळे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत आपलं काही खरं…
