Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, सरकारी कर्मचाऱ्यांची वयोमर्यादा वाढवणे ; सरकार वेट अँड वॉचच्या भूमिकेत, सरकारने काही वर्षांपूर्वी आपल्या कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्षे केले होते आणि अनेक राज्यांनीही त्याचे अनुकरण केले आहे.मात्र,महाराष्ट्र सारख्या काही राज्यांमध्ये अद्यापही हे वय ५८ वर्षे आहे.त्यामुळे,महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी आणि अधिकारी महासंघाने सातत्याने ही मागणी लावून धरली आहे.ही वयोमर्यादा पून्हा ६० इतकी करण्यात यावी.ही मागणी नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या तरुणांना मारक ठरणारी आहे.त्यामुळे विद्यार्थी संघटनाचा ही वयोमर्यादा वाढवण्यास ठाम विरोध आहे.ही वयोमर्यादा वाढवण्यासाठी खालील निकषाचा आधार घेण्यात यावा,असे महासंघाचे म्हणणे आहे. १.अनुभवी आणि कुशल अधिकारी-कर्मचारी निवृत्त झाल्यामुळे प्रशासनाला त्यांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा फायदा मिळत नाही. सेवानिवृत्तीचे…

Read More

वाडा प्रतिनिधी, वाडा येथे खड्ड्याने घेतला तरूणाचा बळी, वाडा- भिवंडी महामार्गावरील खुपरी गावाच्या हद्दीत प्रशांती हाॅटेल जवळ आज सकाळच्या सुमारास खड्डा चुकवताना झालेल्या अपघातात एका निष्पाप तरूणाचा बळी गेला. या घटनेने पंचक्रोशीतील अनेक गावातील ग्रामस्थ संताप व्यक्त करत आहेत. स्मित आगिवले ( वय १९ )असे त्या दुर्दैवी तरूणाचे नाव असुन पोलीस सुत्राने दिलेल्या माहितीनुसार,वाडा तालुक्यातील पिक या गावात राहणारा स्मित हा तरूण ब्लू स्टार या कंपनीत कामाला होता.तो आज सकाळी आपल्या दुचाकीवरून कंपनीत कामावर जात असताना रस्त्यावरील खड्डा चुकवताना कंटेनर खाली सापडून जागीच त्याचा मृत्यू झाला.या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभाराविरोधात संताप व्यक्त केला…

Read More

नदीम शेख,पालघर पालघर येथे आदिवासी एकता परिषदेतर्फे रॅली व विविध कार्यक्रमाचे आयोजन, जागतिक आदिवासी अधिकार दिनानिमित्त आदिवासी एकता परिषदेतर्फे पालघरमध्ये रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.पाचबत्ती ते पंचायत समिती कार्यालय,या मार्गावर सकाळी ११.०० वाजता भव्य रॅली काढण्यात आली.रॅलीत मोठ्या संख्येने आदिवासी बांधव सहभागी झाले होते. त्यानंतर पंचायत समितीच्या सभागृहात विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमात राजेंद्र जागले ( मोखाडा ),गणपत गवळी ( ग्रामसेवक, डहाणू ) व ऍड.अश्विन दळवी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी आदिवासींचे अधिकार, पेसा कायद्याचे महत्त्व तसेच जल,जंगल आणि जमीन कशी जपली पाहिजे,याबाबत सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमासाठी पौर्णिमा परेड ( जिल्हा सहसचिव ), मोहिनी खरपडे( तालुका संघटक ),सालिनी…

Read More

तलासरी प्रतिनिधी, गांगणगावात रंगली आंतरशालेय वारली चित्रकला स्पर्धा, ज्ञानमाता सदन सोसायटी संचालित अकरा प्राथमिक शाळा,चार हायस्कूल आणि दोन ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरशालेय वारली चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.जगभरात नावारूपाला आलेली वारली चित्रकला जतन आणि संवर्धन करण्याच्या उदात्त हेतूने दरवर्षी वारली चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यंदा सेवा विद्यामंदिर गांगणगाव येथे ही स्पर्धा पार पडली.आंतरशालेय वारली चित्रकला स्पर्धेत प्राथमिक गटात २२,माध्यमिक गटात ८ तर ज्युनिअर कॉलेज गटात ४ स्पर्धक असे एकूण ३० स्पर्धक सहभागी सहभागी झाले होते. निसर्ग व पर्यावरण रक्षण, ज्ञानमाता -शिक्षण योगदान / शताब्दी वर्ष, मानवाचे अस्तित्व व वैज्ञानिक प्रगती,वारली सण-उत्सव व चालीरीती आदी विषयांवर मुलांनी…

Read More

जव्हार प्रतिनिधी, ग्रामसेवक पतसंस्थेची ४६ वी वार्षिक अधिमंडळ सभा उत्साहात संपन्न, ठाणे-पालघर जिल्हा ग्रामसेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित,टिटवाळा यांची ४६ वी वार्षिक अधिमंडळ सभा नुकतीच पार पडली. शांती सरोवर रिसॉर्ट,जव्हार-सेलवास रोड, जयसागर धरण परिसर येथे झालेल्या सभेचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष गणेश किसन पडवळ यांनी भूषवले. यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेचे सरचिटणीस सूचित घरत, संस्था व अन्य पदाधिकारी,कर्मचारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेच्या प्रारंभी अहवाल सालातील दिवंगत सभासदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर सेवानिवृत्त झालेल्या सभासदांचा सत्कार करून त्यांच्या योगदानाची दखल घेण्यात आली.मागील अधिमंडळ बैठकीचा इतीवृत्तांत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. संचालक मंडळाने सादर केलेला सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा अहवाल, ताळेबंद,नफा-तोटा…

Read More

दीपक मोहिते, जिल्हा परिषद निवडणूक रणसंग्राम – डहाणू तालुका, जिल्हा परिषदेच्या १३ गटात भाजप व मार्क्स. कम्यु.पक्षात सरळ लढत होण्याची शक्यता, डहाणू तालुक्यात पालघर जिल्हा परिषदेचे एकूण १३ गट तर डहाणू पंचायत समितीचे २६ गण आहेत.या व्यतिरिक्त शहरी भागासाठी डहाणू नगरपरिषद कार्यरत आहे.हा तालुका आदिवासीबहुल असल्यामुळे गट व गणाच्या बहुतांश जागा अनु.जमाती वर्गासाठी आरक्षित आहेत.तसेच या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काही वर्षांपूर्वी सरकारने या तालुक्यात आदिवासी विकास प्रकल्प कार्यान्वित केला.या प्रकल्पाच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या विविध योजनाची अंमलबजावणी व आश्रमशाळाचे नियंत्रण करण्यात येत असते.या गटामधील स्थानिक रहिवाश्यांचा मुख्य व्यवसाय शेती असून त्यावर हजारो कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो.तालुक्याला समुद्रकिनारा लाभला असून अनेक गावांत मोठ्याप्रमाणात…

Read More

दीपक मोहिते, निवडणूक पर्व – प्रभाग क्र.१३, या प्रभागात स्थानिक मतदार भाजपला संधी देतील,अशी शक्यता आहे… स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकासंदर्भात नुकत्याच झालेल्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाचे कान चांगलेच उपटले.त्यामुळे या निवडणुका येत्या चार महिन्यात घ्याव्या लागणार आहेत.सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुका घेण्यासंदर्भात आयोगाला कालमर्यादा घातल्यामुळे महायुतीचे तीन घटक पक्ष वगळता इतर तमाम राजकीय पक्षांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.या निर्णयामुळे गेल्या पाच वर्षांपासून निर्माण झालेली अनिश्चितता आता दूर झाली आहे. असो,गेल्या भागात आपण प्रभाग क्र.१२ च्या प्रभागातील विकासकामाचा आढावा घेतला.आज स्थानिक भूमीपुत्रांचा प्रभाग अशी ओळख असलेल्या प्रभाग क्र.१३ चा आढावा घेणार आहोत.यंदा या प्रभागाला अन्य काही नवीन परिसर…

Read More

दीपक मोहिते, सरकार आपल्याच मस्तीत धुंद, राज्यात पावसाचा धुमाकूळ ; यंदा शेतकऱ्यांच्या आत्महत्यामध्ये वाढ होणार… राज्यात सुरू असलेला पावसाचा धुमाकूळ हा शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा आहे.पंजाब,हरियाणा, उत्तराखंड व आपल्या महाराष्ट्र राज्यात झालेल्या अतिवृष्टीने या सर्व राज्यात हाहाकार उडाला आहे.मे महिन्याच्या अखेरीस सुरू झालेला पाऊस सप्टें.महिना उजाडला तरी थांबायचे नाव घेत नाही.अशीच परिस्थिती आणखी काही दिवस राहिल्यास आपल्या राज्यात शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्यामध्ये लक्षणीय वाढ होईल,अशी भिती सर्वत्र व्यक्त करण्यात येत आहे. राज्यात कोसळणाऱ्या पावसाने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे.पण आपले तीन इंजिनचे सरकार मात्र आपल्याच धुंदीत असल्याचे पाहायला मिळत आहे.यंदा कोसळलेल्या या अस्मानी संकटामुळे गलितगात्र झालेल्या आपल्या शेतकऱ्याला आधाराची गरज…

Read More

दीपक मोहिते, अखेर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांचा तिढा सुटला… करोनाचा फैलाव तसेच निरनिराळ्या कारणांमुळे गेल्या पाच वर्षांपासून रखडलेल्या राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांना अखेर मुहूर्त मिळाला आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जाने.पर्यंत राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राज्य निवडणूक आयोगाला घ्याव्या लागणार आहेत.पाच महिन्यापूर्वी विधानसभा निवडणुकीमध्ये भरघोस यश मिळवणाऱ्या महायुतीचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कस लागणार आहे.कारण गेल्या सहा महिन्यात महायुतीच्या कारभाराचे चांगलेच वाभाडे निघाले आहे. त्यामुळे २०२० पासून रखडलेल्या महानगरपालिका, नगरपालिका,जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी लवकरच सुरू होणार आहे.त्यानुसार पुढील चार महिन्यांमध्ये या सर्व निवडणुका राज्य निवडणूक आयोगाला घ्याव्या लागणार आहेत.सर्व निवडणुका एकत्र घेणे शक्य नाही,हे…

Read More

दीपक मोहिते, आमच्या अटी मान्य करा,अन्यथा आमचा बहिष्कार, पितृपक्ष पंधरवडा दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो,तो पंधरा दिवस असतो.तो आता सुरू झाला आहे.मित्रानो,वर्षानुवर्षे आपल्या ज्या मागण्या प्रलंबित आहेत,त्यावर विचारविनिमय करण्यासाठी ही आपण वार्षिक सर्वसाधारण सभा बोलावली आहे.खाली नमूद केलेल्या मागण्यांवर आपण विचार करणार आहोत.प्रत्येक सदस्यांनी आपापली मते मांडावीत,अशी अपेक्षा आहे. १) आमच्यासाठी ठेवण्यात येणाऱ्या वाडीत सकस तसेच उत्तम दर्जाचा पोषण आहार असावा, २) वाडी ठेवल्यानंतर पितरांच्या नातेवाईकांनी काव,काव,असे किंचाळत आम्हाला बोलवू नये,तर आम्हाला सन्मानपूर्वक साद घालावी,अन्यथा आम्ही वाड्यांवर बहिष्कार टाकू. ३) तीन इंजिन सरकारने आमच्या समुहासाठी ” आमचा लाडका कावळा,” अशी योजना सुरू करावी, ४) पितृपक्ष पंधरवडा संपला…

Read More