नदीम शेख,पालघर
पालघर येथे आदिवासी एकता परिषदेतर्फे रॅली व विविध कार्यक्रमाचे आयोजन,
जागतिक आदिवासी अधिकार दिनानिमित्त आदिवासी एकता परिषदेतर्फे पालघरमध्ये रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.पाचबत्ती ते पंचायत समिती कार्यालय,या मार्गावर सकाळी ११.०० वाजता भव्य रॅली काढण्यात आली.रॅलीत मोठ्या संख्येने आदिवासी बांधव सहभागी झाले होते.
त्यानंतर पंचायत समितीच्या सभागृहात विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमात राजेंद्र जागले ( मोखाडा ),गणपत गवळी ( ग्रामसेवक, डहाणू ) व ऍड.अश्विन दळवी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी आदिवासींचे अधिकार, पेसा कायद्याचे महत्त्व तसेच जल,जंगल आणि जमीन कशी जपली पाहिजे,याबाबत सविस्तर माहिती दिली.
या कार्यक्रमासाठी पौर्णिमा परेड ( जिल्हा सहसचिव ), मोहिनी खरपडे( तालुका संघटक ),सालिनी कासट ( तालुका सदस्य ), जयेश मोरे ( तालुका सचिव ) व अन्य पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली.यावेळी जागतिक आदिवासी अधिकार दिनाच्या निमित्ताने पालघरमध्ये आदिवासी एकतेचे व सांस्कृतिक अभिमानाचे दर्शन घडले.

