Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, ” जय्यत तयारी,” महाविकास आघाडीमध्ये सामील होणे ; बविआचा कपाळमोक्ष होऊ शकतो, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका,या बिहार राज्य विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर कोणत्याही क्षणी जाहीर होतील,अशी शक्यता गृहीत धरून भाजप व बहुजन विकास आघाडी या दोघांनी जोरदार तयारी चालवली आहे.गेल्या काही दिवसात भाजपने पक्षाच्या विविध विभागाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्याचा सपाटा लावला आहे.तर दुसरीकडे बहुजन विकास आघाडीने विभागवार कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचा धुरळा उडवून दिला आहे. मात्र या सर्व प्रक्रियेत मतदारांच्या मनात नेमके काय आहे ? याविषयी अनेक राजकीय पक्ष सध्या संभ्रमावस्थेत आहेत.या निवडणुकीत जो पक्ष आपल्या पक्षाच्या प्रचाराचा भर ” परिसर विकास,” या ज्वलंत विषयावर राबवेल,मतदार त्यालाच डोक्यावर घेतील,असा अंदाज…

Read More

वसंत भोईर,वाडा भातपिकाच्या नुकसानापोटी फक्त २ रू. ३० पैशांची भरपाई, वाडा तालुक्यात परतीच्या पावसाने अक्षरश: थैमान घातले असून हाता तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेला आहे.सोन्यासारखे आलेले भातपिक अद्याप शेतात पडून आहे.त्यावर पाणी साचल्याने भाताला कोंब फुटले आहेत.हजारो हेक्टर भातशेतीचे नुकसान झाले असून त्यावर सरकार देखील मीठ चोळण्याचे काम करत आहे. तालुक्याच्या शिल्लोत्तर येथील एका शेतक-याला नुकसानभरपाई म्हणून फक्त २ रू.३० पैसे बॅंक खात्यात जमा झाल्यामुळे शेतकरी तीव्र संताप व्यक्त करीत आहेत. वाडा तालुक्याला भाताचे कोठार म्हणून ओळखले जाते.वाडा कोलम हा भाताचा वाण राज्यभर प्रसिद्ध असून त्याला बाजारपेठेत त्याला चांगली मागणी आहे.यंदा समाधानकारक पाऊस पडल्यामुळे भातपीक चांगले आले होते.सोन्यासारखे पीक…

Read More

वसईतील वाहतूक कोंडी ; आ.स्नेहा दुबे पंडित यांच्या नेतृत्वाखाली महत्वपूर्ण बैठक संपन्न, वसईतील वाहतूक कोंडीचा अत्यंत जटील व गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न कायमस्वरुपी निकाली काढण्यासाठी वसईच्या आ.स्नेहा दुबे पंडित यांनी शासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे.महानगर पालिका क्षेत्रातील एस.टी.आगाराच्या जागेचा पी.पी.पी.तत्वावर विकास करून तेथे पे अँड पार्क व्यवस्था उपलब्ध करण्यात येणार आहे.त्यामुळे हा ज्वलंत प्रश्न आता लवकरच निकाली निघणार आहे. वसई तालुक्यातील अपुरी आणि विस्कळीत सिग्नल व्यवस्था,पुरेसे गतिरोधक नसणे,झेब्रा क्रॉसिंग नसणे,यामुळे नागरिकांना विशेष करून वयोवृद्ध जेष्ठ नागरिक,महिला,विद्यार्थ्यांना दररोजच्या प्रवासादरम्यान येणाऱ्या अडचणी तातडीने दूर करण्यासाठी आ.स्नेहा दुबे पंडित यांनी आज सर्व संबंधित अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेतली.या बैठकीमध्ये महानगर पालिका क्षेत्रातील…

Read More

दीपक मोहिते, ” खबरदारी,” इच्छुक उमेदवारांनो अर्ज दाखल करताना अशी काळजी घ्या… स्थानिक स्वराज्य स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे सध्या बिगुल वाजले असून राजकीय पक्षाच्या हालचालींना चांगलाच वेग आला आहे.प्रत्येक राजकीय पक्षात इच्छुकांची भाऊगर्दी झालेली पाहायला मिळत आहे.युती व आघाडी करण्यासंदर्भात प्रमुख राजकीय पक्षांनी अद्याप आपले पत्ते खोललेले नाहीत.पण आपापल्या प्रभागात निवडणुकीचे चित्र कसे असेल,याविषयीची धाकधूक प्रत्येक इच्छुक उमेदवारांच्या मनात सुरू झाली आहे.आपल्याला उमेदवारी मिळाल्यास आवश्यक ती कागदपत्रे तयार असावीत,यासाठी अनेक इच्छुक सध्या विविध कामामध्ये गर्क आहेत.अनेकदा अर्धवट माहिती,अपुरी कागदपत्रे आदी कारणांमुळे आजवर अनेकांवर आपली उमेदवारी गमावण्याची पाळी आली आहे.तशी ती आपल्यावर येऊ नये,यासाठी इच्छुक उमेदवाराने दक्षता घेण्याची गरज आहे.त्यासाठी खालील निवडणूक…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” आचोळे हॉस्पिटल ” तू,तू,मै,मै,” ; निदान लोकांसाठी तरी एकमेकांच्या उरावर बसू नका… स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या तोंडावर वसई तालुक्यातील राजकारण हळूहळू तापू लागले आहे.नव्याने मंजूर झालेल्या विकासकामांचे श्रेय उपटण्यासाठी राजकीय पक्ष आता एकमेकांच्या उरावर बसू लागले आहेत.पण मतदारांच्या लेखी,या अशा स्पर्धेला काडीचीही किंमत नाही.राजकीय पक्षाच्या अशा या ” पळा,पळा कोण पुढे पळे तो,” शर्यतीमध्ये वसईकराना बिलकुल स्वारस्य नाही.त्यांना आपल्या दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या समस्या,अडचणी कशा मार्गी लागतील व प्रभावी नागरी सुविधा कशा उपलब्ध होतील,याची चिंता आहे. गेली अनेक वर्षे खितपत पडलेला हॉस्पिटलचा प्रश्न वसईच्या आ.स्नेहा दुबे पंडित यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून एकदाचा…

Read More

वसंत भोईर,वाडा अंभई ग्रामस्थांचे तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत उपोषण, आपल्या विविध मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वाडा तालुक्यातील अंभई गावच्या ग्रामस्थांनी काल पासुन तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. अंभई या गावाच्या हद्दीत असलेल्या झीको इंडिया या कंपनीत स्थानिक कामगारांना डावलण्यात येत असून स्थानिकांना या कंपनीत प्राधान्य देण्यात यावे,अंभई ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्टाचारात चुकीचा अहवाल देणा-या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी,तसेच आमगाव येथे ग्रामस्थांची फसवणूक करून तयार करण्यात आलेले रस्ते खोदून टाकण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.विनापरवाना रस्ते खोदणा-या कंत्राटदारावर कारवाई करण्यात यावी,या सर्व मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी नरेश पाटील, मनोज गोवारी,गोंविदा कातारे व विलास बरड या चार ग्रामस्थांनी तहसीलदार…

Read More

दिपक मोहिते ” हल्लाबोल, ” नवा जव्हार जिल्हा निर्माण करताना सरकारने सारासार विचार करावा, पालघर जिल्हा,हा देशातील ३६ व्या क्रमांकाचा जिल्हा आहे.दहा वर्षांपूर्वी देशातील सर्वात मोठ्या जिल्ह्याचे विभाजन करून १ ऑगस्ट २०१४ रोजी नवीन आदिवासी जिल्हा निर्माण करण्यात आला.नागरी परिसराचा विचार न करता तत्कालीन राज्य सरकारने सागरी व डोंगरी,असा जिल्हा निर्माण केला.वास्तविक जिल्ह्याचे विभाजन करताना तत्कालीन पृथ्वीराज चव्हाण यांनी भौगोलिक परिस्थितीचा सारासार विचार करून नागरी, सागरी व डोंगरी असे त्रिभाजन करायला हवे होते. या जिल्ह्याचे प्रचंड क्षेत्रफळ व विकासाची मंदावलेली गती पाहून सरकारला आता पुन्हा जिल्ह्याचे पुन्हा विभाजन करण्याची उपरती झाली आहे. २०१४ साली चव्हाण सरकारने जिल्हावासि्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर…

Read More

दीपक मोहिते पर्यटनवाढीला चालना, वर्षानुवर्षे रखडलेली सर्व विकासकामे देवाभाऊच्या नेतृत्वाखाली मार्गी लागतील – आ.स्नेहा दुबे पंडित, राज्याच्या पर्यटनवाढीला चालना मिळावी,यासाठी स्थापन करण्यात आलेल्या प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत वसई विभागासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २ कोटी रु.चा निधी नुकताच मंजूर केला आहे.या प्रकरणी वसईच्या आ.स्नेहा दुबे पंडित यांनी गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. आ.स्नेहा दुबे पंडित यांनी गेल्या आठ महिन्यात वसई विधानसभा मतदारसंघातील अनेक प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्यात यश मिळवले.गेल्याच आठवड्यात त्यांनी वर्षानुवर्षे रखडलेले पाच उड्डाणपूले व रिंगरूटचा प्रश्न सोडवला.याकामी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुक्तहस्ते निधी देऊ केला आहे.त्यानंतर दोनच दिवसापूर्वी वसई विधानसभा क्षेत्रातील विविध प्रभागातील मूलभूत सुविधा…

Read More

दीपक मोहिते, ऋतुचक्र विस्कळीत होणे,अत्यंत धोकादायक, निसर्गाने उधळण केलेल्या संपूर्ण रचनेत हवा,पाणी,जमीन,वनस्पती,पशु,पक्षी, कीटक व माणूस या सर्वांचा समावेश मिळून पर्यावरण तयार होत असते.त्याचे प्रमाण व रचना,ही आपापल्या गरजेनुसार करण्यात आली आहे.हे सर्व घटक एकमेकांवर अवलंबून असल्यामुळे त्याचा एकत्रितपणे विचार करण्याची आवश्यकता असते.पूर्वी काळी तो विचार केला जात होता,परंतु जसजशी लोकसंख्या वाढत गेली निसर्गाचे हे चक्र विस्कळीत होत गेले.त्यामुळे आज तुम्हा-आम्हा सर्वाना अनेक संकटाना सामोरे जावे लागत आहेत.यूरोप खंडातील अनेक शहरे आज अधुन मधून निसर्गाच्या तडाख्यात सापडलेली आपण पाहतो.आधुनिक पद्धतीची शहरे वसली,परंतु ही शहरे वसवताना पर्यावरणावर त्याचा काय परिणाम झाला ? याचा आपण कधीच विचार केला नाही.त्याचे परिणाम सध्या आपल्याला भोगावे…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” ” पालघर जिल्ह्यातील शेतकरी उध्वस्त होण्याच्या मार्गावर…” विमा क्षेत्रात खाजगी विमा कंपन्यांना रान मोकळे करून देण्याचा तत्कालीन काँग्रेस सरकारचा निर्णय,शेतकऱ्यांच्या गळ्याचा फास बनला आहे.शेतकऱ्यांना परतावा देण्यास,या विमा कंपन्यांची मानसिकता नसल्यामुळे राज्यातील शेतकरी सध्या हवालदील झाला आहे.या प्रश्नी राज्य सरकारही डोळ्यावर कातडे ओढून बसले आहे.गेल्या महिन्यात पावसाने पुनरागमन केल्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.या नैसर्गिक संकटात जिल्ह्यातील भातशेतीचे होत्याचे नव्हते झाले.पण जिल्हा कृषी विभागाचे अधिकारी अद्याप सुप्तावस्थेत आहेत.पाऊस मात्र अद्याप थांबायचे नांव घेत नाही. खाजगी कंपन्यांचा आडमुठेपणा व राज्य सरकारची उदासीनता,त्यामुळे काही वर्षांपूर्वी अनेक जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक भूमिकेत आले होते.शेतकऱ्यांची संघटना असलेल्या महाराष्ट्र राज्य किसान सभेने याविषयी…

Read More