- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, वसई विरार शहर मनपा निवडणूक ; आता फार कठीण आहे,कारण पुलाखालून बरेचसे पाणी वाहून गेले आहे,ते पुन्हा मागे वळू शकणार नाही…. गेल्यावर्षी मे महिन्यात लोकसभा व डिसें.महिन्यात विधानसभा निवडणूका पार पडल्या.लोकसभा निवडणुकीचा निकाल जसा अपेक्षित होता,तसाच तो लागला.पण विधानसभा निवडणुकीच्या निकालाने जिल्ह्यातील राजकीय विषश्लेकांचे डोळे पांढरे झाले.ज्या वसई,नालासोपारा विधानसभा मतदारसंघावर गेली तीन दशके बहुजन विकास आघाडीचे साम्राज्य होते.ते या विधानसभा निवडणुकीत पत्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळले.या गेल्या तीन विधानसभा निवडणुकीत बोईसर मतदारसंघात ज्या बविआने बाजी मारली,तोही त्यांच्या हातून निसटला.या तीनही जागा महायुतीने प्रचंड मताधिक्य घेत जिंकल्या.( वसई व नालासोपारा – भाजप/ बोईसर – शिवसेना ( एकनाथ शिंदे गट ) अशी…
दिपक मोहिते, वसई तालुका शिवसेना ( उबाठा ) सध्या प्रभावी नेतृत्वाच्या प्रतिक्षेत, परवा आमच्या वेबपोर्टलने शिवसेनेचे ( एकनाथ शिंदे ) जिल्हाध्यक्ष निलेश तेंडुलकर व काल राष्ट्रवादी काँग्रेसचे ( अजित पवार ) गटाच्या एका नाराज माजी पदाधिकाऱ्याने नांव न छापण्याच्या अटीवर स्फ़ोटक मुलाखत दिली. त्यानंतर वेबपोर्टलने शिवसेनेचे ( उबाठा ) जिल्हाध्यक्ष प्रवीण म्हाप्रळकर यांच्याशी मुलाखतीसाठी संपर्क केला.अपेक्षेप्रमाणे त्यांच्याकडून मुलाखत देण्याबाबत टाळाटाळ करण्यात आली.मी पालघर लोकसभा संघटकाशी बोलतो त्यानंतर मुलाखत देतो,असे सांगून आमच्या स्टाफची त्यांनी बोळवण केली.तरीही आम्ही त्यांना प्रश्नावली पाठवली.पण त्यांचा काही प्रतिसाद मिळाला नाही.त्यामुळे आम्ही त्यांच्या पक्षाच्या एका नाराज माजी पदाधिकाऱ्याला गाठले,पण त्यांनीही प्रारंभी आडेवेढे घेतले.पण त्यांची समजूत घालण्यात आम्ही…
दीपक मोहिते, हिंदुत्व म्हणजे व्यापक सांस्कृतिक व राष्ट्रीय अस्मिता, हिंदुत्वाची खरी ओळख केवळ धार्मिक परंपरा आणि श्रद्धा नसून ती एक व्यापक सांस्कृतिक आणि राष्ट्रीय अस्मिता,अशी आहे. सावरकरांनी याला एक राजकीय विचारधारा म्हणून परिभाषित केले होते.ज्यात समान राष्ट्र,वंश आणि संस्कृती या घटकांचा समावेश आहे. सावरकरांनी केलेल्या व्याख्येनुसार हिंदुत्व म्हणजे भौगोलिक दृष्ट्या आधारित,धार्मिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय अस्मितेचे एकत्रीकरण होय. हिंदुत्वात तीन गोष्टी महत्वाच्या आहेत,समान राष्ट्र,समान वंश आणि समान संस्कृती. हिंदुत्व केवळ धार्मिक नसून, एक व्यापक सांस्कृतिक ओळख आहे,जी भारतीय भूभागावर आधारीत आहे. सावरकरांनी हिंदुत्व,या शब्दाचा वापर एका राजकीय विचारसरणीसाठी केला होता. ज्यामध्ये भारतीय संस्कृती आणि राष्ट्रीय अस्मितेला महत्व देण्यात आले आहे. हिंदुत्व…
दीपक मोहिते ” वेळीच जागे व्हा,” पर्यावरणाचे संतुलन ढासळले तर मानवी विनाश अटळ – सोमय्या दत्ता जगभरात हवामान बदलावर गांभीर्याने चर्चा सुरू आहे. जगभरातील ऋतू चक्रच बदलत आहे.उष्णतेमध्ये होत असलेली वाढ मानवाबरोबरच पशू पक्षी यांच्या जीवावर उठू लागली आहे.निसर्गाच्या चक्रात मानवी हस्तपेक्ष सुरू राहिल्यास निसर्गाचे बदलाचे धोकादायक परिणाम मानवी जीवनावर बेतू शकते,असे स्पष्ट मत आंतरराष्ट्रीय तज्ञ सोमय्या दत्ता यांनी व्यक्त केले. हवामान बदल व त्यास सामोरे कसे जावे,याविषयी निर्मळ, वसई येथे दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ” हवामान बदल,” याविषयावर फक्त चर्चा करून व १०-१५ झाड लावून हा प्रश्न सुटणार नाही.आज परिस्थती आपल्या हाताबाहेर जात आहे.कोळसा,तेल…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल, ” जिल्हा परिषद शाळा बंद करणे ; ग्रामीण भागातील निरक्षरतेला आमंत्रण देण्यासारखे, अनेक देश आपल्या देशात शिक्षण व्यवस्थेला सर्वाधिक महत्व देत असताना,आपले सरकार मात्र या महत्वाच्या विषयी कायम उदासीनच राहिले.सरकारच्या निष्क्रियतेचा विविध क्षेत्रावर चांगलाच परिणाम झाला आहे.” शिक्षणाचा अधिकार,” कायदा मंजूर होऊन देखील या व्यवस्थेतील बजबजपुरी नाहीशी होऊ शकली नाही.सरकारच्या अशा उदासीनतेमुळे शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या वाढत्या संख्येचा वेलू गगनावर पोहोचला आहे. सरकारचे या महत्वाच्या विषयाकडे कायम दुर्लक्ष झाल्यामुळे आर्थिक,व्यापार,आयटी,उद्योग व रोजगार क्षेत्रात आपल्या देशाची चांगलीच पीछेहाट झाली.आज शहरी व ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था पार कोलमडून पडली आहे.जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा बंद पडू लागल्या आहेत.तर मायबाप…
दीपक मोहिते, राज्यकर्त्यांचा करंटेपणा.. आपली वैद्यकीय सेवा रामभरोसे, केंद्र व राज्य सरकार सध्या रस्तेबांधणीच्या विकासकामावर कोटी कोटीची उड्डाणे घेत आहे.शहरी भागातील अंतर्गत रस्ते बांधणी,शहराना एकमेकांशी जोडण्यासाठी आवश्यक असलेले जलदगती महामार्ग व समृद्धी महामार्ग उभारणी, असा धडक कार्यक्रम राबवत आहे. एकेकाळी ” बंबई नगरी सबसे प्यारी,” ” बंबई मेरी जान,” ” बंबईसे आया मेरा दोस्त,” अशा प्रकारची गाणी आपण गुणगुणत असू.आज सारं काही बदलत चाललंय..आता ” बंबई नगरी,सबसे खतरी,” ” बंबई से गया मेरा दोस्त,” “बंबई मेरा दुश्मन,” असे म्हणायची पाळी आपल्यावर आली आहे.पाच वर्षांपूर्वी आलेल्या कोरोनाने आपल्या वैद्यकीय सेवेच्या मर्यादा स्पष्ट केल्या.गेल्या ६५ वर्षात वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत आपण नवीन सरकारी…
दीपक मोहिते, ” मान्सूनचे आगमन, ” मे अखेरीस राज्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून येत्या २४ तासांत ते अधिक तीव्र होऊन त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची दाट शक्यता आहे. या चक्रीवादळाला “शक्ती,”असे नाव देण्यात आले आहे.हे चक्रीवादळ उत्तरेकडे सरकण्याची शक्यता असून त्याचा थेट फटका कोकण किनारपट्टीला बसेल,असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.कोकण किनारपट्टीवर ताशी ६० कि.मी.वेगाने वारे वाहतील तसेच अतिवृष्टी होईल,असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.या सर्व पार्श्वभूमीवर रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे,तर मुंबईसह उर्वरित कोकणाला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. २० मे पासून पूर्व मोसमी पावसाने राज्यात धुमाकूळ घालण्यास सुरुवात…
दिपक मोहिते, राष्ट्रवादी काँग्रेसचे ( अजित पवार गट ) पालघर जिल्ह्यातील अस्तित्व नगण्य, काल आपण मुलाखतीच्या पहिल्या भागात शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष ( एकनाथ शिंदे गट ) निलेश तेंडुलकर यांची मुलाखत घेतली.त्यानंतर काल आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( अजित पवार ) गटाच्या जिल्हाध्यक्षांची मुलाखत घेण्यासाठी दिवसभर आटोकाट प्रयत्न करत होतो,पण आमच्या या प्रयत्नाला त्या पक्षाकडून यत्किंचितही प्रतिसाद मिळाला नाही.तो का मिळू शकला नाही,हे आजच्या मुलाखतीमधून स्पष्ट होणार आहे.दिवसभराच्या अथक प्रयत्नानंतर सांयकाळी एक आशेचा किरण आम्हाला दिसला.शिवसेनेच्या एका माजी पदाधिकाऱ्याने news27.in ला कॉल करून,माझे नाव न छापण्याच्या अटीवर मी मुलाखत देण्यास तयार असल्याचे कळवले.त्यास आमच्या वेबपोर्टलने मंजुरी दिली.अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कशा…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” ठाकरे व पवार हे ब्रँड त्यांच्या पुतण्यानीच संपवले… महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे,यांनी दोन दिवसापूर्वी झालेल्या एका मुलाखतीमध्ये केलेली काही वक्तव्ये ही वस्तुस्थितीला धरून नाहीत.आपल्या मुलाखतीमध्ये त्यांनी,राज्यात ठाकरे व पवार हे दोन ब्रँड असून ते संपवण्याचे प्रयत्न होत असल्याचे सांगितले.वास्तविक ठाकरे व पवार हे दोन ब्रँड आहेत,हे मान्य,पण हे दोन्ही ब्रँड संपवण्याचे काम त्यांनी व पवार कुटुंबाच्या वंशाचा दिवा असलेल्या अजित पवार या दोघांनी पद्धतशीरपणे केले.राज यांनी २० वर्षांपूर्वी २७ नोव्हें.२००५ रोजी शिवसेनेला सोडचिट्ठी दिली.त्यावेळी केलेल्या आपल्या घणाघाती भाषणात ” चार कारकुनांच्या कंपूच्या पापात आपल्याला वाटेकरी व्हायचे नाही.शिवसेना प्रमुखच आपले दैवत आहे,मात्र दैवत असलेल्या आमच्या…
दीपक मोहिते, ” असंवेदनशीलता,” रुपाली चाकणकर यांच्या कार्यकिर्दीत महिलांना न्याय मिळू शकणार नाही… वैष्णवी हगवणे,मृत्यूप्रकरणी आपले सरकार व महिला आयोगाच्या अध्यक्षा किती असंवेदनशील आहेत,हे त्यांच्या एकंदरीत वागण्यावरून स्पष्ट झाले आहे.घटना घडल्यानंतर तब्बल सात दिवसानंतर आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या वैष्णवी यांच्या माहेरच्या लोकांचे सांत्वन करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी जातात.हा प्रकारच मुळात संतापजनक आहे.वैष्णवी हगवणे यांचे सासरे व त्यांची मुले हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संबधित आहेत.त्यामुळे घटना घडल्यानंतर त्यांच्यावर कारवाई होण्याऐवजी सरकार व महिला आयोगाने वेळकाढूपणाचे धोरण स्विकारले होते.सदर प्रकरणी मीडिया व विरोधी पक्षाने सरकारला धारेवर धरल्यानंतर सत्ताधारी पक्षाचे नेते, महिला आयोगाच्या अध्यक्षा व पोलिस यंत्रणा सक्रिय झाल्या. मिडियाने…
