दीपक मोहिते
” वेळीच जागे व्हा,”
पर्यावरणाचे संतुलन ढासळले तर मानवी विनाश अटळ – सोमय्या दत्ता
जगभरात हवामान बदलावर गांभीर्याने चर्चा सुरू आहे. जगभरातील ऋतू चक्रच बदलत आहे.उष्णतेमध्ये होत असलेली वाढ मानवाबरोबरच पशू पक्षी यांच्या जीवावर उठू लागली आहे.निसर्गाच्या चक्रात मानवी हस्तपेक्ष सुरू राहिल्यास निसर्गाचे बदलाचे धोकादायक परिणाम मानवी जीवनावर बेतू शकते,असे स्पष्ट मत आंतरराष्ट्रीय तज्ञ सोमय्या दत्ता यांनी व्यक्त केले.
हवामान बदल व त्यास सामोरे कसे जावे,याविषयी निर्मळ, वसई येथे दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ” हवामान बदल,” याविषयावर फक्त चर्चा करून व १०-१५ झाड लावून हा प्रश्न सुटणार नाही.आज परिस्थती आपल्या हाताबाहेर जात आहे.कोळसा,तेल यांचा वापर थांबवून पर्यायी ऊर्जा तंत्रज्ञान वापरू शकलो नाही,तर येणाऱ्या काळात पृथ्वीचे वाढते तापमान रोखणे मानवाच्या आवाक्याबाहेर असेल.त्यामुळे प्रभावी उपाययोजना करुन ” लोकल ते ग्लोबल,”अशी रणनीती तयार करावी लागेल,असे मत पर्यावरण अभ्यासक सोमय्या दत्ता यांनी आपल्या भाषणात व्यक्त केली.
सदर दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिरात वसईतील ४५ युवक सहभागी झाले होते. प्रशिक्षण शिबिर आयोजीत करण्यासाठी समाज सेवा मंडळ,उत्तर वसई, पर्यावरण संवर्धन समिती, युवा संस्था व एनएपीएम यांनी पुढाकार घेतला.सदर प्रशिक्षण शिबिरासाठी वसईतील सामाजिक बांधिलकी जपणारे जीवन विकास पतपेढी, कल्पतरू पतपेढी,एकता पतपेढी व बेसिन कॅथोलिक बँक यांनी आर्थिक साहाय्य केले.प्रशिक्षण शिबीर यशस्वी करण्यासाठी दानीया डाबरे, सुजय मोरे,गीता डाबरे,अंशू मोर्य यांनी मेहनत घेतली.

