Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते ” निर्लज्जपणा, ” शिंदे यांनी म्हस्के यांना वेळीच आवरावे,अन्यथा पक्ष अडचणीत येण्याची शक्यता, एकनाथ शिंदे यांच्या गटाचे खा.नरेश म्हस्के हे वादग्रस्त नेते म्हणून ओळखले जातात. काश्मीर येथे घडलेल्या घटनेनंतर वादग्रस्त विधान करून पुन्हा एकदा वाद ओढवून घेतला आहे.मस्के हे नेहमीच वादग्रस्त विधाने करून या-ना त्या कारणावरून वादात सापडत असतात. यावेळी त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यभरात जोरदार पडसाद उमटले. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांना प्रवक्तेपदावरून हटवण्यात यावे,अशी मागणी करण्यात येत आहे. जम्मू काश्मीरमध्ये अडकून पडलेल्या नागरिकाविषयी त्यांनी वादग्रस्त विधान केले व पुन्हा एकदा वाद ओढवून घेतला आहे.जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेल्या प्रवाशांना मदत करणे,ही राज्य सरकारची जबाबदारी असताना,अशा प्रकारचे वक्तव्य करणे,हे अपमानास्पद आणि…

Read More

दिपक मोहिते, बदला घेणार,म्हणजे नक्की काय करणार ? जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांना आपले प्राण गमवावे लागले होते.या घटनेला चार दिवस उलटून गेले.पण ज्या दहशतवाद्यांना पाककडून रसद पुरवण्यात येते,त्या पाकिस्तानला आपले मोदी सरकार केवळ इशारे देत बसले आहे.एकाही दहशतवाद्याला सोडणार नाही,अशा सिंहगर्जना करण्यात आपले सरकार धन्यता मानत आहे.हे दहशतवादी आता पाकीस्तानच्या आश्रयाला गेले आहेत.त्यांना हुडकून काढून त्यांना ठार मारणे,ही आपल्या आवाक्या बाहेरची गोष्ट आहे. पाकिस्तानशी युद्ध करणे,ही अशक्यप्राय गोष्ट आहे.पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे तळ आपण उध्वस्त करू शकतो,पण त्या देशाशी आपल्या लोकांना आपल्याला थेट युद्ध करणे,शक्य नाही.कारण दोन्ही देश न्यूक्लिअर पॉवर देश आहेत.दोन्ही देशात युद्ध झालेच तर ते तिसऱ्या…

Read More

वसंत भोईर,वाडा १९ हजार रू.ची लाच घेताना सरपंचाला रंगेहाथ पकडले, तालुक्यातील सापरोंडे मांगाठणे ग्रामपंचायतीच्या सरपंच शोभा गवारी यांना ग्रामपंचायत कार्यालय विस्तारिकरण करण्याच्या कामाचे मंजूर केलेल्या बिलाच्या रकमेपैकी २ टक्के प्रमाणे एकूण १९ हजार रू.ची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.त्यामुळे तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली असून सरपंचावर कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ आहे. अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,वाडा तालुक्यातील सापरोंडे मागाठणे या ग्रामपंचायतीच्या सरपंच शोभा सुनिल गवारी वय ३६ या आहेत.येथील ग्रामपंचायत कार्यालय विस्तारिकरण करण्याच्या कामाचे मंजूर केलेल्या बिलाच्या रकमेपैकी २ टक्के प्रमाणे एकूण २० हजारांची लाच सरपंच शोभा गवारी यांनी तक्रारदार यांच्याकडे मागितली होती.तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी…

Read More

सचिन परब,विरार लायन्स क्लबतर्फे आगाशी जिल्हा परिषद शाळेला बेंचेसची भेट, राज्यातील जिल्हा परीषद शाळांची दुर्दशा व दिवसेंदिवस कमी होत चाललेली विद्यार्थ्यांची संख्या ही चिंतेची बाब ठरत आहे.गरीब व होतकरु विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाजातील अनेक सेवाभावी संस्था नेहमीच खारीचा वाटा उचलत असतात. विरारमधील एका शाळेला लायन्स क्लबकडून मदतीचा हात देण्यात आला आहे.या मदतीमुळे विद्यार्थ्याँना दिलासा मिळाला आहे. वस‌ई तालुक्यातील आगाशी येथील जिल्हा परिषद शाळा ही एकेकाळी नावाजलेली अशी शाळा.बदलत्या काळात इंग्रजीच्या ओढ्यामुळे या शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या उतरणीला लागली.तसेच शासनाच्या शिक्षण विभागाच्या दुर्लक्षामुळे या शाळेची पार दुरावस्था झाली आहे. शाळेमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांना सध्या अनेक अडचणीना तोंड द्यावे लागत होते.या शाळेत…

Read More

वसंत भोईर,वाडा, वाडा तालुक्यात जागतिक हिवताप दिन साजरा, जागतिक हिवताप दिना निमित्त आरोग्य विभागाकडून तालुक्यात विविध जनजागृती कार्यक्रम राबवण्यात आले. जिल्हा हिवताप अधिकारी अश्विनी राव,वाडा तालुका आरोग्य अधिकारी शरयू तुपकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील प्रा.आ.केंद्र खानीवली,प्रा.आ.केंद्र गोऱ्हे, प्रा.आ.केंद्र परळी,प्रा.आ.केंद्र कुडूस अंतर्गत विविध गावात जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले. यावर्षी जागतिक हिवताप दिन ” चला हिवताप संपवू या : पुन्हा योगदान द्या,पुनर्विचार विचार करा,पुन्हा सक्रिय व्हा,” या थीम खाली साजरा करण्यात आला.प्रा.आ.केंद्र खानिवली अंतर्गत येणाऱ्या मौजे तुसे येथे वैद्यकीय अधिकारी अश्विनी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तुसे गावात हिवताप जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी माध्यमिक विद्यामंदिर तुसे येथील विध्यार्थ्यांना हिवताप,डेंगू,चिकन गुनिया, हत्ती…

Read More

जव्हार प्रतिनिधी, जिजाऊ रथयात्रेचे जव्हार नगरीत भव्य स्वागत, “ बहुजन मराठा जोडो अभियान,” अंतर्गत महाराष्ट्रभर प्रवास करणारी जिजाऊ रथयात्रा काल ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरा लाभलेल्या जव्हार नगरीत दाखल झाली.विविध परंपरा,ऐक्य आणि बहुजनांच्या संघर्षांचा वारसा मांडणारी,ही यात्रा जनतेच्या अभूतपूर्व प्रतिसादाने संस्मरणीय ठरली. यात्रेच्या सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिरपामाळ येथे फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला वंदन करून यात्रेचा शुभारंभ करण्यात आला.त्यानंतर यात्रेने आदिवासी क्रांतिकारक चौक गाठले,जेथे पारंपरिक तारपा नृत्य पथक साखरशेत यांनी सादर करून आदिवासी समाजाच्या थोर क्रांतिकारकांना आदरांजली वाहण्यात आली.सांस्कृतिक परंपरेच्या अभिव्यक्तीचा हा भाग उपस्थितांमध्ये भारावणारा ठरला.त्यानंतर सहविचार सभा व ” बहुजन समाज…

Read More

संजय नेवे,विक्रमगड बेपत्ता खलाशांच्या कुटुंबीयांना मदत मिळण्याबाबत मुख्यमंत्र्याकडे पाठपुरावा, खा.डॉ.हेमंत सवरा यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेऊन मतदार संघातील विविध महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा केली. या भेटीत तीन विषयांवर शासनाकडे ठोस कार्यवाहीची मागणी करण्यात आली. बेपत्ता खलाशांच्या कुटुंबांना आर्थिक मदत देणे. ४ मार्च २०२५ रोजी समुद्रात झालेल्या अपघातात झाई गावातील चार खलाशी समुद्रात बुडाले होते.यापैकी एकाचा मृतदेह मिळाला असून उर्वरित तीनजण अद्याप बेपत्ता आहेत.या दुर्दैवी घटनेमुळे संबंधित कुटुंबांवर उपजीविकेचे गंभीर संकट ओढवले आहे.तसेच दोन खलाशी गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या सर्व कुटुंबांना तातडीने आर्थिक मदत व शासनाच्या योजनांतून सहाय्य मिळावे, अशी मागणी खा. सवरा केली…

Read More

शुभम सावंत, विरार पाकिस्तानचा झेंडा फाडुन व जोडे मारून  विरार शिवसेनेने केला निषेध, जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे निष्पाप भारतीयांवर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा विरार शहरातील तमाम शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी तीव्र आंदोलन उभारून पाकिस्तानचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश राऊत, शिव वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष आनंद चोरघे,अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष अजहर खान, शहर संघटक शिला लष्करे, शहर समन्वयक प्रदिप साने, कार्यालयप्रमुख सुनील चव्हाण,उपसचिव प्रसाद मिर्लेकर, उपशहरप्रमुख शशी कदम,जितेंद्र खाडे,उपशहर संघटक रोशनी जाधव, उपशहर अधिकारी रोहित कदम,विभागप्रमुख गणेश धावडे,सुशांत घाग,यश चोरघे, महेश लांजवळ,अजय पिंपळे, आदि शिवसेना,युवासेना, महिला आघाडी व अंगिकृत संघटनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read More

नदीम शेख,पालघर पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ पालघरमध्ये मुस्लिम समाजाकडून जोरदार निषेध, जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आज पालघर शहर मुस्लिम समाजाच्या वतीने शहरातील जामा मशिदेच्या बाहेर दु.२.०० वाजता शुक्रवारची नमाज पठण केल्यानंतर निषेध आंदोलन करण्यात आले.यावेळी असंख्य मुस्लिम बांधव उपस्थित होते. पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यानंतर सम्पूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. ठिकठिकाणी निषेध करण्यात येत आहे. पालघरमध्येही समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने या हल्ल्याच्या निषेधार्थ जोरदार आंदोलन करण्यात आले.यावेळी मुस्लिम समाजातील बांधवांनी हातावर काळी फीत बांधून पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण केली.या दरम्यान ” पाकिस्तान मुर्दाबाद,” व पाकिस्तानवर कारवाई करा व गुन्हेगारांना शिक्षा…

Read More

वसंत भोईर,वाडा वाडा तालुक्यातील चौदा गावपाड्याना टॅकरने पाणीपुरवठा, तालुक्यातील चौदा गाव पाड्यात टॅकरने पाणीपुरवठा करण्यात येत असून त्यामुळे लाखो करोडो रू.खर्च करून बांधण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजना कागदावरच असल्याचे दिसून येत आहे.या योजनांचा पुरता फज्जा उडाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. वाडा तालुक्यातील ओगदा ग्रामपंचायत हद्दीतील सागमाळ,टोकरेपाडा, जांभूळपाडा,घोडसाखरे, दिवेपाडा,फणसपाडा, गवळीपाडा,तरसेपाडा तुसे ग्रामपंचायत हद्दीतील डोंगरीपाडा,फणसपाडा पिंपळास ग्रामपंचायत हद्दीतील पिंपळास,मुसारणे, बालिवली ग्रामपंचायत हद्दीतील चौरेपाडा तर उमरोठे ग्रामपंचायत हद्दीतील नदीचापाडा या गावपाड्यांना तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे.त्यामुळे या गावांना टॅकरने पाणी पुरवठा सुरू केला असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाने दिली आहे. वाडा तालुक्यातील अनेक गावपाड्यात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणी पुरवठा योजना मंजूर असून या योजनांचा…

Read More