Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, विरार येथे झोपडपट्टी पुनर्वसन कार्यशाळा संपन्न, मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण-ठाणे आयोजित वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टी पुनर्वसन योजना कार्यशाळेमध्ये विविध विभागाचे अधिकारी व मान्यवर उपस्थित होते. मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण विविध शासकीय, निमशासकीय,खाजगी जमिनीवर झोपडपट्टीधारकांचे राहणीमान प्राकृतिकदृष्ट्या उंचावण्यासाठी पक्की घरे देऊन मूलभूत नागरी व सामाजिक सुविधा देण्याबाबत कार्यशील आहे.वसई विरार शहरात येऊ घातलेल्या या पुनर्वसन प्रकल्पाचे नियोजनबद्ध आखणी व प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी सदर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्रा मध्ये झोपडपट्टीवासियांच्या दैनंदिन जीवनातील समस्या उदा. पक्की घरे,पाणीपुरवठा, वीजपुरवठा,क्रीडांगणे, पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या समस्या व होणारी गैरसोय, शौचालये,घरांचे अपुरे क्षेत्रफळ,यासारख्या विविध समस्यांचा लेखाजोखा घेऊन…

Read More

वसंत भोईर, ब्लु बेरी कंपनीच्या निषेधार्थ श्रमजीवी संघटनेचे ठिय्या आंदोलन, मौजे- वावेघर ता.वाडा जि.पालघर येथील ब्लु बेरी ऍग्रो प्रॉडक्ट प्रा.लि.ही कंपनी मानवी वस्तीपासून अवघ्या १५ फुट अंतरावर आहे. शासकीय नियमानुसार औद्योगिक कंपनी व मानवी वसाहतीमध्ये कमीत कमी ५०० मी.अंतर असणे आवश्यक आहे.मात्र सर्व नियम धाब्यावर बसवून कंपनी सुरु असून या कंपनीमधून दुर्गंधी युक्त रसायन मिश्रित सांडपाणी सोडत असल्याने पिण्याच्या पाण्याच्या बोअर दूषित झाल्या आहेत.या दूषित पाण्यामुळे तसेच कंपनीमधून पडणाऱ्या दुर्गंधीमुळे लोकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.त्यामुळे श्रमजीवी संघटनेने मौजे – वावेघर येथे बिऱ्हाड मोर्चा काढला व वाडा तहसील कार्यालय येथे ठिय्या आंदोलन केले. जोपर्यंत वस्ती जवळ असणारी सदर कंपनी बंद…

Read More

संजय लांडगे,वाडा वाडा येथील मुलीच्या अपहरणाचा पोलीसांनी लावला छडा, काल वाडा शहरातील संजय गांधी नगर येथून अपहरण झालेल्या मुलीच्या आईने वाडा पोलीस ठाण्यात आपली आठ वर्षाची मुलगी बेपत्ता असल्याची फिर्याद दिली होती.तीच्या फिर्यादी वरून वाडा पोलिसांनी तात्काळ तपास करून करून आरोपी व मुलीला शोधून काढले. वाड्यातील संजय गांधी नगर येथे तीच्या राहत्या घरासमोर संध्याकाळी खेळत असलेल्या मुलीला फुस लाऊन एका इसमाने पळवुन नेले होते.यासंबधी तक्रार दाखल होताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी वाडा पोलीस ठाण्यातील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना ठाण्यात बोलावुन त्यांना अपहरण झालेल्या मुलीचा शोध घेण्याबाबत सुचना देण्यात आल्या.तसेच जनसंवाद अभियान अंतर्गत सर्व ग्रुपवर अपहरण झालेल्या मुलीचा फोटो व…

Read More

दीपक मोहिते, ” संपादकीय,” बलाढ्य भाजपला दक्षिणात्य राज्यात गेल्या दहा वर्षात पाय रोवता आले नाहीत, भाजप,आजच्या घडीला देशात बलाढ्य पक्ष म्हणून उदयाला आला असला तरी पक्षात सर्वत्र आलबेल आहे,अशी स्थिती नाही.अनेक राज्यात भाजपला इतर प्रादेशिक पक्षाच्या कुबड्या घेल्याशिवाय निवडणुका लढवता येत नाही.दाक्षिणात्य राज्यात आजही त्यांना आपल्या अस्तित्वाची लढाई लढावी लागत आहे.केरळ,तामिळनाडू राज्यात त्यांची पाटी कायम कोरीच राहीली तर आंध्रप्रदेशमध्ये चन्द्रबाबू नायडू यांच्या तेलगू देशमचा टेकू घ्यावा लागला.तेलंगणा व कर्नाटक,या दक्षिणेतील दोन महत्वाच्या राज्यात त्यांची गेल्या अनेक वर्षांपासून धडपड सुरू आहे.पण यश त्यांना हुलकावणी देत आहे.हिमाचल प्रदेशात गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने त्यांच्या पाठीला माती लावली.बिहार राज्यात त्यांना त्यांचे मित्र नितीश कुमार…

Read More

शुभम सावंत, विवा महाविद्यालयात “मराठी राजभाषा गौरव दिन,” मोठ्या उत्साहात साजरा.. मराठी ही महाराष्ट्राची मातृभाषा आहे आता तर मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून देखील दर्जा लाभलेला आहे. या मातृभाषेचा गौरव म्हणून व ज्येष्ठ कवी, साहित्यिक, नाटककार, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि. वा. शिरवाडकर म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके कुसुमाग्रज… त्यांचा जन्मदिवस २७ फेब्रु.रोजी साजरा केला जातो. कुसुमाग्रज यांनी मराठी साहित्य विश्वात दिलेल्या योगदानाची दखल घेत त्यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून देशभरात हा दिवस ” मराठी राजभाषा गौरव दिन,” म्हणून साजरा केला जातो.या दिनाचे औचित्य साधून विवा महाविद्यालयातील मराठी वाङ्ममय मंडळ व ग्रंथालय विभाग,यांच्या संयुक्त विद्यमाने ” मराठी भाषा गौरव दिन,” दिमाखात साजरा करण्यात…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” ” हिंदीतुनच बोला,” अशी सक्ती करणाऱ्यांवर सरकारने कठोर कारवाई करण्याची गरज… काल राज्यभरात मराठी राजभाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला.या दिनाच्या पार्श्वभूमीवर अनेक उपक्रम राबवण्यात आले.शासकीय स्तरावर मात्र उदासीनताच पाहायला मिळाली.राज्याच्या शासकीय कामकाजात १ मे १९८५ पासून मराठी भाषेचा वापर करणे,अनिवार्य करण्यात आले आहे.त्यानुसार काही किरकोळ अपवाद वगळता मराठी भाषेचा १०० % वापर करण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले होते,असे असतानाही राज्यात मराठी भाषा आम्ही का म्हणून बोलावी ? असा प्रश्न विचारणारे महाभाग जागोजागी पाहायला मिळत आहेत.अनेकदा यावरून हाणामाऱ्याही होत असतात.सध्या अशा घटनांमध्ये सतत वाढ होत असल्याचे पाहायला मिळते. राज्य शासनाने कायदा केला,पण तो केवळ मराठी माणसानेच पाळायचा,असा…

Read More

विनीत चौधरी,बोर्डी, ” सांस्कृतिक वारशाचे जतन,” आजपासून डहाणू तालुक्यात ” पालघर महोत्सव,” डहाणू तालुक्यातील घोलवड,गंजाड व बापूगाव,या तीन गावामध्ये आजपासून तीन दिवसीय पालघर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पालघर जिल्ह्यातील सांस्कृतिक वारशावर आधारीत पर्यटनाला चालना देण्यासाठी आजपासून २ मार्च दरम्यान तीन दिवस हा महोत्सव चालणार आहे.जिल्ह्यातील आदिवासी भागातील भूमीपुत्रांना सांस्कृतिक वारसा जपत पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करणे,असा उद्देश या महोत्सवाच्या मागे आहे.यापूर्वी वरील तीन गावात विविध गट स्थापन करून हस्तकला वस्तू,वारली चित्रकला व पारंपारिक वाद्ये तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते.त्यांनी तयार केलेल्या वस्तूचे प्रदर्शन व विक्री या महोत्सवात करण्यात येणार आहे.या उपक्रमाच्या माध्यमातून महिला बचत गटांना तसेच अन्य महिलांना…

Read More

जव्हार प्रतिनिधी, जव्हार महाविद्यालयात मराठी राजभाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा, जव्हार येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील मराठी विभागातर्फे ” मराठी भाषा गौरव दिना,” च्या निमित्ताने ” काव्यवाचन,” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.विजय शिंदे (अर्थशास्त्र विभाग प्रमुख) उपस्थित होते,तर प्रमुख पाहुणे म्हणून किशोर डोके ( जिल्हा परिषद शिक्षक, कवी, कथाकार ) उपस्थित होते.महाविद्यालयातील प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या कला व वाणिज्य शाखेचे विद्यार्थी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागगी झाले होते. कार्यक्रमाची सुरुवात कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली.मराठी विभाग प्रमुख डॉ.राहुल पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक…

Read More

दीपक मोहिते, राज्याचे तापमान चढत्या कमानीवर : अनेक शहरे तापली, गेल्या दोन दिवसापासून राज्याच्या किनारपट्टी भागात सध्या प्रचंड तापमान आणि दमटपणा वाढत आहे.मुंबईसह कोकणातील राज्यातील अनेक शहराच्या तापमानात प्रचंड वाढ झाली आहे.गेल्या दोन दिवसांपासून मुंबई,पालघर, ठाणे,रत्नागिरी,सिंधुदूर्ग जिल्ह्यात उष्णतेचा इशारा देण्यात आला आहे.फेब्रु. महिन्यातच या सर्व शहरांचे तापमान ३८ अंश सेल्सियसवर गेले आहे. नागरिक उन्हाच्या कडाक्याने हैराण झाले आहेत.आज राज्याच्या तापमानात प्रचंड वाढ झाली.मराठवाडा विदर्भात आज दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे अशक्य झाले होते.उत्तर महाराष्ट्रातही सामान्य तापमानाहून अधिक तापमानाची नोंद झाली आहे.दरम्यान येत्या तीन दिवसात राज्यातील अंतर्गत भागात २ ते ३ अंशांनी तापमान वाढण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे. कोकण…

Read More

संजय नेवे,विक्रमगड विक्रमगड येथे जनता दरबाराचे आयोजन, विक्रमगड तालुक्याच्या समस्या सोडवण्यासाठी खा.हेमंत सवरा यांच्या अध्यक्षतेखाली आज विक्रमगड येथे जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. शासनाच्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमांतर्गत आज विक्रमगड तालुक्यातील समस्या सोडवण्यासाठी खा. डॉ.हेमंत सावरा यांच्या अध्यक्षतेखाली आज विक्रमगड येथील संत रोहिदास सभागृह जनता दरबार आयोजित करण्यात आला होता.यावेळी या कार्यक्रमास विक्रमगडचे आ.हरिश्चंद्र भोये जिल्हा कृषी सभापती संदीप पावडे,सभापती यशवंत कनोजा,उपसभापती विनोद भोईर,तहसीलदार चारुशीला पवार,प्रांत अधिकारी,गटविकास अधिकारी,पोलीस निरीक्षक,सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंता, पाणीपुरवठा,आरोग्य, बँक,ग्रामसेवक तलाठी, कृषी,आदिवासी विकास महामंडळ,रोजगार हमी,पंचायत समिती विभाग,शिक्षण,या विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते. गेल्या अनेक वर्षापासून विक्रमगड तालुक्याचा विकास, नागरिकांचे प्रश्न व समस्या ” जैसे थे,” स्थितीत…

Read More