विनीत चौधरी,बोर्डी,
” सांस्कृतिक वारशाचे
जतन,”
आजपासून डहाणू तालुक्यात ” पालघर महोत्सव,”
डहाणू तालुक्यातील घोलवड,गंजाड व बापूगाव,या तीन गावामध्ये आजपासून तीन दिवसीय पालघर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
पालघर जिल्ह्यातील सांस्कृतिक वारशावर आधारीत पर्यटनाला चालना देण्यासाठी आजपासून २ मार्च दरम्यान तीन दिवस हा महोत्सव चालणार आहे.जिल्ह्यातील आदिवासी भागातील भूमीपुत्रांना सांस्कृतिक वारसा जपत पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करणे,असा उद्देश या महोत्सवाच्या मागे आहे.यापूर्वी वरील तीन गावात विविध गट स्थापन करून हस्तकला वस्तू,वारली चित्रकला व पारंपारिक वाद्ये तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते.त्यांनी तयार केलेल्या वस्तूचे प्रदर्शन व विक्री या महोत्सवात करण्यात येणार आहे.या उपक्रमाच्या माध्यमातून महिला बचत गटांना तसेच अन्य महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.या उपक्रमासाठी राज्य शासनाने ” कॉन्टॅक्ट बेस,” या संस्थेला ” समुदाय आधारीत पर्यटन आराखडा,” तयार करण्यासाठी नियुक्त केले आहे.हा महोत्सव २ मार्च पर्यंत सुरू राहणार आहे.या महोत्सवाला नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

