संजय नेवे,विक्रमगड
विक्रमगड येथे जनता दरबाराचे आयोजन,
विक्रमगड तालुक्याच्या समस्या सोडवण्यासाठी खा.हेमंत सवरा यांच्या अध्यक्षतेखाली आज विक्रमगड येथे जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते.
शासनाच्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमांतर्गत आज विक्रमगड तालुक्यातील समस्या सोडवण्यासाठी खा. डॉ.हेमंत सावरा यांच्या अध्यक्षतेखाली आज विक्रमगड येथील संत रोहिदास सभागृह जनता दरबार आयोजित करण्यात आला होता.यावेळी या कार्यक्रमास विक्रमगडचे आ.हरिश्चंद्र भोये जिल्हा कृषी सभापती संदीप पावडे,सभापती यशवंत कनोजा,उपसभापती विनोद भोईर,तहसीलदार चारुशीला पवार,प्रांत अधिकारी,गटविकास अधिकारी,पोलीस निरीक्षक,सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंता, पाणीपुरवठा,आरोग्य, बँक,ग्रामसेवक तलाठी, कृषी,आदिवासी विकास महामंडळ,रोजगार हमी,पंचायत समिती विभाग,शिक्षण,या विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते. गेल्या अनेक वर्षापासून विक्रमगड तालुक्याचा विकास, नागरिकांचे प्रश्न व समस्या ” जैसे थे,” स्थितीत आहेत.ते मार्गी लावण्यासाठी आज जनता दरबार आयोजित करण्यात आला होता.दरबार सुरु होण्यापूर्वी आपले प्रश्न व समस्या घेऊन आलेल्या नागरिकांना टोकन वाटप करण्यात आले.त्यानंतर खासदार व आमदार यांनी नागरिकांच्या तक्रारी ऐकल्या व त्याचे निवारण करण्यासाठी संबंधित विभागाकडे सदर तक्रारी अर्ज पाठवले.यावेळी तालुक्यातील आरोग्य जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना,रस्ते, घरकुले,वीज,पाड्यांचे विभाजन,शिक्षण रोजगार अशा विविध विषयांवर नागरिकांनी आपल्या लेखी तक्रारी सादर केल्या व त्या सोडवण्याविषयी खा.डॉ.हेमंत सावरा व आ.हरिश्चंद्र भोये यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना केल्या.या जनता दरबारामध्ये तालुक्याचे एकूण ७५ प्रश्न उपस्थित करण्यात आले.पहिल्या जनता दरबारात प्रश्न कमी आले असले तरी येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी आपल्या समस्या मांडाव्यात,अशा सूचना देण्यात आल्या.या जनता दरबारात तालुक्यातील लोकप्रतिनिधी,मोठ्या संख्येने नागरिक व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

