दीपक मोहिते,
विरार येथे झोपडपट्टी पुनर्वसन कार्यशाळा संपन्न,
मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण-ठाणे आयोजित वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टी पुनर्वसन योजना कार्यशाळेमध्ये विविध विभागाचे अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण विविध शासकीय, निमशासकीय,खाजगी जमिनीवर झोपडपट्टीधारकांचे राहणीमान प्राकृतिकदृष्ट्या उंचावण्यासाठी पक्की घरे देऊन मूलभूत नागरी व सामाजिक सुविधा देण्याबाबत कार्यशील आहे.वसई विरार शहरात येऊ घातलेल्या या पुनर्वसन प्रकल्पाचे नियोजनबद्ध आखणी व प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी सदर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.
या चर्चासत्रा मध्ये झोपडपट्टीवासियांच्या दैनंदिन जीवनातील समस्या उदा. पक्की घरे,पाणीपुरवठा, वीजपुरवठा,क्रीडांगणे, पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या समस्या व होणारी गैरसोय, शौचालये,घरांचे अपुरे क्षेत्रफळ,यासारख्या विविध समस्यांचा लेखाजोखा घेऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठीचे महत्वाचे टप्पे,नियोजन आराखडा,तपशीलवार नियम,तसेच होणारे लाभ याविषयी चर्चा झाली.
या चर्चासत्रात आ.राजन नाईक,आ.स्नेहा दुबे – पंडित आ.विलास तरे,अनिलकुमार पवार आयुक्त तथा प्रशासक- वसई विरार महानगरपालिका, मुख्य कार्यकारी अधिकारी- मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण ठाणे,निलेश सावंत वास्तूविशारद,मुंबई महानगर प्रदेश,झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण ठाणे पराग सोमण, मुख्य कार्यकारी अधिकारी-मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण ठाणे,राजकुमार पवार कार्यकारी अधिकारी,मीनल पालांडे सक्षम प्राधिकरण,रोहिदास बांगर इतर पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

