Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” पालघर जिल्ह्यात महायुतीतील शिवसेना – भाजपच्या वेगवेगळ्या चुली, काल पालघर जिल्ह्यात भाजप व शिंदे गटातर्फे दोन वेगवेगळ्या तिरंगा रॅली निघाल्या.भाजपच्या रॅलीचे नेतृत्व पालकमंत्री गणेश नाईक यांच्याकडे होते.त्यामुळे शिंदे गटाने आपली वेगळी चूल मांडली.महायुतीमधील दोन पक्ष समोरासमोर उभे ठाकल्याचे चित्र निर्माण झाले आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी गणेश नाईक यांची वर्णी लागल्यापासून जिल्ह्याच्या राजकारणात भाजप- शिंदे गटात अंतर्गत धुसफूस सुरू झाली आहे.एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी उभयपक्ष सोडत. नाहीत.गणेश नाईक यांच्या कार्यकाळात आपल्या गटाला न्याय मिळू शकणार नाही,हे लक्षात घेऊन एकनाथ शिंदे यांनी आपले विश्वासू सहकारी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची जिल्ह्याच्या संपर्कमंत्रीपदी वर्णी लावली.त्यानी पदाची सूत्रे. हाती घेताच गणेश…

Read More

दीपक मोहिते, ” फ्रंटलाईन,” युद्धाचे मार्केटिंग नको… भारत-पाक युद्धात शस्त्रसंधी होऊन आता जवळपास आठवडा उलटून गेला आहे.या युद्धात केवळ युद्धविराम झाला आहे.विजय कोणाचा झाला,हे सांगणे सध्या तरी कठीणच आहे.भारतीय हवाई दलाने या युद्धात शत्रूराष्ट्राचे अनेक तळ उध्वस्त केले.त्यांच्याकडून झालेले हल्ले आपल्या पायदळाने यशस्वीरीत्या परतवून लावले.आपल्या जवानांनी या युद्धात जे शौर्य व धाडस दाखवले,त्याला तोड नाही.नियोजनबद्ध आखणी,लक्ष्य व शस्त्रसज्जता,या अशा तीन स्तरावर आपण शत्रूराष्ट्राला भारी पडलो.त्यामुळे आपल्या सैन्याचे कौतुक करावे,तेवढे थोडेच…. तीन ते चार दिवस सुरू राहिलेल्या युद्धात अचानक युद्धविराम झाल्यामुळे दोन्ही देशात संशयाचा धूर पसरला.अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधी घडवून आणण्यात महत्वाची भूमिका पार पाडली,अशी कबुली स्वतः ट्रम्प यांनी…

Read More

नदीम शेख,पालघर, पालघर येथे शिवसेनेतर्फे भव्य तिरंगा रॅली ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सैन्याने केलेल्या शौर्याला मानवंदना देण्याकरता महाराष्ट्राचे लोकाभिमुख नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने पूर्ण महाराष्ट्रभर तिरंगा रॅलीचे आयोजन केले आहे,त्याच पार्श्वभूमीवर पालघर येथेही शिवसेनेतर्फे छत्रपती शिवाजी चौक ते पाच बत्ती हुतात्मा चौक दरम्यान तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेनेने आयोजित केलेला तिरंगा रॅलीत हजारोच्या संख्येने शिवसैनिक तसेच पालघरवासीय सहभागी झाले होते.आपल्या देशाचा अभिमान असलेला आपला तिरंगा झेंडा फडकवत तसेच उपस्थित शेकडो पालघर वासियांनी भारतीय तिरंग्याला आपली मानवंदना दिली. आज झालेल्या या तिरंगा रॅलीत बोईसर विधानसभेचे आ.विलास तरे,पालघर शिवसेना जिल्हाप्रमुख कुंदन संखे,जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण,सहसंपर्कप्रमुख केदार काळे,माजी आ.मनीषा…

Read More

जव्हार प्रतिनिधी, जव्हार –  तुळजापूर येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा संपन्न, जव्हार तालुक्यातील तुळजापूर येथे ग्रामस्थ मंडळातर्फे गावातील एकूण २१ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोपाळ बोरसे सर होते,प्रमुख पाहुणे म्हणून मातोश्री हॉस्पिटल,जव्हार येथील डॉ. प्रविण भोये,डॉ.धावजी धूम, डॉ.धनंजय धूम,तसेच जीएसटी विभागातील अधिकारी सखाराम पाचकूडवा,अधीक्षक आनंद टोपले,एमएसईबी चे रमेश गवळी,ट्रॅफिक पोलीस अधिकारी नितीन बोरसे, तंटामुक्ती अध्यक्ष हनुमंत बोरसे,ग्रामपंचायत सदस्या लता गवळी आणि बसचालक रमेश तुंबडा इ. मान्यवर उपस्थित होते. डॉ.प्रविण भोये यांनी विद्यार्थ्यांना जीवनातील संघर्ष आणि शिक्षणाचे महत्त्व याविषयी आपले अनुभव सांगत व्यसनमुक्त जीवनाचे आणि उच्च शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.त्यांनी यावेळी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन…

Read More

नदीम शेख,पालघर, विविध पक्षातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश.. पालघर विधानसभेच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरणारे माजी आ.अमित घोडा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशाने पालघर डहाणूतील ग्रामीण भागात पक्षसंघटनेला बळ मिळणार आहे.तसेच डहाणू विधानसभेचे मनसेचे उपजिल्हाप्रमुख विपुल पटेल, आगवन ग्रामपंचायतचे सरपंच रुपजी कोल,मच्छीमार समाजाकरता कार्यरत असलेले कुंदन दवणे,दांडी सोसायटीचे चेअरमन नंदकुमार तामोरे,रिक्षा संघटनेचे संदीप पाटील जगदीश ठाकूर,उत्तर भारतीय समाजाचे राजू शर्मा,डहाणू काँग्रेसचे जितू पटेल ,डहाणू मनसे महिला शहर अध्यक्ष शोभा खताळ तसेच शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेचे पालघर जिल्हा संपर्कमंत्री म्हणून प्रताप सरनाईक यांची नेमणूक केल्यानंतर त्यांनी…

Read More

कोगदे गावचे डॉ. अजय डोके झाले पहिले आयएएस अधिकारी, जव्हार प्रतिनिधी- पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम कोगदे गावातील सुपुत्र डॉ. अजय काशीराम डोके यांनी केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण करून भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) मध्ये प्रवेश मिळवला आहे. विशेष म्हणजे, ते कोकण विभागातून आयएएस होणारे पहिले आदिवासी, तर संपूर्ण महाराष्ट्रातून आदिवासी समाजातून तिसरे आयएएस अधिकारी ठरले आहेत. या अभूतपूर्व यशाच्या निमित्ताने कोगदे गावात भव्य मिरवणूक आणि सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. पारंपरिक आदिवासी वाद्यांचे निनाद, सांबळीच्या गजरात गावकऱ्यांनी डॉ. डोके, त्यांच्या पालक, तसेच गुरू सुरेश भोये यांचे जल्लोषात स्वागत केले. गावकऱ्यांनी आरती ओवाळून, फुलांचा वर्षाव करत त्यांचा सन्मान…

Read More

दीपक मोहिते, बारमाही नद्या वाहत असूनही जिल्ह्याच्या घश्याला कोरड, दरवर्षी पालघर जिल्ह्यातील नागरिकांना,पाणीटंचाई, अवकाळी पाऊस,अतिवृष्टी,वादळे शेतीची हानी इ.अस्मानी संकटांना सामोरे जावे लागत असते.ही सारी संकटे गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्याच्या पाचवीला पुजली आहेत.नव्याने पालघर जिल्हा अस्तित्वात आलेल्या घटनेस आता एक तप पूर्ण झाले आहे.पण जिल्ह्याचे प्रश्न व समस्या आजही जैसे थे स्थितीतच आहेत. या सर्व समस्यांपैकी दरवर्षी निर्माण होणारी भीषण पाणीटंचाई आजही ” जैसे थे,” स्थितीत आहे.जिल्ह्यात वैतरणा,सूर्या,पिंजाळ, तानसा व देहर्जे,या बारमाही नद्या वाहत असताना दरवर्षी जिल्ह्याच्या घश्याला मात्र कोरड पडत असते.जिल्ह्याच्या भूगर्भातही पाण्याचा मुबलक साठा आहे,पण दरवर्षी ग्रामीण भागातील विहिरी,तलाव,बंधारे मधील पाण्याची पातळी खोलवर जाते.नवा जिल्हा अस्तित्वात आल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल, ” पालकमंत्री असा असता कामा नये, आपल्या पालकमंत्रीपदाचा वापर पक्षवाढी व शिंदे गटाला नामोहरम करणाऱ्या वनमंत्री गणेश नाईक यांच्याविरोधात पालघर जिल्ह्यात नाराजीचे सूर उमटत आहेत.जिल्ह्यात नूकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने जिल्हावासीयांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.ग्रामीण भागातील लोक या अस्मानी संकटामुळे पार खचून गेले असताना पालकमंत्री मात्र तिरंगा यात्रेत मश्गुल असल्याचे पाहायला मिळाले. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांची शेती व स्थानिक भूमिपुत्राच्या राहत्या घरांचे अतोनात नुकसान झाले.या नैसर्गिक संकटात शंभरहून अधिक घरावरील पत्रे व शेड्स उडून गेले,जनावरांचे अनेक गोठे जमिनदोस्त झाले.या वावटळीत अनेक कुटुंबे बेघर झाली,सर्वत्र हाहाकार उडाला.पण या संकटसमयी पालकमंत्री गणेश नाईक मात्र या नुकसानीची पाहणी करण्यासाठी जिल्ह्यात फिरकले…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” ” नरकातला स्वर्ग ” ; सत्ताधाऱ्यांची झोप उडाली, खा.संजय राऊत यांच्या ” नरकातला स्वर्ग,” पुस्तकाचे काल मुंबईत प्रकाशन झाले.त्यांच्या या पुस्तकातील लिखाणाने भल्याभल्यांची झोप उडवून दिली आहे.खा.राऊत यांनी आपल्या या पुस्तकात अनेक विलक्षण घडामोडीवर प्रकाश टाकला आहे.त्यामुळे भाजपच्या अंधभक्ताचा पोटशूळ उठला आहे.दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही त्यामध्ये समावेश आहे.फडणवीस यांनी तर ” बालवाङ्मय मी वाचत नाही,आणि सध्या तसं माझं वयही नाही,” अशी जळजळीत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.हे पुस्तक अद्याप बाजारात आलेले नाही,ते आल्यानंतर प्रचंड गदारोळ उठण्याची शक्यता आहे. या पुस्तकात खा.राऊत यांनी देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा,हे एका प्रकरणात बाळासाहेबांना भेटण्यासाठी मातोश्रीवर…

Read More

सचिन परब वसई, दुसऱ्या आंबा महोत्सवाला उत्तम प्रतिसाद, पालघर जिल्ह्यातील शेतीमालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे काम वसई शेतकरी सोसायटी करत आहे.त्यासोबत आपला माल ही थेट ग्राहकांना विकत असल्यामुळे शेतकरी व ग्राहकांना फायदा होत असल्याचे प्रतिपादन सहकारी संस्था,वसई तालुका उपनिबंधक अमर शिंदे यांनी वसई शेतकरी सोसायटीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या आंबा महोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी केले. वसई तालुक्यातील वसई शेतकरी विविध कार्यकारी सोसायटीच्या ८५ व्या वर्षाचे निमित्त साधून संस्थेच्या देवतलाव येथील आवारात आज पासून आंबा महोत्सव भरवण्यात आले आहे या आंबा महोत्सवाचे उदघाटन वसई तालुका सहकारी संस्था उपनिबंधक अमर शिंदे आणि भाजपचे महामंत्री हेमंत म्हात्रे यांच्या हस्ते संपन्न झाले. वसई शेतकरी सोसायटीच्या…

Read More