वसंत भोईर,वाडा
भात बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची झुंबड,
वाडा पंचायत समितीच्या कृषी विभागातर्फे गमहाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाकडून दिल्या जाणाऱ्या अनुदानित भात पिकांच्या बियाणांचे वितरण करण्यात आले.
दरम्यान कृषी विभागाच्या भोंगळ कारभारामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेत नोंदणीसाठी शेतकऱ्यांची प्रचंड गर्दी झाली होती.रांगेत उभे राहून कंटाळलेल्या अनेक शेतकऱ्यांवर अखेर बियाणे न घेताच घरी परतण्याची वेळ आली.कृषी विभागाच्या या भोंगळ कारभाराचा नाहक त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागला.त्यामुळे कुणबी सेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रदीप हरड यांनी वाटपाची सविस्तर माहिती देण्याची मागणी एका निवेदनाद्वारे गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे.
यावर्षी पाऊस मे महिन्यातच दाखल झाल्यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ झाली असून,शेतीची अवजारे व बी बियाणे जमा करण्याचे काम शेतकऱ्यांनी हाती घेतले आहे.बियाणे व खतांच्या वाढलेल्या किमतीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. अशावेळी शासनाकडून बियाणांचे वाटप करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळतो. पंचायत समितीच्या कृषी विभागाकडून बियाणे वाटपास सुरुवात केली त्यामुळे शेतकऱ्यांची अक्षरशः झुंबड उडाली.परंतु या वाटपात गोंधळ निर्माण झाल्यामुळे कुणबी सेनेने नाराजी व्यक्त केली.
कर्जत तीन या जातीच्या दहा किलो भाताच्या बियाण्यांसाठी २७० रु. तर २५ किलोच्या गोणीसाठी ६५० रु. आकारण्यात येत आहेत. याशिवाय रत्नागिरी आठ या जातीच्या दहा किलो भाताच्या बियाण्यांसाठी तीनशे रु. निश्चित केले आहेत.शासना कडून केवळ दोनच जातीचे बियाणे उपलब्ध केले आहेत. मात्र,अनेक शेतकऱ्यांना जया, सुवर्णा,अशा लहान बियाण्यांची आवश्यकता असते.त्यांना त्यासाठी अधिक पैसे मोजून विकत घ्यावे लागते असे हरड यांनी सांगितले.
.
Trending
- इन्फ्लुएन्सर्स आणि युट्युबर्ससाठी आचारसंहिता लागु करण्याचा प्रश्न विचारधीन ?
- कैसा हराया….?
- रियल इस्टेट व्यवसाय, हा नियोजनबद्ध विकासाचा पाया होऊ शकत नाही,
- निर्गुंतवणुकीचे धोरण पुन्हा सक्रिय ; बँकिंग क्षेत्रापासून सुरुवात, आयडिबीआयची ६०.७२ % मालकी फेअरफॅक्सकडे…
- पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवणे महत्वाचे आहे,
- माजी आ. हितेंद्र ठाकूर यांच्या राजकारणाला ओहोटी,
- पर्यटन,उपजीविका व मूलभूत सुविधावर भर द्या – मनोज रानडे,
- येणाऱ्या काळात पाकिस्तानची अर्थव्यवस्था पार रसातळाला जाणार…

