जव्हार,प्रतिनिधी
जव्हार येथे ५०% अनुदानावर शेतकऱ्यांना भात बियाणाचे वाटप,
जव्हार येथे परिषद सेस फंड अंतर्गत शेतकऱ्यांना ५०% अनुदानावर सुधारित भात बियाण्यांचे आ.हरिश्चंद्र भोये यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाला जिल्हा परिषद पालघरचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अतुल पारसकर, गटविकास अधिकारी दत्तात्रय चित्ते, सहाय्यक गटविकास अधिकारी संदेश दुमाडा, कृषी अधिकारी प्रशांत पाटील तसेच कृषी विभागातील इतर प्रमुख अधिकारी व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जव्हार परिसरातील शेतकरी हे भातशेती व्यवसायावर अवलंबून आहेत. यंदा वेळेवर आणि सवलतीच्या दरात गुणवत्तापूर्ण बियाणे उपलब्ध झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहॆ. भात बियाणे वाटप कार्यक्रमा दरम्यान अनेक शेतकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत, ” योजना वेळेवर राबविल्यामुळे शेतीसाठी मोठा आधार मिळाला असून उत्पादनात निश्चितच वाढ होईल,” असे सांगितले.
शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होणे,वेळेवर व गुणवत्तापूर्ण बियाणे उपलब्ध करून देणे, या उद्देशाने कृषी विभागातर्फे सदर योजना राबवण्यात येत आहे.यापुढे अशा उपक्रमांमध्ये अधिकाधिक विस्तार करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोहोचवण्याचा मानस असल्याचे अधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले.

