दीपक मोहिते,
आ. गावित व जिल्हाधिकारी जाखड यांच्या उपस्थितीत बाधिताची बैठक संपन्न,
जिल्ह्यातील डी.एफ.सी.सी. प्रकल्प,देहर्जे प्रकल्प,खडखड धरण प्रकल्प,लेंडी प्रकल्प, मुंबई – वडोदरा महामार्ग, मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग तसेच एमआरव्हीसी व बुलेट ट्रेनच्या प्रकल्पासंदर्भात सर्व आ. गावित व जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड,संबंधित अधिकारी तसेच प्रकल्पबाधित शेतकरी व नागरिक यांच्यासमवेत बैठक आयोजित करण्यात आली होती.
सदर बैठकीस विशाल खत्री, सहा.जिल्हाधिकारी डहाणू, अपुर्वा बसूर,सहा. जिल्हाधिकारी जव्हार, भूसंपादन समन्वय उपजिल्हाधिकारी महेश सागर,पुनर्वसन उपजिल्हाधिकारी तेजस चव्हाण,उपविभागीय अधिकारी वाडा,संदिप चव्हाण,प्रभारी उपविभागीय अधिकारी पालघर रविंद्र राजपूत,जिल्हा अधिक्षक, भूमी अभिलेख,नरेंद्र पाटील, देहर्जे व लेंडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता दिनेश शेवाळे, अमोल फुंदे, अधिक्षक अभियंता,पाटबंधारे प्रकल्प, सहा. संचालक,नगररचना भाग्यश्री धवळसंक तसेच डीएफसीसी प्रकल्पाचे रॉय व एमआरव्हीसी व बुलेट ट्रेनचे अधिकारी उपस्थित होते.
सदर बैठकीमध्ये वरील सर्व प्रकल्पाशी संबंधित मुद्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.प्रकल्पाशी संबंधित असलेले शेतकरी/नागरिक यांचे प्रश्न सोडवण्याच्याचा प्रयत्न करण्या बाबत सर्व संबंधित अधिकारी यांना जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी निर्देश दिले.
शासन स्तरावरील काही प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मदत करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
जिल्हाधिकारी यांनी डीएफसीसी व एमआरव्हीसी यांच्यातर्फे सुरु असलेल्या रेल्वेच्या कामाच्या ठिकाणी तसेच भुयारीमार्गामध्ये पावसामुळे पाणी साचते अशा ठिकाणी पाण्याचा निचरा होईल,याबाबत खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले. बोईसर काटकरपाडा येथे एमआरव्हीसीतर्फे चालू असलेल्या कामाच्या ठिकाणी व भुयारीमार्गात ( RUB पंचाळी,केळवे रोड,रोठे तसेच डहाणू येथील कसारा व जुन्नरपाडा कुठेही पाणी तुंबणार नाही याची दक्षता एमआरव्हीसी व डीएफसीसी यांनी घ्यावी,तसेच याvishyi पुन्हा तक्रारी येणार नाहीत, असे संबंधित विभागाला निर्देश दिले.
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गांवर घोडबंदर ते पालघरपर्यंत व्हाईट टॅपिंगचे काम सुरु असून,हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याबाबत,तसेच या महामार्गावर पावसाळ्यात पाणी साचून मोठ्या प्रमाणात अपघात होत असल्याबाबत मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावर एनएचआयचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस यांनी कामाचा दर्जा सुधारणेबाबत तसेच अपघात टाळणेकामी योग्य त्या उपायोजना करणार असल्याचे सांगितले.
वरील सर्व विषयांवर साधक बाधक चर्चा होऊन बैठक संपली.

