दीपक मोहिते,
अर्नाळा किल्ल्याच्या किनारपट्टीला वादळीवाऱ्याचा तडाखा ; अनेक घरांची पडझड,
गेल्या काही दिवसांपासून वसई तालुक्याच्या अर्नाळा,अर्नाळा किल्ला,कळंब व राजोडी या समुद्रकिनारी वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर कायम आहे.दोन दिवसापूर्वी वेगाने वाहणाऱ्या या वादळी वाऱ्याचा मोठा फटका किनारपट्टीला बसत आहे. काल सायंकाळी सुटलेल्या वादळी वाऱ्यामुळे अर्नाळा किल्ला येथील अनेक घरावरील पत्रे उडून गेले.या घटनेमध्ये सात ते आठ घरांचे मोठे नुकसान झाले आहे.५ ते १० मिनिटे झालेल्या वादळाने स्थानिक ग्रामस्थाचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले.
विरार पश्चिमेस समुद्रकिनारी असलेल्या तीन ते चार गावात दर पावसाळ्यात येथील स्थानिक ग्रामस्थाना नैसर्गिक संकटाना तोंड द्यावे लागते.यंदाही वसई विरार मध्ये वादळीवाऱ्यासह पावसाचे सत्र सुरूच आहे. दोनच दिवसांपूर्वी प्रादेशिक हवामान विभाग,मुंबई यांच्याकडून पुढील काही दिवसात विजांच्या कडकडाटासह जोराचे वादळी वारे वाहतील व अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला होता.

