दीपक मोहिते,
” सावधगिरीचा काळ ”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी आगामी काळ अग्निदिव्य ठरणार आहॆ…
गेल्या वर्षी नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी तिसऱ्यांदा देशाची धुरा शिरावर घेताना,देशासमोर अनेक आव्हाने उभी ठाकली होती.त्याचा अनुभव पावलोपावली आपण घेत आहोत.देशासमोर असलेल्या समस्यामध्ये देशाची सुरक्षा,काश्मीर राज्यातील अस्थिरता,अतिरेकी कारवाया, आंतरराष्ट्रीय बाजारात रु.चे होत असलेले अवमूल्यन,कर्जाचा वाढता बोझा,कृषी क्षेत्राची झालेली वाताहात,देशभरात होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या,वस्तू आणि सेवाकराच्या प्रचलित पद्धतीमध्ये बदल,इ.देशांतर्गत महत्वाच्या प्रश्नानी,अक्राळ विक्राळ स्वरूप धारण केले आहे.अशा स्थितीत मोदी हे गेल्या वर्षी तिसरी इनिंग खेळण्यासाठी पुन्हा मैदानात उतरले व त्यांनी विरोधकांना नामोहरम करत पुन्हा बाजी मारली.गेल्या वेळी त्यांच्या पक्षाकडे सध्या बहुमत असले तरी गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत माफक यश मिळाले.त्यांना सध्या देशाची सुरक्षितता,आर्थिक स्थिती व परराष्ट्र धोरण अशा तीन स्तरावर तारेवरची कसरत करावी लागत आहॆ. तिसऱ्यांदा सूत्रे हाती घेतल्यानंतर आता वर्षभराचा कालावधी उलटून गेला आहे. या वर्षभराच्या काळात त्यांना उद्योग क्षेत्रातील मंदी,रोजगार,चलनफुगवटा, डबघाईला आलेले सरकारी उपक्रम ( बीएसएनएल,पोस्ट,माझगाव डॉक,एचएएल,इ.सरकारी उपक्रम ) हाती घेण्यात आलेल्या प्रकल्पाची अंमलबजावणी,इ. महत्वाच्या प्रश्नाचा त्यामध्ये समावेश आहॆ.सध्या आपल्या देशाला चोहोबाजूनी शत्रू राष्ट्रानी घेरण्यास सुरुवात केली आहॆ. श्रीलंका,नेपाळ,बांगला देश, म्यानमार व मालदीव या देशाचे चीन व अमेरिकेच्या नादी लागणे.जम्मू – काश्मीर राज्यात पाकिस्तानच्या कारवाया व ३७० कलम हटवल्यानंतर निर्माण झालेली अशांतता इ.जटील समस्यांचा त्यामध्ये समावेश आहे.पाकिस्तानशी नुकतेच झालेले युद्ध व अचानक अमेरिकेच्या पुढाकाराने झालेली शस्त्रसंधी,अशा कारणामुळे आपल्या परराष्ट्र धोरणाबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहॆ.सध्या असे अनेक प्रश्न मोदी यांच्यासमोर उभे ठाकले आहेत.ते मार्गी लावण्यासाठी त्यांना वेळप्रसंगी कठोर निर्णय घ्यावे लागणार आहेत.जम्मू-काश्मीर राज्यातील अतिरेकी कारवाया थांबल्याचा त्यांनी दावा केला होता,तो दावा पठाणकोट पुलवामा व आता पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने फोल ठरला आहॆ.दुसरीकडे छत्तीसगड व महाराष्ट्र राज्यातील नक्षलवाद याचा बिमोड करण्यासाठी,त्यांच्या सरकारला कठोर पावले उचलायला लागणार आहेत.दुसरीकडे आपले शेजारी असलेले पाकिस्तान,चीन व बांगला देश,यांच्याकडून सतत कुरापती काढण्यात येत असतात.त्याला आळा घालण्यासाठी मोदी यांना राजकीय मत्सद्दीपणा दाखवावा लागणार आहे.अमेरिका हा देश आपला मित्र असल्याचे भासवत असला तरी तो व्यापारी देश असुन,पाकिस्तानचा कायम पाठीराखा आहॆ.दक्षिण आशिया क्षेत्रात आपल्या देशाचे वर्चस्व निर्माण होऊ नये,यासाठी अमेरिका हा बांगला देश,पाकिस्तान व म्यानमार या देशांना आर्थिक व लष्करी साहित्य पुरवत असतो.त्याची ही चाल ओळखून मोदी यांनी नेहरूच्या काळापासून आपला मित्र असलेल्या रशियाशी आपले संबंध अधिक दृढ करण्यावर भर देण्याची गरज आहॆ.नुकत्याच झालेल्या युद्धात रशियाने आपल्याला दिलेल्या डिफेन्स सिस्टम प्रणालीने शत्रूराष्ट्राची दाणादाण उडवली.ही वस्तूस्थिती लक्षात घेऊन मोदी सरकारने आपल्या परराष्ट्र धोरणात अमुलाग्र बदल करण्याची आवश्यकता आहॆ.तसेच अमेरिकेत जाऊन ” ट्रम्प ट्रम्प, ” अशा बोंबा मारणे,तसेच ” अबकी बार ट्रम्प सरकार,” असे कोकलणे बंद केले पाहिजे.आशिया खंडात सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आगामी ४ वर्षे त्यांच्या सरकारसाठी कसोटीची ठरणारी आहेत. त्यांच्या सरकारला भविष्यात अग्निदिव्यातून जावे लागणार आहे.ही सारी आव्हाने मोदी कसे पेलतात,यावर त्यांचे यश-अपयश अवलंबून असेल.

