Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, ” सावधान,” स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका,भाजप सहज खिश्यात घालणार, राज्य विधानसभा निवडणुकीनंतर भाजप वगळता अन्य साऱ्या पक्षात सध्या एकप्रकारची मरगळ आली आहे.विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यामुळे सर्व पक्षाचे अवसान पार गळले आहे.दुसरीकडे भाजप मात्र अत्यंत छुप्या पद्धतीने निवडणुकीच्या कामाचे नियोजन करत आहे.कोणत्याही परिस्थितीत महानगरपालिका व जिल्हा परिषदा जिंकायच्याच या निर्धाराने पदाधिकारी व कार्यकर्ते कामाला लागले आहेत. भाजपचा डोळा मुंबई व ठाणे महानगरपालिकेवर असून या दोन्ही महानगरपालिकेच्या निवडणुका जिंकण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाऊ शकतो.या दोन्ही ठिकाणी जागावाटप करताना भाजप हा मित्रपक्ष असलेल्या एकनाथ शिंदे गटाला फारशा जागा देतील असे वाटत नाही.आजच्या घडीला भाजपचे नेते या निवडणुका…

Read More

जव्हार प्रतिनिधी, मनोर-जव्हार राज्यमार्गाची दुरुस्ती व डागडुजीची मागणी, नाशिक येथे होणाऱ्या अर्धकुंभ मेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यातील महत्वाचा राज्यमार्ग एनएच-१६० ए ( मनोर-पालघर आणि जव्हार-मनोर ) ची दुरुस्ती व डागडुजीचीमागणी खा.डॉ. हेमंत सवरा यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.या राज्यमार्गाची दुरुस्ती व चौपदरीकरणासाठी लवकरात लवकर निधी मंजूर करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. अर्धकुंभ मेळा हा लाखो भाविक,पर्यटक आणि साधू-संतांचे प्रमुख आकर्षण आहे.देशभरातून भाविक मोठ्या संख्येने नाशिकमध्ये दाखल होणार आहेत.या काळात मुंबई-नाशिक, पालघर-नाशिक आणि ठाणे-नाशिक मार्गांवरील वाहतुकीचा भार मोठ्या प्रमाणात वाढतो.पालघर जिल्ह्यातील मनोर-पालघर आणि जव्हार-मनोर मार्ग हे धार्मिक,पर्यटन आणि व्यापारी दृष्टिकोनातून महत्त्वाचा मार्ग असून…

Read More

शुभम सावंत,विरार विरार येथे रक्तदान व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न, रोटरॅक्ट क्लब ऑफ विरार यांच्यातर्फे नुकतेच रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात साथिया ट्रस्ट ब्लड सेंटर यांच्या सहयोगाने ३० युनिट रक्त संकलित करण्यात आले. या शिबिरास रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सामाजिक बांधिलकी जपली. या रक्तदान शिबिरासोबत आरोग्य तपासणी शिबिरही आयोजित करण्यात आली होती.डोळ्यांच्या तपासणीसाठी ” इन्फिगो आय हॉस्पिट,” दंततपासणीसाठी डॉ. झैनब मर्चंट,तसेच सामान्य आरोग्य तपासणी व सल्ल्यासाठी डॉ.पलक परिया यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. या शिबिरीत एकूण ८६ लोकांची तपासणी करण्यात आली.त्यामध्ये ३६ लोकांची दंत तपासणी व ५० लोकांची नेत्रचिकीत्सा तपासणी करण्यात आली. रोटरॅक्ट क्लब ऑफ…

Read More

सचिन परब, विरार, विरार येथे ” जुळल्या सुरेल तारा,” हा शास्त्रीय संगीत वाद्यवादन कार्यक्रम संपन्न, सृजन विरार या संस्थेतर्फे विवा महाविद्यालयाच्या विजयानंद पाटील रंगायतन येथे ” जुळल्या सुरेल तारा,” हा शास्त्रीय संगीत वाद्यवादन मैफल पार पडली.या कार्यक्रमाला संगीतप्रेमी नागरिकांनी हजेरी लावली. कार्यक्रमाच्या प्रथम सत्रात पं.शिवकुमार शर्मा यांचे शिष्य पुणे येथील डॉ.शंतनु गोखले यांच्या संतूर वादनाने रसिक वर्ग मंत्रमुग्ध झाला होता. सुरुवातीस वाद्याची ओळख त्यात कालानुरूप झालेले बदल,अशी उपयुक्त माहिती त्यांनी दिली.प्रथम राग वाचस्पती सादर करून त्यांनी हिमाचल प्रदेशात लोकप्रिय असलेल्या पहाडी रागातील एक धून सादर केली. द्वितीय सत्रात पं.डी.के दातार यांचे शिष्य राजन माशेलकर यांनी व्हायोलिन आणि उस्ताद मुन्नेखान…

Read More

दिपक मोहिते, ” हल्लाबोल,” भागृहाचा सन्मान व गरिमा,सर्वांनीच जपायला हवा… काल कुणाल कामरा प्रकरणावर विधानसभा सभागृहात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस हे प्रचंड आक्रमक झालेले पाहायला मिळाले.अत्यंत पोटतिडकीने सभागृहाचा आदर व सन्मानाबाबत त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले.वास्तविक विधानसभा व विधानपरिषद या दोन्ही सभागृहाचे कामकाज हे भारतीय संविधानानूसार चालणे,अपेक्षित असते.पण हल्ली तसं होत नाही.भारतीय संविधानाला सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधींच्या लेखी आता काडीची किंमत नसल्याचे वेळोवेळी अनुभवायला मिळाले.सभागृहाचा अवमान व सभागृहाची गरीमा यावर फडणवीस हे आपल्या भाषणात बरंच काही बोलले.सभागृहा प्रती त्यांची आत्मीयता व संवेदना आपण समजू शकतो.पण गेल्या साडेतीन ते चार वर्षाच्या काळात सभागृहाच्या गरिमाला नख लावण्याचे काम कोणी केले,याची पडताळणी केली तर महायुतीचे अनेक…

Read More

सुरेश वैद्य,सफाळे पालघर जिल्हा परिषदेचा ₹ ७६.५४ कोटींचा अर्थसंकल्प जाहीर, पालघर जिल्हा परिषदेचा ₹ ७६ कोटी ५४ लाख रुपयांचा अर्थसंकल्प मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनी सादर केला. २०२५-२६ चा मूळ अर्थसंकल्प आणि २०२४-२५ चा सुधारित अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला असून, गतवर्षीच्या तुलनेत,यंदा ६.५० % इतका वाढला आहे. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक डॉ.रूपाली सातपुते, मुख्य लेखा वित्त अधिकारी धनराज पांडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर जगताप,लेखाधिकारी विकास पाटील तसेच सर्व विभाग प्रमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यंदाच्या अर्थसंकल्पात बांधकाम, पाणीपुरवठा, आरोग्य,शिक्षण,कृषी, पशुसंवर्धन,समाजकल्याण, महिला व बालविकास, दिव्यांग कल्याण आणि लघु पाटबंधारे…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल, ” कुणाल कामराचे गाणे : शिंदे यांचा गेम नक्की कोणी केला? सध्या कुणाल कामरा यांनी सत्ताधाऱ्यांची झोप पार उडवली आहे.त्याच्या एका गाण्याने शिंदे गटाच्या पायाखालची जमीनच जणू सरकली आहे.त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिलेदारांनी त्याच्या स्टुडिओची प्रचंड नासधूस केली.वास्तविक शिंदे यांनी कामरावर निंदानालस्ती केल्या प्रकरणी न्यायालयात दावा ठोकायला हवा होता,ते न करता त्यांच्या पिल्लावळीने हिंसक मार्ग स्विकारत त्याचा स्टुडिओ व ज्या हॉटेलमध्ये कामरा याचा शो होता,त्या हॉटेलचे जवळपास २५ लाखाचे नुकसान केले.आता या हॉटेलचा मालक सरकारला ” या प्रकरणी आमचा दोष काय ? असा प्रश्न विचारत आहे.या प्रश्नाचे उत्तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले पाहिजे. या…

Read More

नाशिक प्रतिनिधी, अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये चार श्रमसंहिता व जन सुरक्षा कायद्याची होळी, नाशिक शहरातील अंबड औद्योगिक वसाहतीतील सिमेंस कंपनी चौफुली जवळ केंद्रातील भाजप सरकार व राज्यातील महायुती सरकारतर्फे १ एप्रिल २०२५ पासून नवीन लेबर कोड कायदा व महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा कायदा लागू करणार आहे.त्याच्या निषेधार्थ आज नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रात निदर्शने करण्यात आली. हे कायदे कामगार,शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य जनतेच्या हिताचे नाहीत,त्यास विरोध करण्यासाठी अंबड औद्योगिक वसाहतीतील विविध कंपन्यांचे कामगार एकत्र येऊन जोरदार निदर्शने करण्यात आली.यावेळी चार लेबर कोड व जनसुरक्षा कायद्याच्या प्रतीची होळी करण्यात आली.नासिक वर्कर्स युनियनचे चिटणीस कॉ. आत्माराम डावरे व सरचिटणीस कॉ.तुकाराम सोनजे यांनीयावेळी मार्गदर्शन केले.या आंदोलनामध्ये अरविंद…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल, ” रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्यावरून वादंग होण्याची शक्यता… राज्यात औरंगजेबाच्या कबरीवरून वादंग सुरु असताना आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. काही दिवसापूर्वी स्वराज्य पक्षाचे प्रमुख आणि माजी खा.संभाजीराजे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड समाधीस्थळाजवळ असलेल्या वाघ्या कुत्र्‍याच्या समाधीचा मुद्दा उपस्थित केला आहे.ही समाधी कपोलकल्पित असून तिला इतिहासाचा कुठलाही आधार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. रायगडावरील या समाधीबाबत इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये वाघ्या कुत्र्याच्या पात्राचा कुठेही उल्लेख नाही, असे इंद्रजित सावंत यांनी म्हटले आहे.तसेच,वाघ्या कुत्र्‍याची निर्मित्ती कुठून झाली, यावर त्यांनी भाष्य केलं आहे.एका नाटकातून वाघ्या कुत्र्‍याची निर्मिती झाल्याचं…

Read More

वसंत भोईर,वाडा सरकारच्या निष्क्रियतेमुळे वाड्यातील शेतकऱ्यांची दैनावस्था, गेल्या पाच वर्षापासून शेतकऱ्यांना खरीप हंगामात नापीकीपणाचा सामना करावा लागत आहे.यंदाही खरीप हंगामात अतिवृष्टी व दोनदा आलेल्या महापुरामुळे होत्याचे नव्हते झाले.हाती आलेले धानाचे पीक मातीमोल झाले आहे.नदी व नाल्यांच्या काठावरील शेती पिकांसह खरडून वाहून गेली.त्यातच लष्करी अळीसह कीड व रोगांनी पीक नेस्तनाबूत केले आहे. यंदा शासनाने तेवीसशे रु.चा हमीभाव जाहीर केला.परंतु दोन महिने उशिरा हमीभाव केंद्र सुरू झाले. आर्थिक अडचणीमुळे व्यापाऱ्यांना प्रति क्विंटल दोन हजार रु.च्या भावाने धान विकावे लागले.सोने पिकवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या शेतकऱ्यांच्या हाती यंदा माती पडली आहे.धानाची साडेसाती शेतकऱ्यांचा पिच्छा सोडताना दिसत नाही.शासनाच्या मार्गदर्शनामध्ये शेतकरीवर्ग धानाच्या शेतीत विविध प्रयोग करत असतात.परंतु…

Read More