नाशिक प्रतिनिधी,
अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये
चार श्रमसंहिता व जन सुरक्षा कायद्याची होळी,
नाशिक शहरातील अंबड औद्योगिक वसाहतीतील सिमेंस कंपनी चौफुली जवळ केंद्रातील भाजप सरकार व राज्यातील महायुती सरकारतर्फे १ एप्रिल २०२५ पासून नवीन लेबर कोड कायदा व महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा कायदा लागू करणार आहे.त्याच्या निषेधार्थ आज नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रात निदर्शने करण्यात आली.
हे कायदे कामगार,शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य जनतेच्या हिताचे नाहीत,त्यास विरोध करण्यासाठी अंबड औद्योगिक वसाहतीतील विविध कंपन्यांचे कामगार एकत्र येऊन जोरदार निदर्शने करण्यात आली.यावेळी चार लेबर कोड व जनसुरक्षा कायद्याच्या प्रतीची होळी करण्यात आली.नासिक वर्कर्स युनियनचे चिटणीस कॉ. आत्माराम डावरे व सरचिटणीस कॉ.तुकाराम सोनजे यांनीयावेळी मार्गदर्शन केले.या आंदोलनामध्ये अरविंद शहापुरे, आर्ट रबर इंडस्ट्रीज,अल्फ इंजिनिअरिंग,रिलायबल, फिनोटक्स रेनबो डेपो प्लस, स्वाती इंजिनिअरिंग,लुसी इलेक्ट्रिकल,सुदाल,आरडी इंजिनिअरिंग अशा अनेक कंपनीतील कामगार सहभागी झाले होते.
तसेच त्रिमूर्ती चौक चौफुली सिग्नलजवळ देखील निदर्शने करण्यात आली.यावेळी कॉ. डावरे,कॉ.सोनजे,कॉ.शहापुरे व अंबडमधील विविध कंपनीतील कामगार हजर होते.या निदर्शनाच्यावेळी सरकारच्या चार लेबर कोड व जन सुरक्षा कायद्याच्या प्रतीची ओळी करण्यात आली.

