शुभम सावंत,विरार
विरार येथे रक्तदान व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न,
रोटरॅक्ट क्लब ऑफ विरार यांच्यातर्फे नुकतेच रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात साथिया ट्रस्ट ब्लड सेंटर यांच्या सहयोगाने ३० युनिट रक्त संकलित करण्यात आले.
या शिबिरास रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सामाजिक बांधिलकी जपली.
या रक्तदान शिबिरासोबत आरोग्य तपासणी शिबिरही आयोजित करण्यात आली होती.डोळ्यांच्या तपासणीसाठी ” इन्फिगो आय हॉस्पिट,” दंततपासणीसाठी डॉ. झैनब मर्चंट,तसेच सामान्य आरोग्य तपासणी व सल्ल्यासाठी डॉ.पलक परिया यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. या शिबिरीत एकूण ८६ लोकांची तपासणी करण्यात आली.त्यामध्ये ३६ लोकांची दंत तपासणी व ५० लोकांची नेत्रचिकीत्सा तपासणी करण्यात आली.
रोटरॅक्ट क्लब ऑफ विरारचे अध्यक्ष रोट्रॅक्ट तेजस काटकर, निहाल घरत,साहिल भानुशाली,प्रणित जाधव, खुश मुंबरकर,कनिष्का मोहिते,यासिर मंडल,शिवम सोगले,आयुष मिश्रा,प्रथम पावसकर,यामिनी वर्मा,तान्या निघाम,आयुष पाटील,दिनेश घेंबाड व इतर सहकारी सहभागी झाले होते.
रोट्रॅक्ट राजेश कसत, सागर केळजी,गोपीनाथ नागरगोजे, उर्मिला काटकर आणि महेंद्र घरत स्वब्रम चैरिटेबल ट्रस्ट यांच्याकडून मार्गदर्शन लाभले.
या शिबिरामुळे अनेकांना मोफत आरोग्य तपासणी व रक्तदानाची संधी मिळाली. सामाजिक उत्तरदायित्वाचा भाग म्हणून अशा उपक्रमांचे आयोजन गरजेचे असल्याचे आयोजकांनी सांगितले. या उपक्रमात सहभागी झालेले डॉक्टर्स आणि स्वयंसेवकांचे विशेष आभार मानण्यात आले.

