जव्हार प्रतिनिधी,
मनोर-जव्हार राज्यमार्गाची दुरुस्ती व डागडुजीची मागणी,
नाशिक येथे होणाऱ्या अर्धकुंभ मेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यातील महत्वाचा राज्यमार्ग एनएच-१६० ए ( मनोर-पालघर आणि जव्हार-मनोर ) ची दुरुस्ती व डागडुजीचीमागणी खा.डॉ. हेमंत सवरा यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.या राज्यमार्गाची दुरुस्ती व चौपदरीकरणासाठी लवकरात लवकर निधी मंजूर करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.
अर्धकुंभ मेळा हा लाखो भाविक,पर्यटक आणि साधू-संतांचे प्रमुख आकर्षण आहे.देशभरातून भाविक मोठ्या संख्येने नाशिकमध्ये दाखल होणार आहेत.या काळात मुंबई-नाशिक, पालघर-नाशिक आणि ठाणे-नाशिक मार्गांवरील वाहतुकीचा भार मोठ्या प्रमाणात वाढतो.पालघर जिल्ह्यातील मनोर-पालघर आणि जव्हार-मनोर मार्ग हे धार्मिक,पर्यटन आणि व्यापारी दृष्टिकोनातून महत्त्वाचा मार्ग असून या अवस्था अत्यंत दयनीय अशी झाली आहे.
सध्या रस्त्यांची दुर्दशा,खड्डे, अरुंद रस्ते आणि अनियंत्रित वाहतूक,यामुळे या मार्गांवर वारंवार अपघात होत आहेत. स्थानिक नागरिक,व्यापारी, पर्यटक आणि वाहनचालकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.त्यामुळे वाहतूक सुरळीत व सुरक्षित असणे गरजेचे आहे. त्यासाठी या राज्यमार्गाची तातडीने सुधारणा करणे आवश्यक आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या मागणीबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करू लवकरात लवकर कामास गती देण्याचे आश्वासन दिले.
स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांच्या मोठ्या अपेक्षा असुन
या राज्यमार्गाच्या दुरुस्तीसाठी स्थानिक नागरिक,व्यापारी संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी अनेक वेळा मागणी केली होती.आता खा. सावरा यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर हा मार्ग अर्धकुंभ मेळ्यापूर्वी दुरुस्त होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

